बांगलादेशामध्ये हिंदू धर्म हा इस्लाम नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. भारत व नेपाळ यानंतर बांग्लादेश हे तिसरे हिंदू धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र आहे. बांगलादेशातील २०११ च्या जनगणनेनुसार देशातील एकूण लोकसंख्येत ८.९६% प्रमाण हिंदूंचे असून त्यांची लोकसंख्या १,२४,९२,४२७ एवढी आहे.
वर्षनिहाय हिंदू लोकसंख्या
बांगलादेशातील हिंदू लोकसंख्या
वर्ष
लोक.
±%
इ.स. १९०१
९५,४६,२४०
—
इ.स. १९११
९९,३९,८२५
+४%
इ.स. १९२१
१,०१,७६,०३०
+२%
इ.स. १९३१
१,०४,६६,९८८
+२%
इ.स. १९४१
१,१७,५९,१६०
+१२%
इ.स. १९५१
९२,३९,६०३
−२१%
इ.स. १९६१
९३,७९,६६९
+१%
इ.स. १९७४
९६,७३,०४८
+३%
इ.स. १९८१
१,०५,७०,२४५
+९%
इ.स. १९९१
१,११,७८,८६६
+५%
इ.स. २००१
१,१३,७९,०००
+१%
इ.स. २०११
१,२४,९२,४२७
+९%
*बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धामुळे १९७१ ची जणगणना पुढे लांबवली गेली.