बापट
बापट हे मराठी आडनाव आहे. बापट या आडनावाच्या व्यक्ती प्रामुख्याने भारतातील महाराष्ट्र या राज्यात आढळून येतात.
बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट
बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माहिती साठी येथे टिचकी द्या.
बापट आडनावाच्या प्रसिद्ध व्यक्ती
- अरुण बापट -भूकंप वैज्ञानिक
- पंडित उल्हास बापट -संतूरवादक
- प्राध्यापक उल्हास बापट
- जयंत भालचंद्र बापट - ऑस्ट्रेलियात स्थयिक झालेले एक मराठी विद्वान
- दामोदर गणेश बापट - कुष्टरोग्यांसाठी आयुष्य व्यतीत करणारे समाजसेवक
- धुंडिराज गणेश बापट -वैदिक वाङ्मयाचे भाषांतरकार
- नारायण विष्णूशास्त्री बापट -एक भाषांतरकार, निबंधकार व इतिहास लेखन करणारे विद्वान व्यासंगी.
- पुरुषोत्तम विश्वनाथ बापट -बौद्ध धर्माचे अभ्यासक
- प्रिया बापट - प्रथितयश मराठी अभिनेत्री
- बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट - मराठी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेले छायाचित्रकार.
- रवींद्र दिनकर बापट -मराठी लेखक रवी बापट
- राजा बापट
- राम बापट - एक मराठी विचारवंत, व्याख्याते आणि सामाजिक चळवळीतील नेते
- वसंत बापट - प्रसिद्ध मराठी कवी.
- वासुदेव वामन बापट गुरुजी - प्राचीन यज्ञसाधनेचा मार्ग सामान्यांसाठी सहजसोपा आणि प्रशस्त करून देणारे थोर व्यक्तिमत्त्व. '(अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र', 'दत्तात्रेयस्तोत्र', 'गुरूस्तुति', 'करुणात्रिपदी', 'मंत्रात्मक श्लोक' अशा सिद्ध स्तोत्रांवरील अर्थगर्भ पुस्तकांचे प्रथितयश लेखक.
- विष्णूशास्त्री बापूशास्त्री बापट - एकोणिसाव्या शतकातील एक बालसाहित्यिक
- वि.वा. बापट ऊर्फ बापटशास्त्री. पंचदशी सारख्या अनेक संस्कृत ग्रंथांचे मराठी भाषांतर करणारे एक विद्वान.
- सेनापती बापट - थोर भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक.