Jump to content

बाळकृष्ण दत्तात्रेय शिरगावकर

बाळकृष्ण दत्तात्रेय शिरगावकर
पूर्ण नावबाळकृष्ण दत्तात्रेय शिरगावकर
जन्मफेब्रुवारी ४, १९०९
कसबा तारळे, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यूजून १३, २००६
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रचित्रकला, अध्यापन (कला)

बाळकृष्ण दत्तात्रेय शिरगावकर ऊर्फ बी.डी. शिरगावकर (फेब्रुवारी ४, १९०९ - जून १३, २००६) हे मराठी चित्रकार होते.

जीवन

शिरगावकरांचा जन्म फेब्रुवारी ४, १९०९ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापुरानजीकच्या कसबा तारळे गावी झाला. १९३८ साली ते मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट य कलाशिक्षणसंस्थेत अध्यापक म्हणून रुजू झाले. बनारस हिंदू विश्वविद्यापीठाच्या संगीत व ललितकला शाखेच्या अभ्यासमंडळावर इ.स. १९५१ ते १९६८ सालांदरम्यान ते सदस्य म्हणून काम सांभाळत होते.
जून १३, २००६ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.