बडा इमामबाडा
बडा इमामबाडा (उर्दू: بڑا امامباڑا, हिंदी: बड़ा इमामबाड़ा) ही उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरामधील एक ऐतिहासिक इमारत आहे. इ.स. १७८४ साली अवध संस्थानाचा नवाब असफ उद दौला ह्याने बडा इमामबाडाची निर्मिती केली. इमामबाडा हा शब्द शिया पंथामधे थडग्याचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो.
बडा इमामबाडा प्रासादामध्ये असफी मशीद, भुलभुलैया तसेच बावली इत्यादी वास्तूंचा समावेश होतो. बडा इमामबाडा हे लखनौमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत