बाबासाहेब आंबेडकरांबद्दल व्यक्त झालेली मते
या लेखात उल्लेखनीय अशा भारतीय व विदेशी व्यक्तींद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते समाविष्ट करण्यात आली आहेत.
भारतीय व्यक्तींची मते
नेहरू हे इतरांपुढे रस्त्यावर उभे आहेत. ते जगापुढील आपले प्रवक्ते होते, परंतु एक पुरोगामी विचारसरणी असलेले विद्वान डॉ. आंबेडकर, ज्यांचा ‘जातीय उच्चाटन’ (Annihilation of Caste) हा लेख आपल्यातील बऱ्याच जणांसाठी एक चमकदार मॉडेल आहे, ते आणि त्यांचे कार्य हे पूर्वीपेक्षा आज खूप उंच दिसत आहे.
“डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि मते अशावेळी अतिशय प्रभावीपणे तिकतेच सुलभपणे ते मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५ च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.”
सुप्रसिद्ध घटनातज्ज्ञ, [२]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज बिल’ याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे. तसेच डॉ. आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिम धर्माची दीक्षा दिली नाही, याचेही सर्व हिंदूंनी आयुष्यभर आभार मानले पाहिजेत.
तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका. येडपटांनो, तुमच्या भाग्याने तुम्हांला डॉ. आंबेडकरांसारखा तरणाजवान, तुमच्या हाडारक्तामांसाचा पुढारी लाभला असताना, तुम्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा. लांडगा चालेल काय? त्या आंबेडकरांना जाऊन भेटा. तेच तुमचे कल्याण करणार. बाकीचे आम्ही सारे बाजूने पोहणारे. समजलात?
बाबासाहेबांचा लढा सर्व अल्पसंख्याकांसाठी’ या लेखात म्हणतात, ‘१९४७ साली साने गुरूजींनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले. तेव्हा बाबासाहेबांनी सरळ सांगून टाकले, ‘‘मंदिरप्रवेशावर त्या वेळी (१९३०-३१) माझा विश्वास होता. पण मागून ती चूक माझ्या लक्षात आली. माझ्या आयुष्यात मी अनेक चुका केल्या आहेत. पण त्या चुका मला कळून आल्यानंतर पुन्हा मी त्या केल्या नाहीत. त्या वेळी मला वाटले होते, की आम्हीही माणसेच असल्याने आम्ही असल्या मानवी हक्कांना का मुकावे? ते मानवी हक्क मिळवावे त्यासाठी सत्याग्रह करावा, तसाठी वाटेल त्या हालअपेष्टा भोगाव्यात, असे मला वाटत होते. पण आता मी अनुभवाने शहाणा झालो आहे. अशा तऱ्हेच्या झगडय़ात काही तथ्य नाही अशी आता माझी पूर्ण खात्री झाली आहे.
इंग्लंड- अमेरिकेच्या विद्यापीठीय वातावरण वावरल्याने डॉ. आंबेडकरांच्या पाश्चात्त्य उदारमतवादाचे दृढ संस्कार झाले होते. भारताची राष्ट्रीय एकात्मता अभंग राहिली पाहिजे, याबद्दल त्यांना इतर मोठमोठय़ा राष्ट्रीय नेत्यांइतकीच कळकळ होती. संसदीय लोकशाहीवर तर त्यांचा अढळ विश्वास होता; पण राजकीय पक्ष व कामगार संघटना यांचे नेते राजकीय व आर्थिक प्रश्नांवरच सर्व लक्ष केंद्रित करून सामाजिक प्रश्नांची अगदीच उपेक्षा करीत होते, असा अनुभव त्यांना वारंवार आला.
