Jump to content

बाळ दत्तात्रेय टिळक

डॉ. बाळ दत्तात्रेय टिळक (इ.स. १९१८ - २५ मे, इ.स. १९९९) हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी रसायनशास्त्रज्ञ होते. ऑक्सफर्ड विद्यापीठातील डी.फिल. आणि डी.एस्सी. पदव्या मिळवलेल्या टिळकांनी मुंबई विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान विभागात अध्यापन केले. इ.स. १९६६-७८ या कालखंडात हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक होते.

आरंभिक जीवन आणि शिक्षण

बाळ दत्तात्रेय टिळकांचा जन्म विदर्भातील कारंजा [] या गावी इ.स. १९१८मध्ये झाला. त्यांचे वडील - दत्तात्रेय दामोदर टिळक - हे पेशाने कापडगिरणी-तंत्रज्ञानाचे अभियंते होते. निवृत्त होतेवेळेस ते जळगावच्या खान्देश मिल्स या गिरणीतून मुख्य अभियंता व व्यवस्थापकाच्या हुद्द्यावर काम करीत होते [].

बाळ दत्तात्रेय टिळकांचे शालेय शिक्षण जळगावातच झाले. इ.स. १९३३ साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. इ.स. १९३७ साली त्यांनी बी.एस्सी परीक्षेत पहिल्या श्रेणीत अव्वल क्रमांक मिळवला. यानंतर कापडनिर्मितीत वापरल्या जाणाऱ्या रंगांच्या अभ्यासासाठी त्यांनी मुंबईच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेच्या बी.एस्सी.टेक. पदवी अभ्यासक्रमास [] प्रवेश घेतला व इ.स. १९३९ साली तो यशस्वीरित्या पुरा केला. पुढील उच्चशिक्षणासाठी ते इंग्लंडास ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले. तिथे नोबेल पारितोषिकविजेते शास्त्रज्ञ रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन, प्रशिक्षण घेतले. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना इ.स. १९४६ साली डी.फिल., तर इ.स. १९६० च्या दशकात डी.एस्सी., या पदव्या बहाल केल्या.

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c "बाळ दत्तात्रेय टिळक - ॲन ऑबिच्युअरी (अर्थ: बाळ दत्तात्रेय टिळक - निधनवृत्त)" (इंग्लिश भाषेत). 2004-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ मे, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे