Jump to content

बाबुलाल गौर

बाबुलाल गौर

बाबुलाल गौर (जन्म : प्रतापगढ जिल्हा-उत्तर प्रदेश, २ जून १९३०; - २१ ऑगस्ट २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे नेते व २००४ सालच्या ऑगस्ट महिन्यापासून ते २००५ सालच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

कामगार नेता ते मुख्यमंत्री

बाबुलाल गौर सन १९५१ पर्यंत मजूर नेता झाले होते. त्यांच्या कामामुळे खुश झालेले जाॅर्ज फर्नांडिस बाबुलाल गौरांना भोपाळमध्ये येऊन भेटले, पण त्यांच्यापासून दूर राहून बाबुलाल अखिल भारतीय टेक्सटाईल लेबर युनियनचे उपाध्य्क्ष बनले. त्यानंतर १९६४मध्ये ते भारतीय मजदूर संघाचे संस्थापक सदस्य झाले.

त्याआधी सन १९४६पासून बाबुलाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये जाऊ लागले होते. १९५६मध्ये संघाची टोपी घालून नागपूर स्टेशनच्या गेट नं. १ वर रेल्वेतून उतरलेल्या प्रवाश्यांना पाणी पाजताना त्यांना पंडित नेहरूंची पाहिले. ही टोपी 'तुम्हाला फार शोभून दिसते आहे' असा नेहरूंनी शेरा दिला.

४ जानेवारी १९७५ रोजी जयप्रकाश नारायण (जेपी) भोपाळमध्ये आले होते. बाबुलाल त्यांना रेल्वे स्टेशनवर जाऊन भेटले. पाच महिन्यांनंतर राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान बाबुलाल हे जेपींच्या सांगण्यावरून सरकारविरुद्धच्या एका 'धरण्या'मध्ये जाऊन बसले, आणि त्यांना अटक झाली. पण आणीबाणी संपल्यावर त्यांची सुटका झाली. जेपींनी त्यांना मध्य प्रदेश (म.प्र.)विधामसभेची १९७७ सालची निवडणूक लढविण्यास सांगितले. कुशाभाऊ ठाकरे यांची संमती मिळतात बाबुलाल गौर यांना दक्षिण भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला, आणि ते काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार लाडलीशरण सिन्हा यांना मोठ्या फरकाने हरवून मध्य प्रदेश विधानसभेत गेले. यापूर्वी १९५९मध्ये झालेल्या भोपाळ महापालिकेच्या निवडणुकीत याच लाडलीशरण सिन्हांनी बाबुलालांना ३८ मतांनी पराजित केले होते.

त्याआधी १९७४ साली बाबुलाल गौर हे एका पोटनिवडणुकीतून आमदार झाले होते. १९७७नंतर ते सतत नऊवेळा म.प्र. विधानसभेच्या निवडणुका जिंकत राहिले. १९९० साली सुंदरलाल पटवा सरकारमध्ये ते नागरी प्रशासन मंत्री झाले आणि २००४ साली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

बाबुलाल गौर यांची समाजावर चांगली पकड होती आणि त्यावेळी आणि विरोधी पक्षांतील लोकांशी दोस्ती होती.

परत आमदार

वयाची पंच्याहत्तरी झाल्यावर पक्षादेशानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते परत साधे आमदार झाले.

आमदारकीच्या कारकिर्दीत बाबुलाल गौर यांनी मध्य प्रदेशात केलेली केलेली कामे

  • भोपाळ- इंदूर विमानसेवा सुरू करवली.
  • जे ऑटो टेस्टिंग ट्रॅक्ट सेंटर चेन्नईत होणार होते, तो प्रयत्न करून म.प्र.मधील पिठमपूर गावात आणायला लावले.
  • भोपाळमधील गांधी मेडिकल काॅलेजातील मुलींच्या हाॅस्टेलमध्ये फक्त दहा खोल्या होत्या, त्या वाढवून १०० केल्या.
  • भोपाळमध्ये सध्याच्या व्ही.आय.पी. रोडच्या जागी एक तुटका फुटका कच्चा रस्ता होता. त्याचे रूपांतर प्रशस्त दिमाखदार रस्त्यात केले.
  • नदी-जोड प्रकल्पासाठी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी मुद्देसूद वाद घालून केन-बेटवा आणि चंबळ-पार्वती ह्या नदीजोडांना संमती मिळवली.
  • जबलपूरला आयआयटी आणि ग्वाल्हेरला कृषि महाविद्यालय मिळवून दिले.
  • इंदूरला त्यांच्याच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी काही किरकोळ मागण्यांसाठी विमाने रोखून धरली. बाबुलाल गौर यांनी पोलिसांकडून बळाचा वापर करून हे बंड मोडून काढले. कार्यकर्त्यांवर कोर्टात मुकदमे दाखल केले. असे यापूर्वी कधी झाले नव्हते.
  • भोपाळ शहरातील सुखसोयींच्या आड येणारी बांधकामे निष्ठूरपणे बुलडोझर लावून पाडायला लावली. परिणामी लोक बाबुलालांना बुलडोझर मुख्यमंत्री म्हणू लागले. भोपाळमधील रस्त्यांचे रूंदीकरण.
  • पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासमोर बैठा सत्याग्रह करून भोपाळ गॅस कांडातील पीडित लोकांना परिसरातील बॅंंकांकडून २००-२०० रुपयांची अंतरिम मदत मिळवून दिली.
  • भोपाळमधील सिद्दीक हसन खानाच्या मशिदीची दुरुस्ती.
  • 'बडा बागे'तील बावडीचे रूप बदलले. बडा बागेचे सौंदर्यीकरण.
  • हबीबगंज रेल्वे क्राॅसिंगच्या जागी अंडरब्रिज बनवला.
  • ऐशबाग स्टेडियममध्ये पाॅलिग्रास पसरवला.
  • भोपाळमधील धाकट्या तलावाच्या किनारी बगीचा बनवला.
  • त्या तलावात मानवी हस्तक्षेप होऊ नये म्हणून भोवताली जाळी बसवली.
  • नवाब सिद्दीक हसन तलावाच्या परिसरात होऊ घातलेल्या नव्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी नाकारली.
  • रस्त्याच्या कडेने झाडे लावली, रस्ता दुभाजक बसवले. ,,.वगैरे...

राजकीय कारकीर्द-थोडक्यात

  • सन १९५२ - जनसंघ मजदूर संघाची स्थापना
  • १९५६ - म.प्र. जनसंघाचे कार्यालयात सचिव झाले
  • १९५९ - भोपाळ महापालिकेच्या बरखेडी मतदारसंघातून नगरसेवकाची निवडणूक लढवली; हरले.
  • १९६२ - जनसंघाच्या भोपाळ कार्यालयाचे सचिव झाले.
  • १९६४ - (जनसंघ प्रणीत) भारतीय मजदूर संघाची स्थापना
  • १९६५ - गोवा मुक्ति आंदोलनात सहभाग
  • १९७४ - पोटनिवडणुकीद्वारा आमादार झाले.
  • १९७५ - जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात सामील झाले.
  • २३ ऑगस्ट २००४ पासून २९ नोव्हेंबर २००५पर्यंय म.प्र.चे मुख्यमंत्री
  • ३० जून २०१६ रोजी गृहमंत्रिपदाचा राजीनामा.



मागील
उमा भारती
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
ऑगस्ट २००४−नोव्हेंबर २००५
पुढील
शिवराजसिंह चौहान