बार्डी
?बार्डी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | करकंब |
विभाग | पुणे |
जिल्हा | सोलापूर |
तालुका/के | पंढरपूर |
लोकसंख्या | १,२०० (२०११) |
भाषा | मराठी |
बार्डी,पंढरपूर तालुक्यातील एक १२०० लोकसंख्या असलेलं छोटसं गाव. नुकतीच गावाची आदर्श गाव योजनेत निवड झाली. गावामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने राहतात. गावालगत जवळ जवळ ३०० हेक्टर एवढी वनराई असूनसुद्धा पावसाच प्रमाण खूपच कमी आहे.[१] शेतीसाठी पूर्णता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारं,त्यामुळे कायम दुष्काळ-जन्य परीस्थिती असणारं हे गाव. मग या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गावातील सर्व शेतकरी ठीबक सिंचाकडे वळले आणि उन्हाळ्यात-सुद्धा शेतीला पाणी मिळावं म्हणून पुढं जाऊन सर्वांनी शेत-तळ्याची निर्मिती केली.
दळण वळण
बार्डी,पंढरपूर तालुक्याच्या उत्तरेला ३० किमी असणारं सीमेवरच हे गाव पण आजही गावामध्ये ST बसची सुविधा उपलब्ध नाहीं.
शिक्षणसुविधा
गावात जिल्हा परिषदेची सातवी पर्यतची शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी मुलांना तालुक्याला जावे लागते. यामुळे गळतीचे प्रमाण खूप आहे. अनेक वर्षांपासून पुढील व्यवस्था होण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. पण केवळ आश्वासने मिळत आहेत.[२]
संदर्भ
- ^ "बार्डीच्या वनात वन्यजीव प्राण्यांची ससेहोलपट". सकाळ दैनिक. २२ मे, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link] - ^ "जिल्ह्यात हव्यात आणखी 68 शाळा". सकाळ दैनिक. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)