Jump to content

बहिरी ससाणा

हेसुद्धा पाहा: छोटा बहिरी ससाणा आणि ससाणा


बहिरी ससाणा
Falco peregrinus
Falco peregrinus madens

बहिरी ससाणा (शास्त्रीय नावः Falco peregrinus) हा भारतात अतिशय दुर्मिळ पक्षी असून ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे. गडद हिरव्या रंगाचे टोकदार पंख, चपळ शरीर, व अतिशय वेगवान हालचाली करून उडणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत आहे. डोळ्याच्या बाजूचे पिसांचे कल्ले यांवरून हा पक्षी ओळखता येतो.

बहिरी हे मूळचे नाव अरबी असून अरबी भाषेत बहारी असे म्हणतात. इंग्रजीत हा पेरेग्रीन फाल्कन या नावाने ओळखला जातो. आखाती देशात याला माणसाळवून शिकारीसाठी वापरतात.

एकेकाळी हा पक्षी अतिशय दुर्मिळ झाला होता. परंतु ७० ते ८० च्या दशकात या पक्ष्याच्या संख्येने पुन्हा उचल घेतली आहे. दुर्मिळ होण्याचे मुख्य कारण डीडीटी या कीटकनाशकाचा मोठया प्रमाणावरील वापर होता.ससाणा आपल्या शिकारीचा आकाशातुन पाठलाग वेग सरासर २५० ते ३०० प्रती तास एवढा वेग संपादन करु शकतो

बाह्य दुवे