फैसलाबादचा पाकिस्तान-भारत कसोटी सामना २००६
भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना फैसलाबादच्या इकबाल स्टेडियममध्ये खेळला गेला.
भारताचा संघ
- राहुल द्रविड - संघनायक
- वीरेंद्र सेहवाग - उपनायक
- वी. वी. एस. लक्ष्मण
- सचिन तेंडुलकर
- रुद्र प्रताप सिंग
- युवराजसिंग
- महेंद्रसिंग धोणी - यष्टिरक्षक
- इरफान पठाण
- झहीर खान
- अनिल कुंबळे
- हरभजनसिंग
पाकिस्तानचा संघ
- इंजमाम उल-हक - संघनायक
- युनिस खान - उपनायक
- शोएब मलिक
- सलमान बट्ट
- मोहम्मद युसुफ
- शहीद आफ्रिदी
- कामरान अक्मल
- अब्दुल रझाक
- मोहम्मद आसिफ
- शोएब अख्तर
- दानिश कणेरिया
थोडक्यात वर्णन
लाहोरच्या खेळपट्टी सारखीच खेळपट्टी असल्याने या सामन्यातही निकाल अपेक्षित नव्हताच. पाकिस्तानने परत नाणेफेक जिंकुन पाकिस्तानने फलंदाजी घेतली व पहिल्या डावात ५८८ धावा केल्या. उत्तरादाखल भारताने ६०३ धावा केल्या.
दुसऱ्या डावात पाकिस्तानने ८ बाद ४९० धावा करून डाव घोषित केला व भारतापुढे १०-१५ शटकात ४७६ धावा करायचे 'आव्हान' ठेवले. वेळ संपली तेव्हा भारताने ८ शटकात बिनबाद २१ धावा केल्या.
थोडक्यात धावफलक
पहिला डाव
- पाकिस्तान: ५८८ (शहीद आफ्रिदी-१५६, इंजमाम उल-हक-११९*, रुद्र प्रताप सिंग-४/८९)
- भारत: ६०३ (महेंद्रसिंग धोणी-१४८, राहुल द्रविड-१०३*)
दुसरा डाव
- पाकिस्तान: ८ बाद ४९० घोषित (युनिस खान-१९४, मोहम्मद युसुफ-१२६*, झहीर खान-४/६१)
- भारत: बिनबाद २१
निकाल
सामना अनिर्णित.