Jump to content

बाळकृष्ण भगवंत बोरकर

बा.भ. बोरकर (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (जन्म : बोरी-गोवा, ३० नोव्हेंबर १९१०; - ८ जुलै १९८४) हे मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते. ते मराठी साहित्यप्रेमीही होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचे भूषण होते.

बालकृष्ण भगवंत बोरकर यांचे स्मारक

जीवनकाल

बोरकर मॅट्रिक झाल्यावर काॅलेजात गेले, पण अभ्यास न झेपल्याने त्यांनी कॉलेजला रामराम ठोकला. पुढे गोव्यात वास्कोला इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकीपेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात 'तेथे कर माझे जुळती' या काव्यगायनाने कवी म्हणून त्यांना ख्याती प्राप्त झाली. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले, आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले.

बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे. 'फुलत्या लाख कळ्या', 'सरीवर सरी आल्या गं' या त्यांच्या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.

काव्यलेखनाबरोबर बोरकरांनी ललित लेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध यावरही लेखन केले. स्टीफन युविंग (Ewing) यांच्या कादंबऱ्याचे तसेच महात्मा गांधीजींच्या काही पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.

मराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी अशी बोरकरांची ओळख होती. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे.[]

८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले.

बोरकरांच्या कवितांवरील कार्यक्रम

  • शास्त्रीय संगीत गायिका डाॅ. सुहासिनी कोरटकर या बा.भ. बोरकर यांच्या हिंदी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’ हा कार्यक्रम करीत असत.

प्रकाशित साहित्य

शीर्षकप्रकाशनप्रकाशन दिनांक (इ.स.)भाषासाहित्यप्रकार
अनुरागिणीइ.स. १९८२मराठीकवितासंग्रह
आनंदभैरवीइ.स. १९५०मराठीकवितासंग्रह
कांचनसंध्याइ.स. १९८१मराठीकवितासंग्रह
गितारइ.स. १९६५मराठीकवितासंग्रह
चित्रवीणाइ.स. १९६०मराठीकवितासंग्रह
चिन्मयीइ.स. १९८४मराठीकवितासंग्रह
चैत्रपुनवइ.स. १९७०मराठीकवितासंग्रह
जीवनसंगीतइ.स. १९३७मराठीकवितासंग्रह
दूधसागरइ.स. १९४७मराठीकवितासंग्रह
प्रतिभाइ.स. १९३०मराठीकवितासंग्रह
कागदी होड्याइ.स. १९३८मराठीलघुनिबंध
मावळता चंद्रइ.स. १९३८मराठीकादंबरी
अंधारातील वाटइ.स. १९४३मराठीकादंबरी
जळते रहस्यइ.स. १९४५मराठीकादंबरी (भाषांतरित, मूळ The Burning Secret. लेखक - स्टीफन झ्वायग)
भावीणइ.स. १९५०मराठीकादंबरी
बापूजींची ओझरती दर्शनेइ.स. १९५०मराठीभाषांतर
आम्ही पाहिलेले गांधीजीइ.स. १९५०मराठीभाषांतर
काचेची किमयाइ.स. १९५१मराठीभाषांतर
गीता-प्रवचनांइ.स. १९५६कोेकणी(विनोबांच्या गीताप्रवचनांचे कोंकणी भाषांतर)
संशयकल्लोळइ.स. १९५७कोेकणीभाषांतर
बोरकरांची कविताइ.स. १९६०मराठीकवितासंग्रह (आरंभापासूनच्या पाच कवितासंग्रहांचे संकलित प्रकाशन)
प्रियदर्शनीइ.स. १९६०मराठीकथासंग्रह
माझी जीवनयात्राइ.स. १९६०मराठीभाषांतर
गीतायइ.स. १९६०कोंकणीभाषांतर (भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद)
पांयजणांइ.स. १९६०कोेकणीकवितासंग्रह
आनंदयात्री रवींद्रनाथ : संस्कार आणि साधनाइ.स. १९६४मराठीचरित्रपर
चांदणवेल (बोरकरांच्या निवडक मराठी कविता)इ.स. १९७२मराठीकवितासंग्रह (संपादित)
वासवदत्ता : एक प्रणयनाट्यइ.स. १९७३कोंकणीभाषांतर
संशयकल्लोळ (मूळ ले. मोलियर, मराठी रूपांतर : गो. ब. देवल )इ.स. १९७६कोंकणीभाषांतर
पैगंबर (ले. खलील जिब्रान)इ.स. १९७६कोंकणीभाषांतर
मेघदूतइ.स. १९८०मराठीसमश्लोकी, समवृत्त, सयमक भाषांतर
सासायइ.स. १९८०कोंकणीकवितासंग्रह
बामण आनी अभिसारइ.स. १९८१कोंकणीभाषांतर
चांदण्याचे कवडसेइ.स. १९८२मराठीललित लेखसंग्रह
समुद्राकाठची रात्रइ.स. १९८२मराठीलघुकथासंग्रह
पावलापुरता प्रकाशइ.स. १९८३मराठीललित लेखसंग्रह
प्रियकामाइ.स. १९८३मराठीकादंबरी
भगवान बुद्ध (ले. धर्मानंद कोसंबी)इ.स. १९८३कोंकणीभाषांतर
कौतुक तू पाहे संचिताचेइ.स. २०१०मराठीआत्मचरित्र (अपूर्ण) (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)
बा. भ. बोरकरांचे अप्रकाशित साहित्यइ.स. २०१०मराठीलेखन-संग्रह (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)
अप्रकाशित बाकीबाबइ.स. २०१०कोंकणीलेखन-संग्रह (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)
महात्मायनमराठीमहाकाव्य (अपूर्ण)

