Jump to content

बसवराज माधवराव पाटील

बसवराज माधवराव पाटील (English - Basavraj Madhavrao Patil) (जन्म २३ एप्रिल १९५७) हे भारतीय जनता पार्टी पक्षाचे एक भारतीय राजकारणी आहेत. बसवराज पाटील हे मूळचे मुरुम, उमरगा तालुक्यातील ( धाराशिव) आहेत. ते १९९९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत उमरगा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडुण आले होते. १९९९-२००४ मध्ये ते महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र विश्वनाथ गायकवाड यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झालेले ते स्थायी मंत्री होते. पुन्हा ते २००९ आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये औसा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडुण गेले. २०१९च्या निवडणुकीत ते औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांच्याकडून पराभूत झाले.

भुषवलेली पदे

  • १९९९ - २००४: महाराष्ट्र विधानसभा सदस्य ११वी विधानसभा निवडणूक (आमदार उमरगा विधानसभा मतदारसंघ)
  • १९९९ - २००४: ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र शासन
  • २००९ - २०१९: महाराष्ट्र विधानसभा सदस्य १३वी व १४वी विधानसभा निवडणूक (दोन वेळा आमदार औसा विधानसभा मतदारसंघ)
  • २०२० - अध्यक्ष 'विठ्ठल साई' कारखाना[]
  • २०२१ - काँग्रेसच्या प्रदेश समितीचे कार्यकारी अध्यक्ष[]

संदर्भ

  1. ^ "'विठ्ठल साई' कारखान्याची निवडणूक बिनविरोध". eSakal - Marathi Newspaper. 2022-03-13 रोजी पाहिले.
  2. ^ "सामान्य कार्यकर्ता ते प्रदेश काँग्रेस समितीचा कार्यकारी अध्यक्ष! जाणून घ्या बसवराज पाटलांचा प्रवास". eSakal - Marathi Newspaper. 2022-03-13 रोजी पाहिले.