Jump to content

बहादूरशाह जफर

बहादूरशाह जफर याचे चित्र (इ.स. १८५४)

अबू जफर सिराजुद्दीन मुहम्मद बहादूरशाहा जफर ऊर्फ बहादूरशाहा जफर (उर्दू: ابو ظفر سِراجُ الْدین محمد بُہادر شاہ ظفر ;) (ऑक्टोबर २४, इ. स. १७७५ - नोव्हेंबर ७, इ. स. १८६२) हा मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट व तिमूरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता होता. तो मुघल सम्राट दुसरा अकबरशाह व त्याची हिंदू राजपूत बायको लालबाई यांचा पुत्र होता. वडिलांच्या मृत्यूनंतर सप्टेंबर २८, इ. स. १८३७ रोजी तो राज्यारूढ झाला. ब्रिटिश जुलमी सत्तेविरुद्ध झालेल्या इ. स. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बहादूरशाहाला ब्रिटिश बर्म्यात रांगून येथे हद्दपार करून स्थानबद्ध करून ठेवले. नोव्हेंबर ७, इ. स. १८६२ रोजी रांगून येथेच स्थानबद्धतेत त्याचा मॄत्यू झाला.

बहादूरशहा जफर हा १८५७ च्या उठावाच्या वेळी पूर्ण चळवळीचे नेतृत्व करीत होता. त्यावेळी तो दिल्लीचा नवाब होता. यास मंगल पांडे , तात्या टोपे, झाशीची राणी, १८४९ साली निवर्तलेल्या पंजाबच्या रणजीतसिंह या राजाच्या पत्नीने देखील पाठिंबा दिला होता. भारतातील तमाम संस्थाने खालसा केल्याने, तनखे रद्द केल्याने सर्व राजांच्या मनातही असंतोष खदखदत होता व अशा राजांनीही १८५७ च्या उठावास सक्रिय पाठिंबा दिला होता. यावेळी संस्थानांची अवस्था बिकट होती. या सर्व कारणांमुळे स्फोट होणे साहजिकच होते म्हणून उठावाचे केंद्र दिल्ली असावे असे ठरले. त्यावेळी बहादूरशहा जफर हा नवाब असल्याने त्यांच्याकडे हे नेतृत्व आले. यावेळी त्याचे वय 82 होते. [ संदर्भ हवा ]

बाह्य दुवे


संदर्भ

वर्ग:भारताचा इतिहास