फ्लोरिडा
फ्लोरिडाचे Florida | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
रहिवासी | फ्लोरिडीयन | ||||||||||
राजधानी | टॅलाहासी | ||||||||||
मोठे शहर | जॅक्सनविल | ||||||||||
सर्वात मोठे महानगर | दक्षिण फ्लोरिडा महानगरीय क्षेत्र | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत २२वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १,७०,३०४[१] किमी² (६५,७९५[१] मैल²) | ||||||||||
- रुंदी | ५८२ किमी (३६१ मैल) | ||||||||||
- लांबी | ७२१ किमी (४४७ मैल) | ||||||||||
- % पाणी | १७.९ | ||||||||||
- अक्षांश | २४°२७′ उ. to ३१° उ. | ||||||||||
- रेखांश | ८०°०२′ प. to ८७°३८′ प. | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ४वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १,८८,०१,३१० (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | १३५.४/किमी² (अमेरिकेत ८वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | ४७,७७८ USD | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | मार्च ३, १८४५ (२७वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-FL | ||||||||||
संकेतस्थळ | www.myflorida.com |
फ्लोरिडा (इंग्लिश: Florida) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय टोकापाशी वसलेले फ्लोरिडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या (कॅलिफोर्निया, टेक्सास व न्यू यॉर्क राज्यांच्या खालोखाल) क्रमांकाचे राज्य आहे.
फ्लोरिडाच्या पश्चिमेला मेक्सिकोचे आखात, पूर्वेला अटलांटिक महासागर तर उत्तरेला जॉर्जिया व अलाबामा ही राज्ये आहेत. फ्लोरिडाचा राज्याचा बराचसा भूभाग मेक्सिकोचे आखात व अटलांटिक महासागर ह्यंमधील द्वीपकल्पावर वसला आहे ज्यामुळे फ्लोरिडाला २,१७० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. फ्लोरिडाच्या वायव्य भागात पूर्व-पश्चिम धावणारा एक चिंचोळा पट्टा आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये फ्लोरिडा पॅनहॅंडल असे संबोधतात. फ्लोरिडाच्या दक्षिणेला सुमारे ४,५०० लहान-मोठ्या बेटांचा (कीज) एक द्वीपसमूह असून की वेस्ट हे सर्वात पश्चिमेकडील बेट आहे. टॅलाहासी ही फ्लोरिडाची राजधानी, जॅक्सनव्हिल हे सर्वात मोठे शहर तर मायामी-फोर्ट लॉडरडेल, टँपा, सेंट पीटर्सबर्ग, ओरलॅंडो ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
फ्लोरिडा हे अमेरिकेमधील अतिप्रगत राज्यांपैकी एक आहे. वर्षातील बाराही महिने सूर्यप्रकाशाचे दिवस, सौम्य हवामान, रम्य समुद्रकिनारे इत्यादी कारणांमुळे फ्लोरिडा हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. तसेच येथे अमेरिकेमधील व जगभरातील अनेक धनाढ्य उद्योगपती, सिनेकलाकार व खेळाडूंचे वास्तव्य आहे. येथील अंदाजे २ कोटी लोकसंख्येच्या २२ टक्के लोक लॅटिन अमेरिकन वंशाचे आहेत व १८ टक्के लोक केवळ स्पॅनिश भाषा बोलतात.
देशातील चौथ्या क्रमांकावर असलेली फ्लोरिडाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे. कृषी हा येथील दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग असून अमेरिकेमधील ७४ टक्के संत्र्यांचे उत्पादन फ्लोरिडामध्ये होते.
गॅलरी
- ओरलॅंडोजवळिल नासाचे केनेडी स्पेस सेंटर.
- पूर्ण बहार आलेले दक्षिण फ्लोरिडामधील गुलमोहराचे झाड.
- फ्लोरिडामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
- फ्लोरिडा राज्य संसद भवन.
- फ्लोरिडाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
संदर्भ
- ^ a b "२००० जनगणना". जुलै १८ रोजी पाहिले. Unknown parameter
|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य);|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
- [www.myflorida.com अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
- पर्यटन