१९२३ साली डॉ. आंबेडकरांना लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील त्यांच्या ‘द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी’ या प्रबंधाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी दिली. ही पदवी मिळविणारे ते पहिलेच भारतीय विद्यार्थी असावेत. डॉ. आंबेडकरांनी परदेशात अर्थशास्त्राचे जे अध्ययन केले त्यामुळे दलित जाती-जमातींना जे दारिद्र्य भोगावे लागत आहे त्याचे कारण म्हणजे त्यांचे सर्व बाजूंनी होणारे आर्थिक शोषण, हे त्यांच्या लक्षात आले. आर्थिकदृष्ट्या परावलंबी असलेला हा समाज जी मानसिक गुलामगिरी भोगत होता त्याचे मूळ हिंदू समाजव्यवस्थेत आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांना अस्पृश्यतेच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी वेगवेगळी पावले उचलली.
‘डॉ. आंबेडकरांचे जीवन म्हणजे एक अखंड, उग्र ज्ञानसाधना होती. ते खरेखुरे क्रियावान पंडित होते. भगवान बुद्धांचा धम्मविचार, कबीरांचा प्रेमभाव आणि जोतिरावांची बंडखोरी बरोबर घेऊन बाबासाहेबांनी भारतीय इतिहासाच एक विराट कालखंड आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने उजळून टाकला आहे. डॉ. आंबेडकरांनी विविध पुस्तकांतून अस्पृश्यता निर्मूलनाच्या आपल्या लढय़ाची तात्त्विक भूमिका मांडली. दुसऱ्या आघाडीवर गोलमेज परिषदेपासून तो घटना परिषदेपर्यंत वेगवेगळ्या प्रसंगी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी हक्कांची मागणी केली आणि तिसऱ्या आघाडीवर अस्पृश्यांना एका झेंडय़ाखाली आणण्यासाठी रक्ताचे पाणी केले. तसेच सभा, परिषदा, मेळावे, वार्ताहर परिषदा, बैठका, चर्चा इत्यादी अनके मार्गानी जनजागरणाचा वेग कायम ठेवला.
डॉ. आंबेडकरांनी कष्टाने विद्या मिळविली आणि केवळ पदवी घेण्यापुरता त्यांचा विद्येशी संबंध नव्हता. ते प्रकांडपंडित होते. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास अशा विषयांवर त्यांनी केलेले लिखाण व त्यांची भाषणे याची साक्ष देतात. त्यांचा हा गुण केवळ हरिजन बांधवांनीच नव्हे, तर सर्व समाजाने व त्यातही पुढाऱ्यांनी लक्षात घ्यावयास हवा. कोणतेही विधान पुराव्याशिवाय ते करीत नसत आणि त्यांचा भर युक्तिवादावर होता. स्वत:च्या मतांवर त्यांची श्रद्धा होती आणि ती मते मांडून लोकांचे मतपरिवर्तन करण्याची तळमळ होती.
धर्मातराची घोषणा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘‘माझ्या धर्मातराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही.’’ सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर बुद्धाचा धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे अशी त्यांची खात्री झाली, म्हणूनच त्यांनी तो धर्म स्वीकारायचे ठरविले. ते म्हणाले, ‘‘बुद्धाचा धर्म हा खरा मानवी धर्म आहे. मानवाच्या संपूर्ण विकासासाठी तो निर्माण केलेला आहे. तो प्रत्येक आधुनिक आणि बुद्धिवादी माणसाला पटण्यासारखा आहे. बुद्धाची शिकवण अगदी साधी आणि सोपी आहे. त्या धर्मामध्ये मनुष्याला पूर्ण वैचारिक स्वातंत्र्य दिलेले आहे. मानवतेला आणि सदसद्विवेकबुद्धीला ज्या गोष्टी पटतील त्याच त्या धर्माने ग्रा मानलेल्या आहेत.’’ महात्मा गांधींनी अस्पृश्यांना ‘हरिजन’ बोलावून स्पृश्यांच्या दयेचा आणि सहानुभूतीचा विषय बनवले. पण आंबेडकरांनी लक्षावधी अस्पृश्यांना ‘बौद्धजन’ बनवून त्यांच्या मुक्तीचा आणि आत्मोद्धाराचा चिरंतन दीपस्तंभ त्याच्यासमोर बांधून ठेवला... हिंदुधर्मावर सूड घेण्यासाठी आंबेडकरांनी आणि त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला, ही गोष्ट खोटी आहे. हिंदू धर्मावर त्यांना सूड घ्यावयाचा असता तर त्यांनी इस्लामचा किंवा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला असता, पण ‘भारताच्या इतिहासात देशाचा आणि धर्माचा विध्वंसक म्हणून माझे नाव राहावे अशी माझी इच्छा नाही!’ असे ते नेहमी म्हणत. भारताच्या अखंडत्वावर त्यांची गाढ श्रद्धा होती. घटना समितीच्या पहिल्याच बैठकीत ‘हिंदुस्थान हा काही झाले तरी अखंडच राहिला पाहिजे. मुस्लिम लीगचे पाकिस्तानचे धोरण चूक आहे!
