फ्रंटियर एरलाइन्स
| ||||
स्थापना | १९९४ | |||
---|---|---|---|---|
हब | डेन्व्हर, मिलवॉकी विमानतळ, ओमाहा विमानतळ, कॅन्सस सिटी विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | अर्ली रिटर्न्स | |||
उपकंपन्या | फ्रंटियर एक्सप्रेस | |||
विमान संख्या | ८४ | |||
पालक कंपनी | इंडिगो पार्टनर्स | |||
मुख्यालय | डेन्व्हर, कॉलोराडो | |||
प्रमुख व्यक्ती | बिल फ्रॅंकी | |||
संकेतस्थळ | http://www.frontierairlines.com |
फ्रंटियर एरलाइन्स ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीची सगळ्यात जास्त उड्डाणे डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होतात. रिपब्लिक एरलाइन्सची उपकंपनी असलेली ही कंपनी, याव्यतिरिक्त मिलवॉकी, व्हिस्कॉन्सिन, कॅन्सस सिटी, मिसूरी आणि ओमाहा, नेब्रास्का येथूनही विमानसेवा पुरवते. फ्रंटियर एरलाइन्स ही रॉकी माउंटन प्रदेशात ग्रेट लेक्स एरलाइन्स या कंपनीद्वारे प्रादेशिक विमानसेवा पुरवते. हिची विमाने अमेरिका, मेक्सिको आणि कोस्टा रिका देशांतून एकूण ८३ शहरांना उड्डाणे करतात.[१]
इतिहास
फ्रंटियर एरलाइन्सचा पुनर्जन्म
डेन्व्हरमध्ये इ.स. १९५० ते इ.स. १९८६ दरम्यान फ्रंटियर एरलाइन्स याच नावाची एक विमानकंपनी कार्यरत होती. इ.स. १९९३मध्ये कॉंटिनेन्टल एरलाइन्सने आपले डेन्व्हरच्या स्टेपलटन विमानतळावरील हब बंद केले व तेथील उड्डाणे अगदी कमी केली. यामुळे डेन्व्हरहून अमेरिकेच्या इतर शहरांना जोडणारी विमानसेवा कमी झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी जुन्या फ्रंटियर एरलाइन्सच्या काही अधिकाऱ्यांनी एकत्र येउन फ्रंटियर एरलाइन्स याच नावाने फेब्रुवारी ८, इ.स. १९९४ रोजी नवीन विमानकंपनी सुरू केली.[२] जुलै १९९४मध्ये डेन्व्हरमधून कंपनीचे पहिले उड्डाण झाले. सुरुवातीस फ्रंटियरकडे बोईंग ७३७ विमाने होती पण १९९९मध्ये त्यांनी एरबसशी संधान बांधले व एरबस ए३१९ विमानांची खरेदी सुरू केली. याचबरोबर काही विमाने भाडेपट्ट्यावरही घेतली. २००१मध्ये पहिले एरबस विमान कंपनीच्या ताफ्यात दाखल झाले. यानंतरच्या सगळ्या विमानांवर डिरेक्टिव्हीची सुविधा होती. २००३मध्ये फ्रंटियर एरबस ए३१८ प्रकारचे विमान व्यापारीतत्त्वावर चालवणारी पहिली कंपनी झाली.[३] एप्रिल २००५पर्यंत फ्रंटियरने आपली सर्व बोईंग विमाने निवृत्त केली व त्यांच्या जागी एारबस विमाने वापरण्यास सुरुवात केली.
वाढ आणि पुनर्रचना
कंपनीची वाढ होत असताना फ्रंटियरने आपल्या विभागांची पुनर्रचना करण्याचे ठरवले. एप्रिल ३, २००६ रोजी फ्रंटियर एरलाइन्स होल्डिंग्स, इं या कंपनीची डेलावेर राज्यात स्थापना करण्यात आली. डेलावेरमध्ये असलेल्या व्यावसायिक करांतील सवलतींचा लाभ घेण्यासाठी ही चाल होती. फ्रंटियर एरलाइन्सची सगळी मालमत्ता या नवीन कंपनीच्या हवाली करण्यात आली. कंपनीचे मुख्यालय मात्र डेन्व्हरमध्येच ठेवण्यात आले.[४] नोव्हेंबर २००६ मध्ये फ्रंटियरने एरट्रान एरवेजशी संधान बांधले व दोन्ही कंपन्यांच्या प्रवाशांना त्यांचे फ्रीक्वेंट फ्लायर मैल[मराठी शब्द सुचवा] एकमेकांवर वापरता येण्याची सोय केली. ज्याठिकाणी फ्रंटियरची सेवा नव्हती तेथे जाणाऱ्या प्रवाशांना एरट्रानकडून तिकिटे काढण्यास उत्साहित करणे सुरू केले. एरट्राननेही फ्रंटियरसाठी ही सेवा उपलब्ध केली. ही सेवा जुलै २०१० मध्ये मिडवेस्ट एरलाइन्स फ्रंटियरमध्ये विलीन होईपर्यंत सुरू होती. जानेवारी २४, २००७ रोजी अमेरिकेच्या सरकारच्या वाहतूक खात्याने फ्रंटियरला मोठी विमानकंपनी म्हणून मान्यता दिली.[५] मार्च २००७मध्ये फ्रंटियरने होरायझन एरशी असलेले फ्रंटियर एक्सप्रेस या नावाखाली जवळची प्रवासी सेवा पुरवण्याचे कंत्राट हळूहळू कमी करणे सुरू करून तेथे रिपब्लिक एरलाइन्सला कंत्राट देणे सुरू केले. नोव्हेंबर ३०, २००७ रोजी रिपब्लिक एरलाइन्सने ही सगळी कंत्राटे हस्तगत केली. त्यानंतर पाचच महिन्यात एप्रिल २००८मध्ये रिपब्लिक एरलाइन्सने फ्रंटियर एरलाइन्सशी केलेले कंत्राट बंद केले व जून २३ पासून आपली सेवा फ्रंटियरला देणे बंद केले.[६]
मार्ग
फ्रंटियर एरलाइन्सच्या मार्गांची रचना हब-अँड-स्पोक[मराठी शब्द सुचवा] तत्त्वावर आधारित आहे. यात बव्हंश मार्ग डेन्व्हरसारख्या मोठ्या विमानतळाहून सुरू होतात आणि संपतात. यामुळे कोणत्याही शहरातून इतर शहरास डेन्व्हर, मिलवॉकी, इ. विमानतळापर्यंत एक आणि मग तेथून इच्छित शहरापर्यंत दुसरी अशा दोन धावांमध्ये पोचता येते. या प्रकारच्या मार्गरचनेमुळे विमानांचा सांभाळ व निगा करणे सुद्धा सोपे जाते कारण बहुतेक सगळी विमाने रोज नाही तरी दर काही दिवसांनी मोठ्या तळावर येत असतात.
