फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स
फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स हि एक आलिशान हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालविणारी कॅनेडियन कंपनी आहे.[१] सध्या फेअरमोंटच्या पुढे दिलेल्या देशांत २२ मालमत्ता आहेत: कॅनडा, युनायटेड स्टेट्स, अझरबैजान, बार्बाडोस, बर्मुडा, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, इजिप्त, जर्मनी, इंडोनेशिया, केन्या, मेक्सिको, मोनॅको, फिलिपाईन्स, सौदी अरेबिया, सिंगापूर, साउथ आफ्रिका, स्वित्झर्लंड, तुर्की, युक्रेन, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड किंग्डम, भारत.[२]
कॅनडा मध्ये फेअरमोंट त्यांच्या ऐतिहासिक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे: विक्टोरिया येथील द एम्प्रेस, वॅनकूवर येथील द हॉटेल वॅनकूवर, कॅल्गरी येथील द पल्लीसेर, एडमंटन येथील हॉटेल मॅकडोनाल्ड, ओटावा येथील शॅट्यु लौरीर, टोरांटो येथील रॉयल यॉर्क, अल्बर्टा येथील बॅंफ स्प्रिंग्स, क्युबेक येथील शॅट्यु फ्रॅंटेनाच, मॉंट्रियल येथील क्वीन एलिझाबेथ हॉटेल. यांपैकी बहुतांश हॉटेल्स ही कॅनेडियन पॅसिफिक रेल्वे आणि कॅनेडियन नॅशनल रेल्वे यांनी १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला बांधली होती.
फेअरमोंटच्या हॉटेल्समध्ये आणखी इतर काही लक्षणीय हॉटेल्सचा समावेश आहे जसे कि न्यू यॉर्क येथील द प्लाझा, लंडन येथील द स्वोय हॉटेल, शांघाय येथील द पीस हॉटेल, मक्का येथील मक्का क्लॉक रॉयल टॉवर हॉटेल, आणि नुकतेच बनविलेले लॉस ॲंजेल्स येथील सेंचुरी प्लाझा हॉटेल.[३]
इतिहास
फेअरमोंट हे नाव धारण करणारे पहिले हॉटेल सान फ्रांसिस्को येथे होते. बांधकाम पूर्णत्वास येत असतांना १९०६मध्ये झालेल्या भूकंपात याची इमारत पडली नाही पण त्यानंतर लागलेल्या आगींमुळे झालेले नुकसान जुलिया मॉर्गन या स्थापत्यशास्रीच्या नेतृत्वाखाली पुनर्विकसित करण्यात आले आणि हॉटेल १९०६ मध्ये खुले करण्यात आले. त्यानंतर १९४५मध्ये ते हॉटेल बेन्जामिन स्विग यांच्याकडून अधिग्रहित करण्यात आले.
१९६० पासून फेअरमोंट ने अमेरिकेच्या मोठ्या शहरांमध्ये लक्जरी हॉटेल्सची छोटी शृंखला सुरू करायला सुरुवात केली. ज्यावेळी १९९९मध्ये कॅनेडियन पॅसिफिक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ने फेअरमोंटला विकत घेतले त्यावेळी युनायटेड स्टेट्स मध्ये त्यांच्या मालकीच्या ७ मालमत्ता होत्या:
- द फेअरमोंट सॅन फ्रांसिस्को
- द फेअरमोंट न्यू ऑर्लिन्स
- द फेअरमोंट कोपली प्लाझा हॉटेल, बॉस्टन
- द प्लाझा हॉटेल, न्यू यॉर्क
- द फेअरमोंट शिकागो
- द फेअरमोंट, डलास
- द फेअरमोंट सॅन होसे
याव्यतिरिक्त १९७०मध्ये काही काळासाठी फिलाडेल्फिया मधील बेल्लेवुइ स्ट्रॅटफोर्ड हॉटेल हे द फेअरमोंट, फिलाडेल्फिया या नावाखाली चालविण्यात आले होते.
१९९९मध्ये फेअरमोंट विकत घेतल्यानंतर कॅनेडियन पॅसिफिक लिमिटेड २००१ साली विविध विभागांचे बाजारमूल्य वाढविण्यासाठी घेतलेल्या निर्णयानंतर ५ कंपन्यांमध्ये विभाजित झाली. जुन्या कॅनेडियन पॅसिफिक हॉटेल्स विभागाने तुलनेने लहान असलेल्या फेअरमोंट शृंखलेचे नाव धारण केले आणि त्यांनी आपल्या नव्या कंपनीचा नवीन जागतिक दृष्टीकोन दाखविला.[४]
२००४ साली फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसोर्ट्स ने त्यांच्या मालमत्ता चालविणाऱ्या कंपनीचे पूर्ण नियंत्रण घेण्यासाठी त्यांना ७० मिलियन अमेरिकन डॉलर्सची किंमत प्रदान केली.[५] त्यांनी फेअरमोंट मॅनेजमेन्ट कंपनी या अमेरिकेत असलेल्या मारिट्झ वोल्फफ आणि कं. यांच्या मालकीच्या कंपनीतील १६.५% हिश्यासाठी ७० मिलियन अमेरिकन डॉलर्स देऊन व्यवहार पूर्ण केला.
ऑक्टोबर २००५मध्ये फेअरमोंटने त्यांचा एका दिवसातील न्यूनतम कमाईचा $३५.५३चा आकडा गाठला जो त्याच्या ऑगस्ट २००१ मधील पहिल्याच दिवशीच्या कमाईपेक्षा ३७ सेंट्स ने कमी होता. २००६ च्या सुरुवातीला कंपनीचे एक गुंतवणूकदार कार्ल इकन यांनी सुरू केलेल्या एका वादग्रस्त लिलाव युद्धात ते हरल्यानंतर, फेअरमोंट, कॉलोनी कॅपिटल आणि सौदी अरेबिया येथील किंग्डम हॉटेल्स इंटरनॅशनल यांना $३.९ बिलियनला विकण्यात आली. या खरेदीमुळे फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसोर्ट्स, किंग्डमच्या रॅफल्स हॉटेल्स आणि रिसोर्ट्स आणि स्वीसोटेल यांच्यासोबत विलीन करण्यात येऊन फेअरमोंट रॅफल्स हॉटेल्स इंटरनॅशनल ही कंपनी स्थापन करण्यात आली. पण चारही शृंखला त्यांच्याच नावाखाली चालविण्यात आल्या.
डिसेंबर २०१५मध्ये, ऍकोर ने फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसोर्ट्स, रॅफल्स आणि स्वीसोटेल यांचा एकत्रितपणे $२.९ बिलियनला सौदा केला.[६]
संदर्भ
- ^ "Fairmont Hotels and Resorts - The Birth of the Brand".
- ^ "About Fairmont Hotels in Jaipur".
- ^ "Fairmont Hotels will operate the revamped Century Plaza hotel".
- ^ "Fairmont lagged others in CP 'starburst'".
- ^ "Fairmont Buys Remains Of Management Co. For $70M". 2020-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-21 रोजी पाहिले.
- ^ "French hotel chain Accor buys Fairmont, Raffles and Swissotel for $2.9B US".