बाळा (दिग्दर्शक)
बाळा पलानीस्वामी(जन्म: ११ जुलै १९६६ जन्मगावः पेरियकुळम, तेनी जिल्हा, तमिळनाडू) हे एक प्रसिद्ध तमिळ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक आहेत. त्यांचे चित्रपट हे सहसा टिकाकारांनी गौरविलेले असतात. त्यांना त्यासाठी अनेक पारितोषिके देखील मिळाली आहेत. सध्या ते चेन्नई येथे वास्तव्यास आहेत. सेतु (राष्ट्रीय पुरस्कार विजेता), नंदा, पितमगन हे त्यांचे काही यशस्वी चित्रपट.