फेमिनिझम विदाउट बॉर्डर
मोहंती, सी.टी.(२००३).फेमिनिझम विदाऊट बॉर्डर: डीकोलोनायसिंग,प्रेक्टीसिंग सॉलिडॉरीटी.जुबान.
दोन दशके स्त्रीवादी अभ्यासाच्या प्रवाहात राहिल्या, झगडल्यानंतर हे पुस्तक निर्माण झाले असे लेखिका म्हणते. तिसरे जग आणि बहुराष्ट्रीय स्त्रीवाद याच्या अभ्यासक असलेल्या मोहंती यांची सहसंपादीत पुस्तके प्रसिद्ध आहेत. उदा.थर्ड वर्ल्ड वुमेन अन्ड द पॉलिटिक्स ऑफ फेमिनिझ् (१९९१),आणि फेमिनिस्ट जीनिओलोजीज कॉलोनीअल लीगसीज,डेमोक्रेटिक फ्युचर्स(१९९७).
या पुस्तकात वंचित आणि शोषित स्त्रियांच्या अनुभवांना मान्यता देताना सत्ता संबंध कसे काम करतात याचा आढावा आढावा घेण्यात आला आहे. सक्षमीकरणाचे "ज्ञान" आणि स्त्रीवाद्यांची युती या संदर्भातील सिद्धांकने आणि व्यवहार यांचा गोषवारा या पुस्तकात आहे. या दोन्ही संकल्पना राजकीय दृष्ट्या सिद्धांकन म्हणून भिन्न आहेत. राजकीय दृष्ट्या निष्कर्ष काढण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी वेगवेगळ्या स्त्रीवादी संकल्पना मग त्या अध्यापन आणि विना-अध्यापन,सैद्धांतिक किंवा प्रायोगिक असल्या तरीही त्यांचा उपयोग केला पाहिजे. स्त्रीवादाची युती ही लेखिकेची कल्पना रॉबिन मॉरगनच्या "भगिनीभाव" या संकल्पनेच्या पुढे जाते. लेखिकेच्या मते, भगिनीभावामध्ये तात्कालीन साम्राज्यवादाचे परिणाम आणि प्रत्येकाचा भिन्न इतिहास पुसला जाऊन "सहमती" आणि मुद्द्यांचे प्रामाणिकीकरण हे वेगवेगळ्या समुहातील नात्यांचे आधार ठरतात.
या पुस्तकात प्रस्तावनेश नउ प्रकरणे आहेत. यातील बहुतांश लेख पूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. लेखिकेच्या मते हे पुस्तक एका क्रमवारीत नसून मांडण्याची विविध आवर्तने आहेत,ज्यामध्ये एकच प्रश्न किवां समान प्रश्न वेगवेगळ्या पातळीवर विचारला जातो. या पुस्तकाचे तीन भाग आहेत. "स्त्रीवादाचे निर्वसह्तीकरण", "भांडवलवादाचे गुढकरण", आणि "स्त्रीवादाच्या दृष्टीकोनाची पुनर्रचना".
पहिल्या भागात पाश्चिमात्य दृष्टीखाली: स्त्रीवादी लिखाण आणि वसाहतवादी चर्चाविश्वे हा लेख १९८६ साली प्रसिद्ध होऊन त्याचे अनेक भाषांत भाषांतर झाले आहे. तर पुस्तकाच्या तिसऱ्या भागात "पाश्चिमात्य दृष्टीखाली" पुनरावलोकन:भांडवलवादाविरोधी स्त्रीवादाची युती या प्रकरणात मोहंती त्यांच्या लेखनावरील समिक्षेवर लिहितात.युरोपकेंद्री पाशचिमात्य जगाचे तिसऱ्या जगातील स्त्रियांच्या आकलनाकडून जागतिक भांडवलवादाकडे लेखिकेच्या अभ्यासाचा रोख कसा आणि का वळला याचे विवेचन करून पितृसत्ता आणि वंशवाद यांच्याशी याच मुद्द्यावर लढा द्यावा लागेल असे लेखिका नमूद करते.
या प्रकरणात विविध स्त्रीवादी अभ्यासातील वर्गखोल्या( पाठ्यक्रम), आणि चार्चाविश्व अधिक जगतिक बनवले पाहिजे आणि विद्यार्थी अ अभ्यासक यांनी चळवळीत आले पाहिजे याची चर्चा केली आहे. आज स्त्रीवादामध्ये जरी वर्ण-वर्ग आणि लैंगिकता यातील वेगळेपणा मान्य केला गेला असला तरी या सर्वांचे विशेषतः पश्चिमात्य दृष्टीकोनातून कुठल्या एका ठिकणी समानत्व याकडे अधिक लक्ष दिले जाते. लेखिकेच्या मते जर स्त्रीवादी अभ्यास अधिक बहुराष्ट्रीय करायचा असेल आणि सत्ता संबंधांची प्रचलित प्रारूपे आणि आधीच्या दृष्टीकोनातील मर्यादा यांना ओलांडायचे असेल तर स्त्रीवादाची पर्यटन स्वरुपी उदा.भारतातील हुंडा बळी, प्रारूपे वगळली पाहिजेत. "वेगळे परंतु समान"दृष्टीकोन आता अपरिपूर्ण आहे. शुद्धलेखन करण्याजोगे लेख