बनास संस्कृती
भारतातील ताम्राषाणयुगीन संस्कृती हडप्पा संकृतीनंतरच्या काळातील आहेत.मात्र राजस्थानच्या मेवाड प्रदेशातील आहाड किंवा बनास या नावाने ओळखली जाणारी संस्कृती हडप्पा संस्कृतीची समकालीन होती. उदयपुर जवळच्या बलाथल आणि गीलुंड संस्कृतीची महत्त्वाची स्थळे आहेत. बालाथल येथील पुराव्या नुसार ती इसवी सनापूर्वी ४००० वर्षे प्राचीन होती.
उदयपूरजवळच्या आहाड इथे तिचा शोध प्रथम लागला म्हणून तिला आहाड संस्कृती असे नाव देण्यात आले.हे गाव आहाड या बनास नदीच्या उपनदी वर वसलेले आहे.म्हणून तिला बनास संस्कृती असेही म्हणतात.
कलाशैली
पुरावस्तू आणि पूरावास्तू यांच्या आधारे असे दिसते,की बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे उत्पादन होत होते .बालाथल येथे तयार झालेल्या भांड्यांचा पुरवठा आहाड संस्कृतीच्या इतर ग्राम वसाहतींना केला जात होता.मातीच्या भांडांच्या बरोबरीने मातीचे बैल, शांखांच्या वस्तू,दगडी पाती, छिन्या, बाणाची अग्रे, तांब्याची हत्यारे यांसारख्या वस्तू विपुल प्रमाणात मिळाल्या.बालाथलमधील घरे पक्क्या विटांची आणि दोन आडव्या,दोन उभ्या विटांची रचना करून (इंग्लिश बॉण्ड पद्धत)बांधली होती.
संरक्षण
या संस्कृती मध्ये बालाथलभोवती तटबंदी होती.हे शहर सुरक्षेने परिपूर्ण होते.ही संस्कृती हडप्पा संस्कृतीशी समकालीन होती म्हणून इथे तटबंदी युक्त होती.
व्यापार आणि उत्पादन
राजस्थानमधील खेत्री येथील तांब्याच्या खाणी मधून या संस्कृतीचे लोक तांबे मिळवत होते.तांबे वितळवून शद्ध करण्याचे ज्ञानही त्यांच्या कडे होते. हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडूनच तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावेत,असे दिसते.