Jump to content

बाळ (नाव/आडनाव)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


 •  बाला (नाव/ आडनाव), बाल (नाव/ आडनाव) आणि बाली (नाव/ आडनाव) लेखसुद्धा निःसंदिग्धीकरणासाठी या लेखाकडे पुर्ननिर्देशीत होतात. बालाजी (निःसंदिग्धीकरण) हे स्वतंत्र निःसंदिग्धीकरण पान आहे.

मराठीमध्ये अनेकदा बाळ हे मुलाचे व बाळी हे मुलीचे टोपणनाव असते. हेच नाव अनेकदा प्रसिद्ध होते. इतर भाषांमध्येसुद्धा हे दिसून येते (Enfant/Enfanta - स्पॅनिश). बाळ हे मराठी आडनावही असते.

महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.

नावात बाळ

  • बाळ आपटे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे कार्यकर्ते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक व दिवंगत माजी खासदार
  • बाळ आंबेरकर - मुंबई महापालिकेतील नगरसेवक
  • बाळ करंदीकर - संगीतकार, गायक, रेडिओ-दूरचित्रवाणी कलाकार
  • बाळ कर्वे - चित्रपट आणि नाट्य अभिनेते
  • बाळ कुरतडकर - नभोवाणी निवेदक
  • बाळ कोल्हटकर - बाळकृष्ण हरी कोल्हटकर, नाटककार
  • बाळ गंगाधर टिळक - विद्वान पत्रकार, लेखक आणि राजकारणी
  • बाळ गाडगीळ - अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक
  • बाळ गोसावी - राजा गोसावीचे धाकटे बंधू
  • बाळ जुवाटकर - नाटक-चित्रपटांसाठी कपडे पुरवणारे, रंगभूषाकार आणि वेशभूषाकार
  • बाळ ज. पंडित - क्रिकेट समालोचक
  • बाळ ठाकरे - संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते
  • बाळ दळवी - उपक्रमशील शेतकरी
  • बाळ दाणी - भारतीय क्रिकेट खेळाडू
  • बाळ धुरी - मराठी ताटक-चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते
  • बाळ पवार - कामगार रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत
  • बाळ पळसुले - मराठी चित्रपटांचे संगीतदिग्दर्शक
  • बाळ फोंडके - वैज्ञानिक लेखक
  • बाळ बापट - मराठी चित्रसृष्टीतील गाजलेले छायाचित्रकार
  • बाळ भागवत - आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरचे गायक
  • बाळ माटे - मराठी लेखक
  • बाळ शेडगे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर प्रमुख(इ.स.२०१२)
  • बाळ सराफ - चित्रपट संकलक
  • बाळ साने - हरिभाऊ साने क्रीडा प्रतिष्ठान (पुणे)चे अध्यक्ष
  • बाळ सामंत - लेखक
  • बाळ सीताराम मर्ढेकर - कवी
  • बाळ हरदास - शिवसेनेतून हकालपट्टी(२१-१०-२०१०)झालेले माजी संपर्कमंत्री
  • बाळकराम - राम गणेश गडकरी (लेखक)
  • बाळकोबा भावे - विनोबा भावे यांचे बंधू
  • बाळकृष्णराव हरिहर पटवर्धन - बखरकार
  • बाळशास्त्री घगवे - संस्कृत कवी, शास्त्री, मराठी वैयाकरणी आणि शब्दकोशकार
  • बाळशास्त्री जांभेकर - मराठीतले आद्य वृत्तपत्रकार
  • बाळशास्त्री हरदास -एक विद्वान वक्ता
  • बाळा कारंजकर - होनाजीची कवने गाणारा गायक(होनाजी बाळातला बाळा)
  • बाळा नांदगावकर - आधी शिवसेनेचे आणि नंतर मनसेचे आमदार
  • बाळाचार्य - रसमंजिरी या संस्कृत काव्याचे मराठी रूपांतरकार
  • बाळाजी अंबाजी - संस्कृतमधील विवेकसार या ग्रंथाचे मराठी भाषांतरकार
  • बाळाजी आवजी चिटणीस - शिवाजीच्या कार्यालयाचे चिटणीस
  • बाळाजी गणेश कारकून - पेशव्यांच्या चिटणिसाचा कारकून(पेशव्यांची बखर लिहिणारा-इ.स.१७८३)
  • बाळाजी जनार्दन भानू - नाना फडणीस
  • बाळाजी बाजीराव - नानासाहेब, मराठी राज्याचा तिसरा पेशवा
  • बाळाजी विश्वनाथ - पहिला पेशवा
  • बाळाराव सावरकर - वि.दा.सावरकरांचे सहकारी, लेखक
  • बाळू गुप्ते - क्रिकेट खेळाडू
  • बाळूताई खरे - मालतीबाई बेडेकर (लेखिका)
  • बाळू शांताराम ढोरे : पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेलेला पुणे जिल्ह्यातील गुंड
  • बाळू सुर्वे : जामसंडेकर यांच्या खुनाची अरुण गवळीला सुपारी देणारा मुंबईच्या उपनगरातील बांधकाम व्यावसायिक
  • होनाजी बाळा - पहा : बाळा कारंजकर

नावा/आडनावात बाळ

  • दत्ता बाळ - कोल्हापुरातील एक तत्त्वज्ञ
  • प्रकाश बाळ - विचारवंत लेखक
  • विद्या बाळ - विचारवंत समाजसेवक लेखिका
  • होनाजी बाळा (होनाजी सयाजी शेलारखाने-पेशवाईतील शाहीर)
  • पी. बाळू - क्रिकेटखेळाडू (इ.स. १८७६ साली धारवाड येथे जन्मलेले व मुंबईच्या हिंदू जिमखान्याचे पालवणकर बाळू; त्यांच्या नावाचा ’पी. बाळू रोड’ मुंबईत प्रभादेवीला आहे.)
  • टी. बाळू - बाळ ठाकरे


पदवीत बाल

  • बाल गंधर्व - नारायण राजहंस(मराठी गायक अभिनेते)
  • बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे (मराठी कवी)

हे सुद्धा पहा

बाळावरून नावे