फेब्रुवारी २१
फेब्रुवारी २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५२ वा किंवा लीप वर्षात ५२ वा दिवस असतो.
ठळक घटना
अठरावे शतक
- १७९५ - डच ईस्ट इंडिया कंपनीने श्रीलंकेवर सांगितलेला आपला हक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिला.
एकोणिसावे शतक
- १८०४ - जगातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे ईंजिन वेल्समधील पेन-इ-डॅरेन आयर्नवर्क्स या कारखान्यात तयार झाले.
- १८४२ - जॉन जे. ग्रीनॉने शिवणाच्या मशीनचा पेटंट घेतला.
- १८४८ - कार्ल मार्क्सने साम्यवादी जाहीरनामा(कम्युनिस्ट मॅनिफेस्टो) प्रकाशित केला.
- १८७८ - न्यू हेवन, कनेक्टिकटमध्ये पहिली टेलिफोन डिरेक्टरी[मराठी शब्द सुचवा] वितरीत केली गेली.
- १८८५ - वॉशिंग्टन डी.सी.मध्ये वॉशिंग्टन स्मारकाचे उद्घाटन.
विसावे शतक
- १९१५ - लाहोर कट - लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
- १९१६ - पहिले महायुद्ध - व्हर्दुनची लढाई सुरू.
- १९४७ - एडविन लॅंडने पोलेरॉईड कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
- १९५२ - इंग्लंडमध्ये नागरिकांनी ओळखपत्र नेहमी जवळ बाळगायची सक्ती करणारा कायदा रद्ध.
- १९५३ - फ्रांसिस क्लार्क व जेम्स डी. वॅट्सननी डी.एन.ए.च्या रेणूची रचना शोधली.
- १९५९ - प्रेस क्लब ऑफ इंडियाची नवी दिल्ली येथे स्थापना.
- १९६० - क्युबात फिदेल कास्त्रोने सगळ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले.
- १९६५ - न्यू यॉर्क मध्ये नेशन ऑफ इस्लामच्या सदस्यांनी माल्कम एक्सची हत्या केली.
- १९७० - स्वित्झर्लंडच्या झुरिक शहराजवळ स्विस एर फ्लाईट ३३० मध्ये आकाशात बॉम्बस्फोट होउन विमान नष्ट. ३८ ठार.
- १९७२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने चीनला भेट दिली.
- १९७३ - इस्रायेलच्या लढाउ विमानांनी लिब्याचे नागरी विमान पाडले. १०८ ठार.
- १९७४ - इस्रायेलने सुएझ कालव्याचा ताबा सोडला.
- १९९५ - अल्जीरियातील कारागृहात उठाव. ४ रक्षक व ९६ कैदी ठार.
- १९९५ - स्टीव फॉसेटने गरम हवेच्या फुग्यातुन एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
- १९९९ - भारत आणि पाकिस्तानमध्ये लाहोर करार मान्य झाला.
एकविसावे शतक
- २००७ - इटलीच्या पंतप्रधान रोमानो प्रोदीने राजीनामा दिला परंतु राष्ट्राध्यक्ष जॉर्जियो नॅपोलितानोने तो नामंजूर केला.
जन्म
- १६८८ - उलरिका एलिनोरा, स्वीडनची राणी.
- १७२८ - झार पीटर तिसरा, सम्राज्ञी कॅथेरिनचा पती.
- १८७५ - जीन काल्मेंट, हिचे मृत्युच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे.
- १८९४ - शांती स्वरूप भटनागर, भारतीय शास्त्रज्ञ.
- १८९६ - सूर्यकांत त्रिपाठी निराला, हिंदी सााहित्यिक.
- १९२३ - विश्वनाथ नारायण लवांडे, गोवा मुक्ति संग्रामातील नेते.
- १९३७ - हॅराल्ड पाचवा, नॉर्वेचा राजा.
- १९४२ - जयश्री गडकर, मराठी चित्रपट अभिनेत्री.
- १९५२ - ज्या पिंग्वा, चिनी भाषेमधील कादंबरीकार.
- १९५२ - टी.आर. जेलियांग, नागालँडचे १०वे मुख्यमंत्री.
- १९७० - मायकेल स्लेटर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८० - जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक, भूतानाचा राजा.
- १९८० - प्रतिभा सुरेश्वरन, भारतीय रेसिंग चालक.
मृत्यू
- १४३७ - जेम्स पहिला, स्कॉटलंडचा राजा.
- १५१३ - पोप ज्युलियस दुसरा.
- १८२९ - राणी चेन्नम्मा, कर्नाटकातील कित्तूरची राणी.
- १८४६ - निंको, जपानी सम्राट.
- १८६२ - जस्टिनस कर्नर, जर्मन कवी.
- १९०१ - जॉर्ज फ्रांसिस फित्झगेराल्ड, आयरिश गणितज्ञ.
- १९२६ - हाइका केमरलिंघ ऑन्स, डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७० - हरि विनायक पाटस्कर मध्य प्रदेशचे राज्यपाल.
- १९७५ - राजा नेने, मराठी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक.
- १९९१ - नूतन, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९९८ - ओम प्रकाश, हिंदी चित्रपट अभिनेते.
प्रतिवार्षिक पालन
- आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन.
- भाषा दिन - बांगलादेश.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी १९ - फेब्रुवारी २० - फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २३ - (फेब्रुवारी महिना)