जगातल्या महापुरुषांचा इतिहास अगदी सारखा आहे, पण आंबेडकर हा या जगात एकच असा महात्मा होऊन गेला की यमयातनेच्या ज्या भयंकर अग्निदिव्यातून त्याला सारा जन्म जावे लागते, तसे जगातल्या दुसऱ्या कोणाही महापुरुषाला जावं लागले नसेल. आंबेडकर जर ब्रिटिशांचे हस्तक आणि देशद्रोही असते तर त्यांना उघडपणे ब्रिटिश सरकारची नोकरी पत्करून परमोच्च सन्मानाचे पद मिळवता आले असते! त्यांच्यासारख्या अलौकिक बुद्धीच्या आणि विद्वत्तेच्या माणसाला ब्रिटिशांच्या राज्यात दुष्प्राप्य असे काय होते? बरे, काँग्रेसमध्ये प्रवेश करून महात्मा गांधींची कृपा संपादन करण्याचे त्यांनी मनात आणले असते तर तीही गोष्ट त्यांना काही अवघड नव्हती. काँग्रेसमध्ये त्यांनी पंडित नेहरूंच्या बरोबरीने सारे सन्मान मिळविले असते. त्यांच्या विद्वत्तेचा आणि सामर्थ्यांचा एकही माणूस आज काँग्रेसमध्ये नाही. पण ब्रिटिशांची सेवावस्त्रे त्यांनी अंगावर धारण केली नाहीत किंवा काँग्रेसच्या ‘देशभक्ती’ चा गणवेशही अंगावर त्यांनी चढविला नाही! सात कोटी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांनी सर्व सुखाचा, सन्मानांचा आणि लोकप्रियतेचा त्याग करून सर्वागावर काटेरी वस्त्रे चढविली आणि आपले जीवन रक्तबंबाळ करून घेतले.
नवभारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार, लोकशाहीचे त्राते नि मानवी स्वातंत्र्याचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक महान पर्व आहे. मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासाचे ते एक सोनेरी पान आहे. स्वत:च्या बुद्धिमत्तेवर विसंबून राहून जो गाढ तपश्चर्येने, अलौकिक धैर्याने नि अखंड उद्योगशीलतेने उच्च ध्येयासाठी अविरत झगडतो तो धुळीतून धुरंधराच्या मालिकेत जाऊन कसा विराजमान होतो हे सिद्ध करणारे उदाहरण आधुनिक भारतात अन्यत्र सापडणे कठीण आहे, परमपूज्य डॉ. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना बौद्धधर्माची दीक्षा दिली. भारतीय समाजाला सामाजिक समतेची, मानव्याची नि बुद्धिप्रामाण्यवादाची जाणीव देणारा हा धर्म आहे. त्यात कारुण्य नि विवेक यांचे दर्शन घडते. बौद्ध धर्माची दीक्षा देऊन भारतातील लोकशाहीनिष्ठ समाजवादाला त्यांनी नैतिक अधिष्ठान दिले आहे, असे म्हणणे योग्य होईल. बौद्ध धर्म देव मानीत नाही. आत्मा मानीत नाही. अर्थात मूर्तीची पूजा करून देव पावतो, असे आता त्यांच्या अनुयायांना म्हणता येणार नाही. मोक्षप्राप्तीची व स्वर्गाची कल्पना सोडून दिली पाहिजे. पूज्य बाबासाहेबांनीच सांगून ठेवले आहे, की मरणोत्तर मोक्षप्राप्तीकरिता तळमळणारी वृत्ती ही काल्पनिक आहे. स्वर्गीय नंदनवनावर खिळलेली दृष्टी ही आजच्या परिस्थितीत आत्मघातकी ठरली आहे.
