Jump to content

बळवंत रामचंद्र हिवरगावकर

बळवंत रामचंद्र हिवरगावकर ( कर्जत(अहमदनगर), इ.स. १८९१; - अहमदनगर ११ जानेवारी, इ.स. १९२९) हे एक संस्‍कृत पंडित आणि संस्कृत साहित्याचे अनुवादक होते. त्यांचे मूळ आडनाव दंडवते होते. दत्तक गेल्यामुळे ते बहुधा हिवरगावकर झाले. त्यांचे शिक्षण अहमदनगर आणि बडोदा येथे झाले. ते इंटर (हल्लीची बारावी) नापास होते अहमदनगरच्या मिशन हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते. कौटिल्याचे अर्थशास्त्र मराठीत आणणारे ते पहिले लेखक होत.

बळवंर रामचंद्र हिवरगावकरांनी लिहिलेली पुस्तके

  • कार्मदकीय नीतिसार या राजनीतिशास्त्रावरी संस्कृत ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद
  • कौटिलीय अर्थशास्त्र (दोन खंड, सहलेखक - ज.स. करंदीकर)
  • टागोरांच्या ‘मालाकार’ या कथेचे व ‘चित्रा’ या नृत्यनाट्याचे मराठी रूपांतर
  • टागोरांच्या‘ नॅशनॅलिझम’ या ग्रंथाधारे लिहिलेला ‘राष्ट्रभावना’ हा चार-खंडी ग्रंथ
  • टागोरांच्याच साधना या ग्रंथाचे मराठी रूपांतर व ‘कला’ या निबंधाचा मराठी सारांश
  • भासकवीच्या समग्र नाटकांची गद्यपद्यात्मक भाषांतरे (दोन खंड)
  • राजधर्म (महाभारतातील ‘शांतिपर्व’चे मराठी भाषांतर)