बाराक्षार पद्धती
बाराक्षार पद्धती यांना इंग्रजीत बायोकेमीक रेमीडीज असेही म्हणतात. या चिकित्सा पद्धतीची 'सुरुवात' डॉ. सॅम्युएल हॅनेमन या जर्मन वैद्यकशास्त्रज्ञाने केली. शरीरातल्या काही लवणांमुळे निरनिराळी लक्षणे शरीर दाखवते असे मत त्यांनी मांडले. शरीराच्या लक्षणांनुसार उपचार केले पाहिजेत या विचारावर आधारीत ही पद्धती आहे. या पद्धातीवर डॉ. स्टाफ यांनीही मते मांडली. पण त्याला मूर्त स्वरूप मात्र डॉ. विलियम सुशलर यांनी दिले.
या पद्धती मध्ये बारा प्रकारचे क्षार शरीरातली निरनिराळी कामे करतात असे मानले जाते. जेंव्हा या क्षारांचे प्रमाण कमी जासत होते तसे शरीराच्या त्या भागाचे काम विस्कळीत होते. तो क्षार शरीराला पुरवला तर परत शरीर योग्य प्रकारे काम करू लागते. अशी साधारणपणे ही पद्धती काम करते.
बारा प्रकारचे क्षार
यामध्ये खालील बारा क्षार आहेत
- कल्केरिया सल्फ्युरीका
- फेरम फॉस्फोटीकम
- कॅलीमूरएटिकम
- काली फॉस्फोरिकम
- काली सल्फ्युरिकम
- मॅग्नेशिया फॉस्फोरेका
- नायट्रम म्युरेटिकम
- नायट्रम फॉस्फोरिकम
- नायट्रम सल्फ्युरिकम
- सायलिशिया
- कल्केरिया फ्लोरिका
- कल्केरिया फॉस्फोरिका
या औषधी वेगवेगळ्या रोगांवर कामी येतात असा दावा केला जातो.. या औषधांना क्रमवारीने वेगवेगळ्या ताकदी आहेत जसे ३ एक्स, ६ एक्स ते २०० एक्स. शारीरिक अवस्था व वेळेनुसार कमी व जास्त ताकदीची औषधे दिली जातात. ही औषधे प्राण्यांवर व वनस्पतींवरही काम करतात असा दावा केला जातो.