डॉ. आंबेडकर अर्थशास्त्रामध्ये माझे गुरू आहेत. ते दलित व शोषितांचे खरे आणि प्रसिद्ध महानायक आहेत. त्यांना आजपर्यंत जो मान-सन्मान मिळाला आहे, ते त्या पेक्षाही खूप जास्त चे मानकरी आहेत. भारतात ते अत्यंत वादग्रस्त आहेत. परंतु त्यांच्या जीवन आणि व्यक्तिमत्वात काहीही विवाद योग्य नाही. जे त्यांच्या टीकेमध्ये म्हणले जाते, ते पूर्णपणे वास्तवापलीकडील आहे. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचे योगदान फार प्रभावी आहे. त्यासाठी त्यांना सदैव लक्षात ठेवले जाईल.
बाबासाहेबांबद्दल काहीही बोलणं हे मला असं वाटतं, जसं सूर्याला प्रकाश दाखवण्या सारखं आहे! आपण आपल्या घरांमध्ये नियम आणि कायदे नाही बनू शकत, त्यांनी एवढ्या मोठ्या देशाचे संविधान लिहून टाकले. स्वातंत्र्य मिळवणे एक गोष्ट आहे परंतु स्वातंत्र्य सांभाळणे वा टिकवणे खूप अवघड आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपण सारे सुरक्षित आहोत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नेते नव्हते, केवळे भारत देशाचे नेते नव्हते तर बाबासाहेब हे संपूर्ण जगाचे नेते होते.
डॉ. आंबेडकरांची राष्ट्राला खरी गरज आता आहे - तीही शीघ्रतेने.
महिलांच्या अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गरोदर महिलांना हक्काची रजा मिळवून देणारे बाबासाहेब हे जगातील पहिलेच व्यक्ती आहेत. त्यानंतर अनेक देशांनी आपापल्या देशामध्ये गरोदर महिलांसाठी सुटी लागू केली.
भारताच्या राज्यघटनेला ५० वर्ष पूर्ण झाली होती; तेव्हा इंग्लंडमध्ये संविधानावर चर्चा ठेवण्यात आली होती. त्यात जगभरातील संविधानाचे तज्ज्ञ अभ्यासक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी इंग्लडचे सर्वोच्च न्यायाधिश होते. चर्चेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असून त्यात एक अक्षर सुद्धा बदलण्याची गरज नाही, असे मत व्यक्त करण्यात आले होते. यावरून भारतीय राज्यघटनेची सर्वश्रेष्ठता सिद्ध होते.
डॉ. आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी डॉ. आंबेडकरांची झाले आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं. डॉ. आंबेडकरांसारख्या महामानवाच्या जीवनातील उत्तरार्धात अखेपर्यंत मी त्यांना सावलीसारखी साथ दिली. काया वाचा मने करून त्यांची सेवा केली, पूजा केली. जगाला भूषण वाटावे अशा युगप्रवर्तक महापुरुषाच्या जीवनाशी माझे जीवन निगडित झाले. यापेक्षा अधिक जीवनसाफल्य ते कोणते ?
डॉ. आंबेडकर हे सामाजिक क्रांतीचे प्रकाश आहेत.
तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे, की डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे, तर अशी एक वेळ येईल, की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते.
