बहुजन साहित्य संमेलन
- अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन या नावाचे एक संमेलन, आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे १० फेब्रुवारी १९८८ रोजी डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
- त्यानंतर आणखी एक अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन, गडचांदूर या गावी ९-१० एप्रिल १९९८ या तारखांना झाले. अध्यक्ष यशवंत मनोहर होते.
- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे १७ जुलै २०१६ रोजी त्यापूर्वी नुकत्याच स्थापन झालेल्या बहुजन साहित्य संघाच्या वतीने सुरुवातीलाच बहुजन साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष
डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे होत्या.
अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन हे आणखी वेगळेच संमेलन आहे.