बाळकृष्ण हरी कोल्हटकर
बाळकृष्ण हरी कोल्हटकर | |
---|---|
जन्म नाव | बाळकृष्ण हरी कोल्हटकर |
जन्म | सप्टेंबर २५, इ.स. १९२६ |
मृत्यू | जून ३०, इ.स. १९९४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | नाट्यलेखन, साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, नाटक |
बाळकृष्ण हरी कोल्हटकर, ऊर्फ बाळ कोल्हटकर, (जन्म : सातारा, २५ सप्टेंबर १९२६, - ३० जून १९९४) हे मराठीतील नाटककार, कवी, अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या दुरिताचे तिमिर जावो[१], वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले[२]. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली.
जीवन
कोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथमच जोहार नावाचे नाटक लिहिले[२]. इ.स. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पेशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले[२].
कारकीर्द
नाटके
नाटक | वर्ष | प्रकाशन | भाषा | सहभाग |
---|---|---|---|---|
आकाशगंगा | मराठी | लेखन | ||
एखाद्याचे नशीब | मराठी | लेखन | ||
दुरिताचे तिमिर जावो | मराठी | लेखन | ||
देणाऱ्याचे हात हजारो | मराठी | लेखन | ||
देव दीनाघरी धावला | मराठी | लेखन | ||
मुंबईची माणसं | मराठी | लेखन | ||
लहानपण देगा देवा | मराठी | लेखन | ||
वाहतो ही दुर्वांची जुडी | इ.स. १९६४ | मराठी | लेखन | |
विद्या विनयेन शोभते | मराठी | लेखन | ||
वेगळं व्हायचंय मला | मराठी | लेखन |
सिमेवरून परत जा अंगाई वाऱ्यात मिसळले पाणी उघडले स्वर्गाचे दार
संदर्भ
- ^ "व्यावसायिक असूनही प्रायोगिकतेचा पाठीराखा". Loksatta. 2020-04-07 रोजी पाहिले.
- ^ a b c एन्सायक्लोपेडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर (मराठी साहित्यविषयक ज्ञानकोशीय शब्दसंग्रह) (इंग्लिश भाषेत). p. ३३५.CS1 maint: unrecognized language (link)