डॉ. आंबेडकरांमुळे आपले सारे प्रयत्न आणि पैसाही सार्थकी लागला. आज एका महत्कार्याची सफलता झालेली पाहिली. यश लाभास आले. डॉ. आंबेडकर हे दलितांचे मुक्तिदाता आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखिल कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे भारतात या क्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक ह्यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीण ऋषीपेक्षांही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ते घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता, की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरूडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती.
पाच हजार वर्ष हिंदूसमाजाने सात कोटी अस्पृश्यांचा अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. डॉ. आंबेडकर म्हणजे बंड, मूर्तिमंड बंड. त्यांच्या देहातील कणाकणांतून बंड थैमान घालित होते. आंबेडकर म्हणजे जुलूमाविरुद्ध उगारलेली वज्रमूठ होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक युद्धच होय.
मी जेव्हा डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो, तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय! असा भाव तेव्हा मला झाला. त्यांच्यासारख्या विद्यासंपन्न पुरूष जगात दुसरा असू शकत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर अस्तित्वाची व्यापक जाणीव झाली, डॉ. आंबेडकरांच्या साहित्याने आपण दलित आहोत आणि त्यातच वडार आहोत, याची जाणीव करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खूपच आदर निर्माण झाला, मग मी आमच्या घरात डॉ. आंबेडकरांचा एक छान फोटो लावला, तो माझ्या वडीलांना अजिबात आवडला नाही. ते म्हणाले, ‘‘हा महाराचा फोटो घरात का लावलास? लोक काय म्हणतील? काढून टाक ताबडतोब हा फोटो!’’ मी त्यांना सांगितले, ‘‘मी तर हा फोटो काढणार नाहीच, परंतु जर तुम्ही काढलात, तर तुमचे सारे देव मी बाहेर फेकून देईन, ह्या देवांनी तुम्हांला जे दिले नाही आणि देवू शकत नाहीत, अशा गोष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला दिल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठायी असलेले गुण इतके मोठे आहेत की, भारताचे मध्यवर्ती सरकार ते एकटे चालवू शकतील.
डॉ. आंबेडकर एक असे विद्वान आणि अद्वितीय वकील आहेत की, त्यांच्या समोर अनेकांना हार पत्करावी लागते. ते आपल्या प्रगाढ विद्वत्तेने अनेकांच्या ह्रदयाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य ठेवतात. त्यांच्या त्यागाची परिसीमा प्रचंड व्यापक आहे. ते एक नितळ जीवन जगतात. त्यांनी मनात आणलं तर ते केव्हाही युरोपमध्ये जाऊन राहू शकतात. परंतु ते ह्याची इच्छा ठेवत नाही. आपल्या दलित बांधवांचा उद्धार करणेच त्यांच्या जीवनाचे प्रमुख ध्येय आहे. त्यांना सतत शोषित वा अस्पृश्य वर्गाचे व्यक्ती असल्याच्या नात्यानेच संबोधित केले जात आहे. परंतु बुद्धिमत्तेच्या कसौटीवर ते हजारों सुशिक्षीत हिंदू विद्वानांपेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे विद्वान आहेत. त्यांचे वयक्तिक जीवन आमच्यापैकी कोणत्याही उच्च दर्जाच्या निर्मळ आणि स्वच्छ व्यक्तीहून कमी नाही. आजच्या घटनेत ते कायद्याचे प्रख्यात अभ्यासक आहेत, उद्या ते कोणत्याही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ही बनू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, या देशाच्या शासन-प्रशासनात असे कोणतेच पद नाही, ज्याच्यावर ते विराजमान नाही होऊ शकत.
डॉ. आंबेडकर हे लाखो सवर्ण हिंदूपेक्षा श्रेष्ठ असूनही त्यांना अस्पृश्य मानने ही आपल्या हिंदू धर्मशास्त्राची व आपली चूक आहे. ती सुधारणे इष्ठ आहे.
जग बदल घालुनि घाव, सांगून गेले मला भीमराव ।।
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा एक असा मजबूत खांब भारत भूमीमध्ये रोवला आहे की, ज्याला इतर कोणीही हालवू सुद्धा शकत नाही.
