Jump to content

बनेश्वर

बनेश्वर मंदिर
श्री बनेश्वर महादेव संस्थान ट्रस्ट
ठिकाण
पुणे

बनेश्वर हे पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे असलेले महादेवाचे मंदिर आहे. पुणे शहरापासून नैऋत्य दिशेला ३६ किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. आजूबाजूस दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर हे ह्या जागेचे वैशिष्ट्य.

पुराणकथा

बनेश्वर मंदिराची रचना मध्यकालीन वास्तुशिल्पाप्रमाणे असून, ह्या मंदिराची स्थापना पेशवे बाजीराव ह्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे, ह्यांनी १७४९ मध्ये केली. मंदिरास उभारण्यास एकूण खर्च ११४२६ रुपये ८ आणे आणि ६ पैसे असा आला. मंदिराच्या आवारात एक विशाल घंटा आहे. चिमाजी अप्पा ह्यांनी एका युद्धात पोर्तुगीस सैन्यास पराभूत केल्याचे विजयचिन्ह म्हणून ही घंटा ओळखली जाते. ह्या घंटेवर १६८३ हे साल असून एक क्रॉस आहे. त्याअर्थी ही घंटा एका चर्चमधील असावी असे कळून येते.

मंदिराच्या आवारातील घंटा

सभोवतालचा प्रदेश

मंदिराच्या भोवतीचे वन संरक्षित आहे. या वनात अनेक फुलझाडे असून ते विविध प्राणी पक्षी यांचे आश्रयस्थान आहे. निसर्गप्रेमी अन् यात्रेकरूंसाठी हे एक आवडीचे स्थान आहे. मंदिराच्या मागील बाजूस धबधबा असून हे तिथले एक प्रमुख आकर्षण आहे.

भेट देण्याचा काळ आणि व्यवस्था

ऑगस्ट ते फेब्रुवारी ह्या काळात बनेश्वरला भेट देण्यास उत्तम काळ आहे. पुणे शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बनेश्वरला येण्यासाठी राज्य परिवहन गाडयांच्या मदतीने नसरापूर येथून पुढे बनेश्वरसाठी स्थानिक वाहतुकीच्या साह्याने पोहचता येते.






















चित्रसंग्रह