बस्ती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते.
लोक जीवन /गावातील परिस्थिती -बस्ती गावातील प्रमुख्याने व्यवसाय हा आपणास शेती हा पाहण्यास मिळतो तसेच शेती वर अवलंबून असणारे रोजगार दुध व्यवसाय ,शेली पालन ,शेती वर आधारित् मजुरी करणारे महिला पुरुष असे पाहण्यास मिळते ,गावात फक्त २(किसन गोरडे पाटील ,अशोक गोरडे पाटील ) दुकाने असून इतर कामासाठी सावरगाव व जुन्नर या ठिकाणे जावे लागते .रेशन दुकान बस्ती या गावात असून अमोल शेलार हे चालवतात .सकाळी लवकर उठून शेत्तात काम करणे व आपल्या कुटुंबाची उपजीविका करणे असे काम या ठिकाणी चालते .मुख्य पिके उस ,गहू ,कांदे ,पाले भाजी ,धना असे आपणास पाहवयास मिळतात .बस्ती गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती मुंबई स्तिथ आढळतात ,कालांतराने या मध्ये बदल होऊन पुणे जळगाव या ठिकाणी चांगल्या पैकी शिक्षण घेऊन कुटुंब स्थलांतर झाले .बस्ती गावात गोरडे ,शेलार ,रोकडे ,गीधे ,जाधव ,केवळ हे आडनावाचे लोक आपणास पहावयास मिळतात .गावाची बोलीभाषा ही मराठी ही असून काहीसा गोडवा आढळतो . दिनांक जानेवारी २०२४ मध्ये श्री प्रकाश गीधे हे गावचे सरपंच असून उपसरपंच बबन केवळ व पोलीस पाटील राजू रोकडे हे आहेत . गावातील बहुसंख्ये कुटुंबे बागायतदार व्शियापारी ,हुंडेकरी शिक्षक ,डॉक्टर ,देश सेवा ,इंजिनिअर,एम एस डब्लू ,प्रशासकीय सेवेत आहेत असे आपणास पहावयास मिळतात . बहु प्रमाणात कुटुंब गाव सोडून शेत्तात बंगले ,फार्म हाउस करून राहू लागले आहे .बस्ती गावापासून जुन्नर ८ किमी ,नारायणगाव ८ किमी व घोडेगाव १२ किमी वर आले .बस्ती गावातून मुंबई (कल्याण साठी ) रोज २ बस ये जा करतात याचा लोकांना फायदा होतो .तसेच जुन्नर ,नारायणगाव घोडेगाव साठी लोकल बस व जीप ची इ जा असते .जुन्रर असून बस्ती ला येणारी शेवटची (रात्री ) गाडी ही ६.३० आहे ,नारायनगाव पासून ८ .३० ची आहे .
प्रेक्षणीय स्थळे /सण उत्सव -बस्ती गावचे ग्राम दैवत म्हणजे मीना नदींच्या कुशीत वसलेले दत्त मंदिर आहे .यास नुकताच क दर्जा प्राप्त झाला असून या ठिकाणी पर्यटक लोकासाठी राहण्याची व्यवस्था सुद्धा आहे .तसेच प्रशस्त असे हनुमान मन्दिर ,विठोबा रुखमाई मंदिर ,बौद्ध समाजाचे बुद्धविहार या ठिकाणी पाहण्यास मिळते.चैत्र महिन्यात काठीची यात्रा असून ती उत्सहात साजरी केली जाते .तसेच डिसेम्बर महिन्यात दत्त गुरू ची हरीनाम साप्ताह उत्सहात साजरा केल जातो . फेबुवारी माहे मध्ये शिव जयंती तसेच व मे महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,बुद्ध जयंती ,महात्मा फुले ,आण्णाभाऊ साठे जयंती ,उत्साहात साजरी केली जाते .
गावात असणारऱ्या सुविधा - बस्ती गावात पुरसे असे पाणी उपलब्ध असून पाणी टंचाई भासत नाही .तसेच छोट्या मोठ्या कामासाठी गावातच दुकाने उपलब्ध असून इतर गोष्ठी साठी सावरगाव या ठिकाणी जावे लागते .सरकारी व खाजगी दवाखाने हे सावरगाव या ठिकाणी पाहण्यास मिळतात .या ठिकाणी सर्व नेटवर्क च्या कंपनी यांना नेटवर्क उपलब्ध आहे ,तसेच गावा पर्यंत WIFI सेवा आलेली असून लोक यांचे फायदा करून घेतात .
जवळपासची गावे बस्ती गावच्या जवळ पूर्वेला वडगाव सहाने व पिंपळगाव आहे ,पश्चिमेला निमदिरी आहे .उत्तरेला शिन्देमळा व खानापूर आहे .दक्षिणेला सावगाव आहे .
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate