बहामास क्रिकेट संघाचा केमन द्वीपसमूह दौरा, २०२१-२२
बहामास क्रिकेट संघाचा केमन द्वीपसमूह दौरा, २०२१-२२ | |||||
केमन द्वीपसमूह | बहामास | ||||
तारीख | १३ – १७ एप्रिल २०२२ | ||||
संघनायक | रेमन सीली | मार्क टेलर | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | केमन द्वीपसमूह संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रेमन सीली (१८१) | मार्क टेलर (१३२) | |||
सर्वाधिक बळी | केव्हन बेझिल (८) | मार्क टेलर (५) |
बहामास क्रिकेट संघाने एप्रिल २०२२ मध्ये पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी केमन द्वीपसमूहचा दौरा केला. सर्व सामने जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह मधील जिमी पॉवेल ओव्हल आणि स्मिथ रोड ओव्हलवर झाले. केमन द्वीपसमूहच्या भूमीवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवले गेले. तसेच दोन्ही संघांमधील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका होती.
केमन द्वीपसमूहने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ५-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
बहामास ८५/६ (२० षटके) | वि | केमन द्वीपसमूह ८८/२ (११.२ षटके) |
रुडोल्फ फॉक्स २४* (२१) मार्विन स्वॅक २/१२ (४ षटके) | पॅट्रीक हेरॉन ५६* (३८) भूमेश्वर जागरु १/८ (१ षटक) |
- नाणेफेक : केमन द्वीपसमूह, फलंदाजी.
- केमन द्वीपसमूहमध्ये खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- केमन द्वीपसमूह आणि बहामास या दोन्ही संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बहामासने केमन द्वीपसमूहमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- केमन द्वीपसमूहचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय. तसेच बहामासविरुद्ध देखील केमन द्वीपसमूहचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
- केव्हन बेझिल, पॉल चीन, पॅट्रीक हेरॉन, जेलन लिंटन, रेमन सीली, मार्विन स्वॅक (के.द्वी.), फेस्टस बेन, रुडोल्फ फॉक्स, जुलियो जेमीसन आणि ड्वाइट व्हीटली (ब) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
केमन द्वीपसमूह १४८/६ (२० षटके) | वि | बहामास १३३/९ (२० षटके) |
रेमन सीली ४३ (२४) भूमेश्वर जागरु २/३४ (४ षटके) | जगन्नाथ जागरु ३४ (३८) अलेझांड्रो मॉरिस ४/२६ (४ षटके) |
- नाणेफेक : बहामास, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
बहामास ११३/४ (१७ षटके) | वि | केमन द्वीपसमूह ११९/३ (१३.२ षटके) |
मार्क टेलर ६७ (४९) केव्हन बेझिल २/९ (४ षटके) | रेमन सीली ७३* (३२) जगन्नाथ जागरु १/२५ (३ षटके) |
- नाणेफेक : केमन द्वीपसमूह, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १७ षटकांचा करण्यात आला.
- डेमार जॉन्सन आणि ग्रेगरी स्मिथ (के.द्वी.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४था सामना
केमन द्वीपसमूह १६६/४ (२० षटके) | वि | बहामास १०१ (१७.१ षटके) |
कॉनरॉय राइट ५० (३०) ग्रेगरी टेलर २/२७ (४ षटके) | संदीप गौड २५ (२१) ॲलेस्टर इफील २/१२ (३.१ षटके) |
- नाणेफेक : केमन द्वीपसमूह, फलंदाजी.
- कीथ बरोज (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
५वा सामना
केमन द्वीपसमूह १८०/६ (२० षटके) | वि | बहामास १३८/७ (२० षटके) |
पॅट्रीक हेरॉन ५९ (४०) मार्क टेलर ३/३५ (४ षटके) | मार्क टेलर ४२ (३७) ॲलिस्टेर इफील २/१८ (४ षटके) |
- नाणेफेक : बहामास, क्षेत्ररक्षण.