Jump to content

बलिष्ठ अतिजीविता

हर्बर्ट स्पेन्सर

बलिष्ठ अतिजीविता (इंग्लिश: Survival Of The Fittest) हा एक वाक्यांश आहे जो चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतातून उद्भवला आहे, ज्यामुळे नैसर्गिक निवडीच्या कार्यपद्धतीचे वर्णन केले जाऊ शकते. बलिष्ठ अतिजीविता म्हणजे, थोडक्यात जो बलवान जीव आहे, तोच जगण्यास समर्थ आहे.[] स्वास्थ्य (फिटनेस)ची जैविक संकल्पना पुनरुत्पादक यश म्हणून परिभाषित केली जाते. डार्विनच्या भाषेत हा वाक्यांश जगण्याची परिभाषा म्हणून समजला जातो जो प्रत्येक जीव स्वतःच्या बऱ्याच प्रती एकामागून पुढील अनेक पिढ्यांमध्ये सोडेल.[]

चार्ल्स डार्विनच्या जाती उत्पत्ती संकल्पना वाचल्यावर हर्बर्ट स्पेन्सरने आपले पुस्तक प्रिसिपल्स ऑफ बायोलॉजी मधे प्रथम हे वाक्यांश वापरले. ज्यात स्वतःचे आर्थिक सिद्धांत आणि डार्विनचे जैविक सिद्धांत यातील साम्य पाहून म्हणले की, "डार्विनची नैसर्गिक निवडीची संकल्पना मी यांत्रिक परिभाषेत 'बलिष्ठ अतिजीविता' नावाने मांडली आहे".[]

डार्विनने अल्फ्रेड रसेल वॉलेसच्या स्पेंसरच्या 'बलिष्ठ अतिजीविता (सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट)' या नवीन वाक्यांशांना “नैसर्गिक निवडीचा” पर्याय म्हणून वापरण्याच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि इ.स. १८६८ मध्ये प्रकाशित झालेल्या 'व्हेरिएशन ऑफ अ‍ॅनिमलज् अँड प्लांट्स अंडर डोमेस्टिकेशन'मध्ये हा शब्दप्रयोग स्वीकारला आणि नंतर 'जातींच्या उद्गमवर (ओरिजिन ऑफ द स्पेसिज)'च्या पाचव्या आवृत्तीत (१८६९) पण हा वाक्यांश वापरला.[]

संदर्भ

  1. ^ Spencer, Herbert (1864). Principles of Biology, Volume 1. Williams and Norgate. p. 444. But this survival of the fittest, implies multiplication of the fittest.
  2. ^ a b "Letter 5140 – Wallace, A. R. to Darwin, C. R., 2 July 1866". Darwin Correspondence Project. २४ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Letter 5145 – Darwin, C. R. to Wallace, A. R., 5 July (1866)". Darwin Correspondence Project. २४ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.