बालाजी मंदिर (रुई)
कोल्हापूर - इचलकरंजी रस्त्यावर कोल्हापूरहून साधारणत : २५ कि . मी . अतरावर असलेल्या रूई या छोट्याशा टुमदर गावी असलेल्या प्राचीन व्यंकटेश ( बालाजी ) मंदिरास भेट देणे हा एक आनंददायी अनुभव आहे . इचलकरंजीहा हे मंदिर तर अवघ्या पाच ते सहा कि . मी . अंतरावर आहे . कोल्हापूर - इचलकरंजी रस्त्यावर रूई फाट्याने आपण आतमध्ये गावात प्रवेश करताच आपणास वर भव्य मंदिराच्या सुबक शिखराचे दर्शन होते . मंदिरासमोरच असलेल्या पुरातन पिंपळाचा वृक्षही आपल्या नजरेत भरतो . याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पंचक्रोशीतील उंच अशा ठिकाणी हे मंदिर आहे . काळ्या दगडामधील हेमाडपंथी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश करताच लक्ष वेधून घेतात ते म्हणजे मोठ - मोठ्या काळ्या शिळेतून घडवलेले खांब व छताचे दगड व त्यावरील नक्षी . दगडी चौकट असलेल्या दरवाज्यातून गाभाऱ्यात प्रवेश करता येतो . दरवाज्याची उंची कमी असल्यामुळे साहजिकच वाकून नम्रपणे गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो . मंदिराचे पूर्ण बांधकाम हे काळ्या कभिन्न दगडामध्ये असल्यामुळे तेथे एक नैसर्गिक थंडावा जाणवतो . परंतु थंडीच्या दिवसात मात्र मंदिरामध्ये बोचरी थंडी जाणवतो नाही , तर उबदारपणा जाणवतो , गाभाऱ्याचे छतही वैशिष्टयपूर्ण असून गाभाऱ्याच्या भिंतीपासून वर चढत जाऊन मध्यभागी चारी बाजूने एकत्र आलेल्या शिळा पाहून आश्चर्य वाटणे साहजिक आहे . या मंदिरात सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे येथील असलेली श्री व्यंकटेश यांची नितांत सुंदर मूर्ती होय . या मूर्तीचे वैशिष्टय म्हणजे ही मूर्ती वालुकामय पर असून सजीव भासते . या मूर्तीची आख्यायिकाही खूप विलक्षण आहे . ती अशी पुरातन काळी रूई येथील देवजीबीन कुलकर्णी हे निस्सीम व्यंकटेश भक्त होते . दरवर्षी ते चालत तिरूपती वारी करत . नंतर वृद्धापकाळामध्ये एका वारीचे वेळी तिरूपतीमध्ये त्यांच्या मनात असा विचार आला की , यापुढे वृद्धापकाळामुळे आपल्याला वारी करणे शक्य होणार नाही व व्यंकटेशाचे दर्शन यामुळे होणार नाही . याच विचारात ते झोपी गेले असता स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला की , उद्या सकाळी तिरूपती समोरील पुष्करणीत ( तलावामध्ये ) तुला माझी मूर्ती सापडेल . अशाप्रकारे भवताच्या आर्त हाकेमुळे श्री व्यंकटेश या मूर्तीरूपाने रूई येथे आलेले आहेत . मंदिराचा परिसरही भव्य व हवेशीर आहे . मंदिराच्या आवारात उभे राहिल्या येथील उंचीमुळे पूर्ण पंचक्रोशीचे दर्शन होते . आवारात असलेल्या प्रचीन पिंपळवृक्षाची भव्यता मनास भावते . पिंपळाच्या कट्टयावर बसल्यास आजुबाजुच्या शेत शिवारातील हिरवाई व येथून येणारा ताजा गार वारा यामुळे , मनाचा थकवा कुटच्या कुठे पळून जातो . मन प्रसन्न होते . या मंदिराजवळच श्री विठ्ठलाचे टुमदार मंदिर बांधलेले आहे . . श्री हरी मंदिर हत्तरगी येथल बम्हीभूत श्री हरीकाका गोसावी यांच्या आदेशाने , बृम्हीभूत श्री . एकनाथदादा गोसावी यांच्या प्रेरणेने व मठाचे विद्यमान पिठाधिश श्री . आनंदआण्णा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा जिर्णोद्धार व दैनंदिन धार्मिक विधी सुरू आहेत . रूई येथीर ज्येष्ठ ग्रामस्थ व निस्सिम व्यंकटेश भवत श्री . रामचंद्र दत्त कागले यांनी या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी भगिरथ प्रयत्न केले आहेत . मंदिराचे स्थानिक पुजारी कै . राmaचंद्र नारायण कुलकर्णी यांच्या प्रेरणेने श्री . सुहाsa रामचंद्र कुलकर्णी हे मंदिराच्या इतर मान्यवर ट्रस्टी , पाटील कुलकर्णी परिवार , ग्रामस्थ भक्त मंडळ यांच्या मदतीने पूजा अर्चा दैनंदिन कामे पाहतात . मंदिराच्या जिर्णोद्धार कामी इचलकरंजी कार्यक्षम माजी आमदार श्री . प्रकाशआण्णा आवाडे यांनी वैयक्तिय व शासकीय पातळीवर मोठी मदत केली आहे . आपल्या कामातून वेळ काढून आपण नेहमीच श्री तिरूपतीsa जाऊ शकतao असे नाही . परंतु रूई येथे मात्र आपण अध्या - पाऊण तासाच्या ड्राईव्हमध्ये पोहचू शकाल . यामुळे येत्या आठवडी सुट्टीत रूईला चला सहकुटुंब बालाजी दर्शनाला . जाण्याचा मार्ग
१ ) कोल्हापूर - इचलकरंजी मार्गावर रूई फाट्यावरून रूई गावात जाणे . एस . टी . ने जावयाचे असल्यास रूई फाटा येथे उतरणे , तेथून गावा जाण्याकरिता एस . टी . बसेस , रिक्षा ( शेअर रिक्षा ) उपलब्ध आहेत . २ ) स्वत :च्या गाडीने जात असाल तर आपण कोल्हापूर - इचलकरंजी रस्त्याने रू फाटामार्गे रूईला पोहोचू शकता . 3)https://goo.gl/maps/vBgjycswjxUfm29E8