हिंदू समाजातील छळ अत्याचार करणाऱ्या सर्व प्रवृत्तीविरुद्ध बंड करणारी व्यक्ती म्हणजेच डॉ. आंबेडकर होय. त्या अत्याचारी प्रवृत्तीविरुद्ध जो आवाज त्यांनी उठवला त्याने लोकांच्या मन - मेंदूंना स्तुप्त अवस्थेतून जागृत केले आहे. त्यांनी देशाच्या शासन प्रशासनातील प्रत्येक मुद्यांवर विरोध दर्शवला आहे या मुद्द्यांवर प्रत्येक व्यक्तीने विरोध दर्शवला पाहिजे. डॉ. आंबेडकर यामुळे भारताच्या अती विशिष्ट लोकांमध्येही एक असामान्य आणि सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते होते, दलितांचे कैवारी होते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही. ते विधीतज्ज्ञ होते. तर त्याहीपेक्षा श्रेष्ठ ते अर्थतज्ज्ञ होते. भारतातले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ कोण? या प्रश्नाला अमर्त्य सेन असे उत्तर नसून, सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरच होते.
तथागत बुद्धांनी जीवनाच्या अंतिम सत्याला जाणण्यासाठी अथक प्रयत्नांनी ‘बुद्धत्व’ प्राप्त केले, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली प्रचंड विद्वता आणि बुद्धिमत्तेने ‘बोधिसत्व' या अवस्थेला प्राप्त केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे २०व्या शतकात बौद्ध धर्म भारताच्या इतिहासात एक आठवण मात्र नाही राहिला तर तो आता एक शक्तीशाली धार्मिक शक्ती बनून समोर आला आहे. डॉ. आंबेडकरांनी केवळ भारताच्या धार्मिक जीवनात असा चमात्कारीक प्रभाव टाकला आहे की, ज्याची इतिहासात कोणीही बरोबरी करू शकत नाही. कारण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या सोबत लाखो - लाखो लोकांनी मिळून बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली आहे.
जय भीम !..... मला बाबासाहेब असे महापुरुष वाटतात ज्यांना मी केवळ दलितांचे नेते कधीही मानले नाही तर ते माझे स्वत:चे नेते आहेत. ते केवळ आपल्या देशाचेच नेते नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते आहेत. कारण ते आपल्याला सर्वोत्तम अशी ‘मानवता’ शिकवतात. त्यांची ‘समानतेची’ शिकवण महत्त्वाची आहे. दलित, शोषित, मागास (Underprivileged) , पिडित किंवा अडचणीतील सर्वांसाठी ते खूप मोठी प्रेरणा आणि आशेचा किरण होते, त्यांनी सर्वांना सुयोग्य मार्ग दाखवला. मानवतेमध्ये विश्वास ठेवणारे व त्यास धर्म मानणारे सर्व लोक बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. मला स्वत: त्याच्यांपासून खूप प्रेरणा मिळाली आहे. बाबासाहेबांच्या दोन गोष्टी मला खूप प्रेरक वाटतात. एक म्हणजे जेव्हा मी कधी अडचणीत असतो, कधी कोणत्या गोष्टीसाठी आवाज उठवतो, जी मला योग्य वाटते आणि अशा अनेक ठिकाणी जिथे मला हिम्मत दाखवण्याची गरज पडते, जिथे मला त्या परिस्थीत भिती वाटते, मी हिम्मत सोडू लागतो, तेव्हा मी बाबासाहेबांबद्दल विचार करतो. कारण ते एक असे महामानव होते ज्यांनी कधीही हिम्मत सोडली नाही. त्यांच्यासमोर कितीही मोठी समस्या असो, कितीही मोठे आव्हान असो त्यांनी आपला संघर्ष नेहमी चालू ठेवला. ते निर्भय होते आणि ही त्यांची खास गुणवत्ता (कॉलिटी) होती ज्यापासून मला खूप प्रेरणा मिळाली आहे. दुसरे म्हणजे त्यांच्या ह्रदयात असलेले प्रेम! स्वत:साठी आणि आपल्या परिवारासाठी आपण सर्वच विचार करतो, परंतु ते खूपच दुर्मिळ मनुष्य असतात जे सर्व लोकांचा विचार करतात. बाबासाहेबांच्या मनात सर्वांसाठीच अमाप प्रेम होते. त्यांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल मला आदर आहे. त्यानुसार वागण्याचा मी सदैव प्रयत्न करतो. तसेच त्यांच्या मनात समाजासाठीचे जे स्वप्न होते, त्याला जर पूर्ण करायचे असेल तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला चालावे लागेल. त्यांनी शिकवलेल्या गोष्टींना आपणास जीवनाचा भाग बनवावे लागेल. निश्चितच ते एक महापुरुष आहेत. आणि मी आपल्या देशाच्या तरूणांना विनंती करतो की, बाबासाहेबांनी लिहिली ग्रंथ-पुस्तके आपण वाचावे, त्यापासून शिकवण घ्यावी आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालावे. आय सल्युट बाबासाहेब. जय भीम.
