बन्ना-जि
बन्ना-जि | |
---|---|
प्राथमिक माहिती | |
देश | जपान |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[" | |
अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[" |
बन्ना-जि (जपानी:鑁 阿寺) हे जपानच्या उत्तर कांतो भागातील तोचिगी प्रांतातील अशिकगा शहरात शिंगॉन संप्रदायाचे बौद्ध मंदिर आहे. मंदिराचे होन्झोन (मुख्य देवता) दाईनिची न्योराय यांचा पुतळा आहे. यामुळे मंदिराचे दाइनिचिसमा [१] असे टोपणनाव होते. हे मंदिर मुरोमाची शोगुनेट दरम्यान जपानवर राज्य करणाऱ्या आशिकागा कुळातील वडिलोपार्जित किल्ल्यांवर स्थित आहे. हे स्थळ राष्ट्रीय ऐतिहासिक स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे [२]
इतिहास
मिनामोटोनो योशियासू यांना १२ व्या शतकाच्या मध्यात शिमोट्सुके प्रांताच्या या भागातील शिन (इस्टेट) देण्यात आली.तेथे त्यांनी तटबंदीचे घर बांधले. त्याच्या तिसऱ्या मुलाने ज्या ठिकाणी ही इस्टेट आहे तेथून "आशिकागा" असे नाव घेतले आणि तो आशिकागा योशिकाने नावाने प्रसिद्ध झाला . गेनपेइ युद्धामध्ये त्यांनी मिनामोटोनो योरिमोटो यांचे संस्थानिक म्हणून काम केले आणि शेवटी ते योरिमोटो यांचे मेहुणे बनले. स.न. ११८५ मध्ये त्याला शिमोट्सुके प्रांताच्या राज्यपाल या पदवीने गौरविण्यात आले. दहा वर्षांनंतर, ११९५ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर ते बौद्ध भिक्षू झाले आणि गीशो (जपानी: 義 称) हे नाव धारण केले. पुढच्या वर्षी त्यांनी आपल्या निवासस्थानी दाईनिची न्योराय यांची मूर्ती स्थापित केली आणि त्याचे रूपांतर बन्न-जि नावाच्या बौद्ध मंदिरात केले. या मंदिराचा विस्तार त्यांचा तिसरा मुलगा, अशिकगा योशियोजी यांनी १२३४ मध्ये केला. मंदिराची सध्याची होंडी बांधण्यासही योशियाजी जबाबदार आहेत. कामकुरा कालावधी व नानबोकू-चो अवधी दरम्यान हे मंदिर कामकुरामधील त्सुरूगाका हचिमान-गु यांचे मदतनीस होते. तथापि, सेनगोको काळात, आशिकागा कुळाची शक्ती आणि प्रभाव खूपच कमी झाला होता आणि हे मंदिर जवळजवळ मोडकळीस आले होते.
सध्याची परिस्थिती
मार्च १९२२ मध्ये मंदिराच्या ४०,००० चौरस मीटर (४,३०,००० चौ. फूट) जागेला राष्ट्रीय ऐतिहासिक स्थळ म्हणून संरक्षण प्राप्त झाले. येथील मुख्य हॉलला १९५० मध्ये जपानची महत्त्वपूर्ण सांस्कृतिक मालमत्ता म्हणून नियुक्त केले गेले. १५०० च्या शतकात बांधलेले चार तटबंदीचे दरवाजे व खंदक आजही दिसून येतात. मंदिराच्या उगमापासून असलेले समुराई निवासस्थानाची तटबंदी अजून शाबूत आहे. या वैशिष्ट्यांमुळे जपान कॅसल फाऊंडेशनने २००६ मध्ये मंदिराला जपानच्या उत्तम १०० किल्ल्यांच्या यादीत याचे नाव समाविष्ट केले.[३] २०१३ मध्ये मुख्य सभागृहाचे नाव जपानच्या राष्ट्रीय संपत्तीच्या यादीत समाविष्ट केले.[४]
सांस्कृतिक गुणधर्म
बन्ना-जि होंडो (राष्ट्रीय संपत्ती)
बन्न-जिचा मुख्य हॉल आशिकागा योशियुजी यांनी १२३४ मध्ये बांधून घेतला होता. ही रचना वीज कोसळल्यामुळे जळून गेली होती. स.न. १२९९ मध्ये याची पुनर्बांधणी आशिकागा सदाउजी यांनी केली. ते प्रसिद्ध आशिकागा तकाउजी यांचे वडील होते. तसेच मुरोमाची शोगुनेट याचे संस्थापक होते. यात एक ५ x ५ बे आर्किटेक्चर पद्धतीचा हॉल आहे. यात इरीमोया शैलीचे छप्पर आहे. हे मंदिर गुप्त पद्धतीचे बौद्ध मंदिर आहे. परंतु या इमारतीच्या अनेक वास्तूंमध्ये जपानी झेनच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो. १४०७ ते १४३२ च्या सुमारास इमारतीचे मोठ्या प्रमाणात पुनर्निर्माण केले गेले. १९०८ मध्ये त्याला एक महत्त्वाची सांस्कृतिक मालमत्ता मानले गेले. २०१३ मध्ये याला जपानच्या राष्ट्रीय संपत्तीच्या यादीत समाविष्ट केले गेले.[५]
महत्त्वाचे सांस्कृतिक गुणधर्म
गॅलरी
- होंडो
- बोनशो असलेले शोरो
- क्योडो
- टाहोटो पॅगोडा
हे सुद्धा पहा
- जपानच्या ऐतिहासिक स्थळांची यादी (तोचिगी)
बाह्य दुवे
- बन्ना-जी वेबसाइट (जपानी भाषेत)
- https://web.archive.org/web/20160403214556/http://www.jcastle.info/castle/profile/94- आशिकागाशी- यकाटा
- आशिकागा सिटी - बन्ना-जी होंड्याबद्दल माहिती (जपानी भाषेत)
- http://www.jref.com/articles/the-100-top-castles-of-japan.267/
संदर्भ
- ^ "国宝 鑁阿寺". www.ashikaga-bannaji.org. 2016-08-18 रोजी पाहिले.
- ^ "足利氏宅跡(鑁阿寺)". Cultural Heritage Online (Japanese भाषेत). Agency for Cultural Affairs. 5 August 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "日本100名城 | 公益財団法人日本城郭協会". 公益財団法人日本城郭協会 (जपानी भाषेत). 2015-12-12. 2016-08-18 रोजी पाहिले.
- ^ "国宝 鑁阿寺". ashikaga-bannaji.org. 2016-08-17 रोजी पाहिले.
- ^ "鑁阿寺本堂". Cultural Heritage Online (Japanese भाषेत). Agency for Cultural Affairs. 5 August 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "鑁阿寺経堂". Cultural Heritage Online (Japanese भाषेत). Agency for Cultural Affairs. 5 August 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "鑁阿寺鐘楼". Cultural Heritage Online (Japanese भाषेत). Agency for Cultural Affairs. 5 August 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)