ताफा
फ्रंटियर एरलाइन्सने आपल्या ताफ्यात फक्त एरबसची विमाने राखली आहेत. [७]
प्रकार | सेवारत | मागणी | प्रवासी | नोंदी | |||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
एरबस ए३२०-२०० | १२ | १८० | २०२५ पर्यंत निवृत्त केली जातील.[८] | ||||||
एरबस ए३२०निओ | — | ८२ | ४९ | ही विमाने २०१६पासून दाखल होत आहेत.[९] | |||||
एरबस ए३२१-२०० | २१ | २३० | २०२९ पर्यंत निवृत्त केली जातील. | ||||||
एरबस ए३२१निओ | ४ | १५४[१०] | २४० | ||||||
एकूण | ११९ | २२१ |
प्रकार | बदली आलेली विमाने | निवृत्तीवर्ष |
---|---|---|
एरबस ए३१८-१००[१] Archived 2015-04-17 at the Wayback Machine. | एरबस ए३२०-२०० | २०१३ |
एम्ब्राएर ई-१७० | एरबस ए३२०-२०० | २०१३ |
एम्ब्राएर ई-१९० | एरबस ए३२०-२०० | २०१३ |
बोईंग ७३७-२००[२] Archived 2015-04-17 at the Wayback Machine. | एरबस ए३१८-१०० | २००४ |
बोईंग ७३७[३] Archived 2015-04-17 at the Wayback Machine. | एरबस ए३१९-१०० | २००५ |
फ्रंटियर एरलाइन्स ही एरबस ए३१८ प्रकारचे विमान वापरणारी पहिली कंपनी होती. या प्रकारची फ्रंटियरची सगळी विमाने आता निवृत्त झाली आहेत. पैकी दहा विमानांतून सुटे भाग काढून ते दुसऱ्या विमानांत वापरण्यात आले किंवा इतर कंपन्यांना विकण्यात आले होते. [११] २०११मध्ये रिपब्लिक एारवेज होल्डिंग्स या फ्रंटियर एरलाइन्सच्या पालक कंपनीने ६० एरबस ए३२०निओ आणि २० एरबस ए३१९निओ प्रकारच्या विमानांची मागणी नोंदवली.[१२] २०१४मध्ये ९ ए३२१निओ प्रकारच्या विमानांचीही मागणी नोंदवली गेली.[१३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "प्रवासमार्ग आणि वेळापत्रक Archived 2011-12-06 at the Wayback Machine.." (इंग्लिश मजकूर) फ्रंटियर एरलाइन्स. मार्च ७, इ.स. २०११रोजी पाहिले.
- ^ फ्रंटियर एरलाइन्स - आमचा इतिहास[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- ^ एरबसच्या सगळ्यात नवीनतम आणि सगळ्यात छोट्या विमानाला प्रमाणपत्र[permanent dead link]
- ^ "Frontier Airlines Fact Sheet". Frontier Airlines. 2011-07-24 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2006-11-01 रोजी पाहिले.
- ^ "Frontier Airlines is a Major Carrier[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2006-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-02 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ Leavitt, Noelle (2008-04-23). "Republic Airways wants $260M after Frontier cancels contract". Denver Business Journal. 2008-04-23 रोजी पाहिले.
- ^ "फ्रंटियर एर". 2013-12-29 रोजी पाहिले.
- ^ Pearson, James (2022-10-13). "Frontier's 1st Airbus A321neo Enters Revenue Service Tomorrow". Simple Flying (इंग्रजी भाषेत). 2023-01-07 रोजी पाहिले.
- ^ "Frontier Airlines Announces Huge Expansion with Commitment for 134 Aircraft".
- ^ "US's Indigo Partners orders 255 A321neo Family jets". Ch-Aviation. 14 November 2021.
- ^ "Frontier Airlines A318 Production List search - Planespotters.net". 2014-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 October 2014 रोजी पाहिले.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;flightglobal1
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "A321s for Frontier". Airliner World: 15. January 2015.