फोर स्ट्रोक इंजिन
दुचाकी गाड्यांमध्ये असणारे पेट्रोलवर चालणारे इंजिन. या दुचाकी गाड्यात पेट्रोलमध्ये वंगण (ऑईल) मिसळावे लागत नाही. यामुळे प्रदुषण काहीसे नियंत्रणात राहते. व जागतिक तापमान वाढही मर्यादीत स्वरूपात होते. पेट्रोलचे प्रमाण टू स्ट्रोक इंजिनच्या प्रमाणात बरेच कमी लागते. आज जगातील बहुतेक वाहने ही ४ स्ट्रोक इंजिनवर चालत आहेत. या इंजिनचे कार्य ४ स्ट्रोक मध्ये चालते. हे चार स्ट्रोक खालीलप्रमाणे
- शोषण स्ट्रोक
- दाब स्ट्रोक
- ज्वलन (ताकद) स्ट्रोक
- उत्सर्जन स्ट्रोक
Starting position, intake stroke, and compression stroke.
Ignition of fuel, power stroke, and exhaust stroke.
- शोषण स्ट्रोक - शोष्ण हे इंजिनमधील पहिली पायरी अथवा स्ट्रोक् आहे. या पायरी मध्ये इंजिनला लागणारे इंधन व ते इंधन ज्वलनासाठी लागणारी हवा इंजिनमध्ये पुरवली जाते. या स्ट्रोकमध्ये पिस्टन क्रॅंकच्या दिशेने जात असते जेणेकरून येणाऱ्या इंधन व हवेसाठी जागा होते व ते शोषले जाते
- दाब स्ट्रोक - ही दुसरी पायरी अथवा स्ट्रोक आहे. या स्ट्रोकमध्ये पिस्टन क्रॅंकच्या विरुद्ध दिशेस प्रवास करते जेणेकरून हवा व इंधन यास मिळणारी जागा कमी होते व इंजिनमधील दाब वाढतो.
- ज्वलन स्ट्रोक- ही तिसरी व सर्वात महत्त्वाची पायरी अथवा स्ट्रोक आहे. दाब स्ट्रोकामध्ये पिस्टन जेव्हा सर्वात दूरच्या जागेवर पोहोचते त्यावेळेस इंजिनमधील पोकळी सर्वात कमी व दाब सर्वात जास्त असतो. या वेळेस इंधनामध्ये स्पार्क प्लगच्या साहाय्यने ठिणगी उडवली जाते व इंधन जळते. जळणाऱ्या इंधनाचे तापमान वाढून त्याचे प्रसरण होते व त्यासाठी पिस्टनला क्रॅंकच्या दिशेने ढकलले जाते.
- उत्सर्जन स्ट्रोक- ही चौथी व शेवटची पायरी आहे. या स्ट्रोकामध्ये पिस्टन पुन्हा क्रॅंकच्या विरुद्ध दिशेस प्रवास करते व इंजिनमधील पोकळी कमी करते परंतु दाब वाढू दिला जात नाही या साठी उत्सर्जन व्हॉल्व उघडला जातो व ज्वलन झालेले वायू इंजिनमधून बाहेर पडतात व इंजिन पुन्हा शोषण स्ट्रोकसाठी तयार होते.
भारतातील फोर स्ट्रोक इंजिने
भारतात या प्रकारचे इंजिन रॉयल एन्फिल्ड या कंपनीच्या बुलेट नावाच्या दुचाकी गाडीत वापरलेले होते. या आधी ट्राय्म्फ नावाच्या गाडीतही साधारणपणे अशाच प्रकारचे इंजिन वापरले गेले होते. मात्र या कंपनीचे भारतातील कार्य बंद पडले. मात्र बुलेट या गाडीच्या इंजिनात अनेक वर्षे कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. हे इंजिन ३५० सी.सी. आणि ५०० सी. सी. अश्या दोन प्रकारात उपलब्ध होते. हिरो होंडा या कंपनीने ने इ.स. १९८९ साली सी.डी १०० ही भारतातील पहिली १०० सी सीची छोटे फोर स्ट्रोक इंजिनाची रचना असलेली दुचाकी भारतात आणली.