बालवाडी
बालवाडी किंवा शिशुवर्गात मुले वयाच्या २ वर्षी दाखल होतात. भारतात शाळेत दाखल्यासाठी किमान वयमर्यादा ५ वर्षे आहे. त्याआधी २ ते ३ वर्षे मुले/मुली बालवाडी/शिशुवर्गात (प्लेग्रुप मध्ये ) घालवतात. बालवाडी मध्ये मुलं बोलणे, वागणे, वावरणे व विविध समन्वय शिकतात. विविध शैक्षणिक खेळ जसे रंग ओळखणे, आकार ओळखणे, चित्र काढणे/रंगवणे इत्यादी क्रिया बालवाडी मध्ये शिकवल्या जातात.
देणगी हा एक प्रश्न
मोठ्या शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक पालक आपल्या मुलाचा प्रवेश भरपूर देणगी देऊन घेतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे चांगल्या शाळाकरिता असेलली स्पर्धा हे होय. वयवर्षे सहानंतरचे शिक्षण भारतीय घटनेतील आधीकारा्च्या कक्षेत येत असल्याने बालवाडी/शिशुवर्गात प्रवेश घेणे अपरिहार्य असते. या प्रवेशा करिता मोठ्या व बळजबरी स्वरूपाच्या देणग्या घेतल्या जात्तात याची माध्यमातून चर्चा असते [१].
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2010-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-12-03 रोजी पाहिले.