फ्रायबुर्ग
फ्राइबुर्ग Freiburg im Breisgau | |||
जर्मनीमधील शहर | |||
| |||
फ्राइबुर्ग | |||
देश | जर्मनी | ||
राज्य | बाडेन-व्युर्टेंबर्ग | ||
क्षेत्रफळ | १५३.०७ चौ. किमी (५९.१० चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ९१२ फूट (२७८ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २,१८,०४३ | ||
- घनता | १,४०० /चौ. किमी (३,६०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.moenchengladbach.de |
फ्राइबुर्ग इम ब्राइसगाउ (जर्मन: Freiburg im Breisgau; फ्रेंच: Fribourg-en-Brisgau) हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यातील एक शहर आहे. हे शहर येथील ऐतिहासिक विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. फ्रायबुर्ग विद्यापीठ जर्मनीतील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. त्याची स्थापना १४५८ साली झाली. ह्या विद्यापीठात सौर-ऊर्जेवर अतिशय उच्च दर्जाचे संशोधन होते. फ्रायबुर्ग येथील द्राक्षाच्या मळ्यासाठी व उच्च दर्जाच्या वाईनसाठी प्रसिद्ध आहे.
भूगोल
हे शहर जर्मनीच्या नैरुत्य कोपऱ्यामध्ये वसलेले असून शहराच्या पश्चिमेला ऱ्हाइन नदीच्या पलिकडे फ्रान्सची सीमा आहे तसेच येथुन स्वित्झर्लंडची सीमाही जवळ आहे. शहराच्या पूर्वेला श्वार्त्सवाल्डच्या डोंगररांगा आहेत.
खेळ
फुटबॉल हा फ्राइबुर्गमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील बुंदेसलीगामधून खेळणारा एस.सी. फ्रायबुर्ग हा संघ येथेच स्थित आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील फ्राइबुर्ग पर्यटन गाईड (इंग्रजी)