अभारतीय व्यक्तींची मते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले आणि ज्या भूमीवर बौद्ध धम्माचा जन्म झाला त्याच भूमीवर त्यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
"पुढच्या पिढीसाठी स्वतंत्र भारताची दिशा ठरवणारे एक महान भारतीय म्हणून डॉ. आंबेडकर संपूर्ण जगाच्या स्मरणात राहतील."
अर्थशास्त्रीय नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व राज्यशास्त्रज्ञ, [११]
आम्ही डॉ. आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवणार ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परीवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवलं.
डॉ. आंबेडकरांचे संविधान आणि जातीनिर्मुलनवादी लेखन ही आमची ऊर्जा आहे
मी पहिल्या वेळी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना १९३१ च्या भारतीय गोलमेज परिषदेमध्ये भेटलो. दुसऱ्यांदा मी १९४६ मध्ये पंतप्रधान वलेमंट ऍटलींच्या निमंत्रणावर भारताला अधिक अधिकार देण्याच्या विषयांवर चर्चेंसाठी गांधी, नेहरू, जिना, राजगोपालचारी आणि डॉ. आंबेडकर या नेत्यांना भेटलो. प्रतिनीधी मंडळाचा संदस्य असल्यामुळे आणि ब्रिटनच्या मजूर संघटनेशी संबधीत असल्याच्या कारणाने मला स्वभावत: डॉ. आंबेडकरांची मदत घ्यावी लागली. त्यांनी उद्योग, कारखाने आणि मजूरांच्या संबंधात खूप सारे महत्त्वपूर्ण सुझाव दिले होते. डॉ. आंबेडकर एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांनी भारतीय समाजाच्या सुधारांसाठी खूप मोठे योगदान दिले आहे.
मला या गोष्टीचा अधिकच आनंद होता की डॉ. आंबेडकरांना भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले गेले. त्यांनी ज्या निपूणता आणि कौशल्यासोबत स्वतंत्र्य भारताचे नवीन संविधान बनवले त्याला मी खूप उत्सुकतेने पाहत होतो. ती त्यांची एक अत्यंत उदांत भेट होती. बाबासाहेब गांधीच्या विरुद्ध अत्यंत कठोरपणे उभे राहिले होते ज्यात भारतीय अस्पृश्यांना पुणे-कराराद्वारे काँग्रेसच्या सोबत बांधले गेले होते. डॉ. आंबेडकर यांच्यात एक प्रचंड ताकद होती आणि त्या विरुद्ध जाणे भारतीय वातावरणात कोणाच्याही आवाक्यातील गोष्ट नव्हती. अशा दूरदर्शी शूरवीर महापुरूषासोबत परिचीत होणे जीवनाला नव्या उत्साहाने भरून टाकणारी घटना होती. एक असे व्यक्ती ज्यांनी भारतीय इतिहासावर आपली न मिटणारी छाप सोडून ठेवली आहे.
