बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२
बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२ | |||||
वेस्ट इंडीज | बांगलादेश | ||||
तारीख | १६ जून – १६ जुलै २०२२ | ||||
संघनायक | क्रेग ब्रेथवेट (कसोटी) निकोलस पूरन (ए.दि. आणि ट्वेंटी२०) | शाकिब अल हसन (कसोटी) तमिम इक्बाल (ए.दि.) महमुद्दुला (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | काईल मेयर्स (१५३) | शाकिब अल हसन (१३८) | |||
सर्वाधिक बळी | अल्झारी जोसेफ (१२) | खालेद अहमद (१०) | |||
मालिकावीर | काईल मेयर्स (वेस्ट इंडीज) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | निकोलस पूरन (९१) | तमिम इक्बाल (११७) | |||
सर्वाधिक बळी | गुडाकेश मोती (६) | मेहेदी हसन (७) | |||
मालिकावीर | तमिम इक्बाल (बांगलादेश) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | निकोलस पूरन (१०८) | शाकिब अल हसन (१०२) | |||
सर्वाधिक बळी | रोमारियो शेफर्ड (६) | नसुम अहमद शाकिब अल हसन महेदी हसन शोरिफुल इस्लाम (प्रत्येकी २) | |||
मालिकावीर | निकोलस पूरन (वेस्ट इंडीज) |
बांगलादेश क्रिकेट संघाने १६ जून ते १६ जुलै २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविण्यात आली. १ जून २०२२ रोजी दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जारी केले गेले.
२२ मे २०२२ रोजी मोमिनुल हकच्या नेतृत्वाखाली बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दौऱ्यासाठी पथकाची घोषणा केली. परंतु श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभवामुळे मोमिनुलने कर्णधारपदावरून राजीनामा दिला. शाकिब अल हसनला नवीन कर्णधार नेमण्यात आले. लिटन दास याला उपकर्णधारपदाची सुत्रे देण्यात आली. कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशने तीन-दिवसीय सराव सामना खेळला. वेस्ट इंडीजने दोन्ही कसोटी जिंकत मालिकेत २-० ने विजय मिळवला. या पराभवामुळे बांगलादेश कसोटी विश्वचषकातून बाद ठरला.
ओल्या मैदानामुळे पहिला ट्वेंटी२० सामना सुरू होण्यास दोन तासांचा विलंब झाला. अनेकवेळा पावसाचा व्यत्यय आल्याने सरतेशेवटी फक्त १३ षटकांचा खेळ झाल्यावर उर्वरीत सामना रद्द करण्यात आला. त्याच मैदानावर दोन दिवसांनंतर झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात वेस्ट इंडीजने ३५ धावांनी विजय मिळवला. गयानामध्ये झालेल्या मालिकेतील तिसरा सामना देखील वेस्ट इंडीज ५ गडी राखून जिंकल्याने ट्वेंटी२० मालिका वेस्ट इंडीजने २-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका बांगलादेशने ३-० या फरकाने जिंकली.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:क्रिकेट वेस्ट इंडीज अध्यक्ष XI वि. बांगलादेश
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
१ली कसोटी
बांगलादेश | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- गुडाकेश मोती (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : वेस्ट इंडीज - १२, बांगलादेश - ०.
२री कसोटी
बांगलादेश | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- अँडरसन फिलिप (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : वेस्ट इंडीज - १२, बांगलादेश - ०.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
बांगलादेश १०५/८ (१३ षटके) | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
२रा सामना
वेस्ट इंडीज १९३/५ (२० षटके) | वि | बांगलादेश १५८/६ (२० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
३रा सामना
बांगलादेश १६३/५ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज १६९/५ (१८.२ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
वेस्ट इंडीज १४९/९ (४१ षटके) | वि | बांगलादेश १५१/४ (३१.५ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला.
- गुडाकेश मोती (वे.इं.) आणि नसुम अहमद (बां) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
वेस्ट इंडीज १०८ (३५ षटके) | वि | बांगलादेश ११२/१ (२०.४ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
वेस्ट इंडीज १७८ (४८.४ षटके) | वि | बांगलादेश १७९/६ (४८.३ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.