Jump to content

फोर्ट विल्यम कॉलेज

फोर्ट विल्यम कॉलेज तथा कॉलेज ऑफ फोर्ट विल्यम भारताच्या कोलकाता शहरातील उच्च शिक्षणसंस्था होती.

याची स्थापना लॉर्ड वेलेस्लीने जुलै १०, इ.स. १८०० रोजी केली. या संस्थेचा मुख्य उद्देश भारतात आलेल्या ब्रिटिश अधिकारीवर्गास भारतीय समाज, संस्कृती आणि साहित्याची ओळख करून देण्याचा होता. यासाठी येथे संस्कृत, फारसी, बंगाली, हिंदी आणि उर्दू भाषांमधील शेकडो पुस्तकांचा अभ्यास तसेच इंग्लिशमध्ये भाषांतर करण्यात आले.