जर डॉ. आंबेडकरांचा जन्म भारताव्यतिरिक्त अन्य कुठल्याही देशात झाला असता तर त्यांना सर्वमान्य विश्वमानवांमध्ये स्थान मिळालं असतं.
डॉ. आंबेडकरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहेत.
डॉ. आंबेडकर हे एकटेच ५०० ग्रज्युएटांच्या बरोबरीचे आहे. स्वत:च्या मेहनतीने प्राप्त केलेली त्यांची विद्वत्ता एवढी आहे की ते ह्या विद्वत्तेच्या बळावर शासनाच्या कुठल्याही पदावर बसू शकतात.
डॉ. आंबेडकर हा युवक भारतीय इतिहासाची नवीन पाने लिहीत आहे.
डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा मूळ झरा आहे.
भारताने स्वातंत्र्यासाठी लढा दिला तर डॉ. आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी लढा दिला. त्यांनी लिहिलेली राज्यघटना जगात आदर्श आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर वाचली जातात.
तुम्ही कोण आहात, कुठून आलात हे तितकं महत्त्वाचं नाही, प्रत्येक मनुष्य त्याची क्षमता वापरू शकतो, जसे डॉ. आंबेडकरांनी स्वत:च्या आयुष्याची उंची गाठली आणि भारत देशाचे संविधान लिहून सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला.
बाबासाहेबांचे विचार केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगाकरीता प्रेरक आहेत. त्यांचे राजकिय धोरण, आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनावर आधारित होते. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान हे विज्ञानवादी आणि मानवतावादी होते आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माचा स्विकार केला.
भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरीकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहे.
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरुष भारताला लाभले, त्यामुळे आम्हाला भारताबद्दल विशेष आदर आहे. आम्हाला बाबासाहेबांसारखी व्यक्ती लाभली नाही ही खंत आहे. बाबासाहेबांबद्दल अधिकाधिक माहिती मिळाली तेव्हा आम्हाला धक्काच बसला! जो धर्म या देशातून हद्दपार झाला होता, तो त्यांनी पुनर्जीवीत केला. डॉ. आंबेडकरांवर आम्ही एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे. त्यांचे विचार हे केवळ भारतासाठीच नव्हे तर समस्त जगाच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे आता बाबासाहेबांचे विचार मी थायलंडच्या घराघरांत पोहोचवणार.
जगात सहा विद्वान आहेत, त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत.
हे सुद्धा पहा
- बाबासाहेब आंबेडकर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
संदर्भ
- ^ https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949
- ^ संविधान सभेतील भाषणे आणि चर्चा. नागपूर: युगसाक्षी प्रकाशन. pp. २१.
- ^ "'हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकरांच्या पायांचे पूजन केले पाहिजे'". Lokmat. 3 फेब्रु 2020.
- ^ "हिंदू स्त्रियांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचं पूजन केलं पाहिजे - विक्रम गोखले". Loksatta. 4 फेब्रु 2020.
- ^ a b c d e f g h i "मान्यवरांच्या नजरेतून डॉ. आंबेडकर". 15 एप्रि, 2016.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Ambedkar my father in Economics: Dr Amartya Sen". 5 मे 2007.
- ^ a b "बाबासाहेब जागतिक स्त्रीमुक्तीचे उद्धारक". Lokmat. 20 जून 2016.
- ^ "नागराज मंजुळेंचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरावरील विचार".
- ^ अभिनेता आमीर खानचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील विचार
- ^ https://m.hindustantimes.com/world/rajapaksa-lauds-ambedkar-s-service-to-buddhism/story-qm6ESecPgMjmqvO2498clN.html
- ^ "संग्रहित प्रत". 2020-09-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-15 रोजी पाहिले.
- ^ अटलबिहारी, वाजपेयी (१ जानेवारी २०१२). "डॉ. आंबेडकर : मानवता के ध्वजवाहक". मनोगत: ५.