बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना ७ सप्टेंबर, इ.स. १९०६ रोजी झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.
मुंबईत मुख्यालय असलेल्या या बँकेच्या २०१७ च्या सुरुवातीस ५,१०० शाखा होत्या. यांपैकी ५६ शाखा भारताबाहेरच्या शाखा, पाच प्रतिनिधी कार्यालये आणि पाच उपकंपन्यांचा समावेश आहे.[१]
बँक ऑफ इंडिया स्विफ्ट या आर्थिक देवाणघेवाण प्रणालीची स्थापक सदस्य आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Bank of India branch network crosses 5,100 mark". www.deccanchronicle.com/ (इंग्रजी भाषेत). 2017-02-03. 2018-01-27 रोजी पाहिले.