बोरकरांच्या निवडक कविता संकलित वा संपादित पद्धतीने खालील पुस्तकांतून प्रकाशित झाल्या आहेत.

शीर्षकप्रकाशनप्रकाशन दिनांक (इ.स.)संपादकभाषासाहित्यप्रकार
कैवल्याचे झाडसुरेश एजन्सी, पुणेइ.स. १९८७मराठीकाव्यसंग्रह
चांदणवेलकॉंटिनेॅंटल प्रकाशनइ.स. १९७२गो.म. कुलकर्णीमराठीकाव्यसंग्रह
बोरकरांची कवितामौज प्रकाशनइ.स. १९६०मंगेश पाडगावकरमराठीकाव्यसंग्रह
बोरकरांची प्रेमकवितासुरेश एजन्सी, पुणेइ.स. १९८४रा.चिं. ढेरेमराठीकाव्यसंग्रह
बोरकरांची निवडक कवितासाहित्य अकादमीइ.स. १९९६डॉ. प्रभा गणोरकरमराठीकाव्यसंग्रह

बोरकरांच्या साहित्यावर उपलब्ध असलेले समीक्षणात्मक ग्रंथ

  • बा.भ.बोरकर व्यक्ती आणि वाङ्मय - मनोहर हि.सरदेसाई, गोमंतक मराठी अकादमी, फेब्रु १९९२.
  • कविवर्य बा.भ.बोकरकर-समीक्षा - डॉ.वासन्ती इनामदार जोशी, रूक्मिणी प्रकाशन,कोल्हापूर, जून २००४.
  • बा.भ.बोकरकर जन्मशतसांवत्सरिक - संपादक: डॉ.सु.म.तडकोडकर, प्रतिमा प्रकाशन, पुणे, फेब्रु.२०१२.
  • भारतीय साहित्याचे निर्माते बा.भ.बोरकर- प्रभा गणोरकर, साहित्य अकादमी


बोरकरांची काव्येतर साहित्यनिर्मिती

  • अनुवाद ६
  • कथासंग्रह २
  • कादंबऱ्या ४ ('मावळता चंद्र','अंधारातली वाट', 'भावीण','प्रियकामा')
  • कोंकणी साहित्यकृती १०
  • चरित्रात्मक प्रबंध २
  • ललितलेख संग्रह ४
  • संपादित कवितासंग्रह १ कुसुमाग्रजांची निवडक कविता रसयात्रा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ PRABHA GANORKAR. BALKRISHNA BHAGWANT BORKAR - MARATHI.

बाह्य दुवे