बतावणी
बतावणी हा तमाशामधील एक उपप्रकार आहे. यात काल्पनिक किंवा अतिशयोक्तिपूर्ण गप्पा मारल्या जातात. अनेकदा थापा मारताना उत्स्फूर्त विनोदही केले जातात. बतावणी पाहणाऱ्याला हा प्रकार मनोरंजन नसून खरा वाटतो. गण-गवळणीनंतर बतावणी सादर होते.
बतावणीविषयक पुस्तके
- बतावणी/लोकनाट्य (आर.डी. सोनार)
- बतावणी एक लोककला (आर. पी. गाडेकर )