Jump to content

बाळासाहेब विखे पाटील

माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांचे वयाच्या 84 व्या वर्षी 30 डिसेंबर 2016 रोजी लोणी अहमदनगर येथे निधन झाले.

बाळासाहेब विखे पाटील

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००४
मागील बाळासाहेब विखे पाटील
मतदारसंघ कोपरगाव
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
मागील प्रसाद बाबूराव तानपुरे
पुढील बाळासाहेब विखे पाटील
मतदारसंघ कोपरगाव
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मागील मारूती शेळके
पुढील दिलीपकुमार मनसुखलाल गांधी
मतदारसंघ अहमदनगर
कार्यकाळ
इ.स. १९८९ – इ.स. १९९१
मागील बाळासाहेब विखे पाटील
पुढील शंकरराव काळे
मतदारसंघ कोपरगाव
कार्यकाळ
इ.स. १९८४ – इ.स. १९८९
मागील बाळासाहेब विखे पाटील
पुढील बाळासाहेब विखे पाटील
मतदारसंघ कोपरगाव
कार्यकाळ
इ.स. १९८० – इ.स. १९८४
मागील बाळासाहेब विखे पाटील
पुढील बाळासाहेब विखे पाटील
मतदारसंघ कोपरगाव
कार्यकाळ
इ.स. १९७७ – इ.स. १९८०
मागील बाळासाहेब विखे पाटील
पुढील बाळासाहेब विखे पाटील
मतदारसंघ कोपरगाव
कार्यकाळ
इ.स. १९७१ – इ.स. १९७७
मागील ए. शिंदे
पुढील बाळासाहेब विखे पाटील
मतदारसंघ कोपरगाव

जन्म १० एप्रिल, १९३२ (1932-04-10) (वय: ९२)
अस्तगाव, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी सिंदुताई पाटील
अपत्ये ३ मुलगे व २ मुली.
निवास लोणी बद्रुक, राहाता तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र

जीवन

10 एप्रिल 1932 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना सुरू केला होता. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामान्यासाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तब्बल आठ वेळा ते लोकसभेचे खासदार झाले.
ते मूळचे काँग्रेस पक्षाचे परंतु ते काही काळ शिवसेनेत होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना विखे-पाटील यांनी देशभरातील 45 खासदारांना एकत्र करून काँग्रेस फोरम फॉर ॲक्शन स्थापन करून आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले होते.
त्यातूनच पुढे 1991च्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी नगर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून निवडणूक लढवली. नगर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व खजिनदार
राज्य साखर संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र पाणी परिषदेचे संस्थापक, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष इत्यादी महत्त्वाची पदे भूषविली.
पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा जन्मदिवस 16 ऑगस्ट शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकरी दिन तिथीनुसार म्हणजेच डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांचा जन्म नारळी पौर्णिमेच्या असल्याने दरवर्षी हा दिवस नारळी पौर्णिमेला साजरा केला जाईल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस एक जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

मंत्रीपद

अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पद 1999 ते 2001
अवजड मंत्रालयात केंद्रीय मंत्रिपद जुलै 2002 ते मे 2003 भूषविले

पुरस्कार

सामाजिक कार्यातील योगदानासाठी त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण पुरस्कार

पहिले खाजगी तंत्रनिकेतन

त्यांनी राज्यातील पहिले खाजगी तंत्रनिकेतन 1980 मध्ये प्रवरानगर येथे सुरू करून ग्रामीण शिक्षणाची चळवळ सुरू करण्याची मुहूर्तमेढ रोवली. पंचायत समिती, जिल्हा परिषद हे टप्पे पार करत बाळासाहेब काँग्रेस पक्षातर्फे 1971 मध्ये कोपरगाव मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1977, 1980, 1984 आणि 19 89 अशा सलग चार निवडणुका विखे यांनी या मतदारसंघातून जिंकल्या. 1989 मध्ये बोफोर्स आणि राम जन्मभूमी मुद्द्यावरून काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर बाळासाहेब विखे यांनी पक्षाच्या पराभवाची चर्चा पक्षांतर्गत व्यासपीठावर व्हावी यासाठी एका फोरमची स्थापना केली. पक्षात अधिक लोकशाही यावी हा या फोरम स्थापण्यामागचा उद्देश आहे असे बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते.

संदर्भ

https://www.loksatta.com/vishesh-news/tribute-to-balasaheb-vikhe-patil-1374541/