बाभळगांव
?बाभळगांव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • ५१५ मी |
जवळचे शहर | लातूर |
प्रांत | मराठवाडा |
विभाग | औरंगाबाद विभाग |
जिल्हा | लातूर |
लोकसंख्या | ७,३५३ (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | प्रिया सचिन मस्के |
उपसरपंच | गोविंद शेषेराव देशमुख |
संसदीय मतदारसंघ | लातूर |
तहसील | लातूर |
पंचायत समिती | लातूर तालुका |
ग्रामपंचायत | बाभळगाव |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४१३५३१ • +०२३८२ • MH-24 |
संकेतस्थळ: Maharashtra.gov.in |
बाभळगाव हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील व तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव लातूर जवळ ७ किमी अंतरावर वसलेले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या घराण्यातील एक पूर्वज "रेेणुकोजी देशमुख" यांनी इ.स.च्या १५ व्या शतकात हे गाव वसवले. आपल्या अभिनयाने भारतभर बाभळगावच नाव गाजविणारे अभिनेते रितेश देशमुख हेही इथलेच आहेत. बाभळगाव हे तावरजा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे.मांगवाडा,मुळे गल्ली,भाडूळे गल्ली, देशमुख गल्ली,कुंभार गल्ली,कलाल गल्ली, दिलीप नगर,भगीरथ नगर आणि अर्जुन नगर हे या गावातील भाग आहेत.
शिक्षणसंस्था
- १.जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,बाभळगांव ता.जि.लातूर
- २.दयानंद प्राथमिक विद्यालय, बाभळगांव, ता.जि.लातूर
- ३.दयानंद विद्यालय बाभळगांव, ता.जि.लातूर
- ४.कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाभळगांव,ता.जि.लातूर
- ५.दयानंद नर्सिंग कॉलेज, बाभळगांव,ता.जि.लातूर
- ६.सुवर्णदीप इंग्लिश स्कुल,बाभळगांव,ता.जि.लातूर
- ७.युनिक इंटरनॅशनल स्कुल ,बाभळगांव, ता.जि.लातूर