Jump to content

बहुजन समाज पक्ष

बहुजन समाज पक्ष
पक्षाध्यक्षमायावती[]
सचिवसतीशचंद्र मिश्रा[]
स्थापनाइ.स. १९८४
मुख्यालयनवी दिल्ली, भारत
लोकसभेमधील जागा10
राज्यसभेमधील जागा
राजकीय तत्त्वेदलित समाजवाद
प्रकाशनेमायायुग
संकेतस्थळबीएसपीइंडिया.ऑर्ग

बहुजन समाज पक्ष (मराठी नामभेद: बहुजन समाज पार्टी ; लघुरूप: ब.स.प.) हा भारतातील तिसरा सर्वात मोठा राष्ट्रीय राजकिय पक्ष आहे. हा आंबेडकरवादी, समाजवादी, लोकशाही या विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. इ.स. १९८४ साली कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. इ.स. २००३ सालापासून मायावती या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. हत्ती हे या पक्षाचे चिन्ह आहे. इ.स. २००९ साली झालेल्या भारताच्या पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकींत या पक्षाने २१ जागा जिंकल्या. त्यायोगे पंधराव्या लोकसभेतील पक्षीय बलाच्या निकषावर हा चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने उत्तर प्रदेशात आहे.

संदर्भ व नोंदी

  1. ^ "बसप पक्षाध्यक्ष". 2013-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-03 रोजी पाहिले.
  2. ^ "बसप सचिव".

बाह्य दुवे