फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज व महात्मा जोतीराव फुले |
फुले–शाहू–आंबेडकरांचा महाराष्ट्र हे भारतीयांचे प्रामुख्याने महाराष्ट्रातील मराठी लोकांचे एक घोषवाक्य आहे. महाराष्ट्राला महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला आहे. या विचारवंतांच्या पुरोगामी विचारांमुळे महाराष्ट्राला "पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र" म्हणले जाते. या तीन व्यक्तींनी उपेक्षितांच्या 'शिक्षण व हक्कासाठी' संघर्ष केला. 'फुले-शाहू-आंबेडकर' या त्रयीचा नामोल्लेख महाराष्ट्रातील समाजकारणात आणि राजकारणात मोठ्या प्रमाणावर केला जातो.[१][२][३]
संदर्भ
- ^ author/online-lokmat (2020-05-01). "Maharashtra Day: ...तरच शाहू, फुले, आंबेडकर अन् यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडेल". Lokmat. 2020-08-05 रोजी पाहिले.
- ^ "'फुले-शाहू-आंबेडकर' भाषणापुरतेच!". Maharashtra Times. 2020-08-05 रोजी पाहिले.
- ^ धारा, Lalitha Dhara ललिता (2016-11-25). "शाहू : फुले और आंबेडकर के बीच की महत्वपूर्ण कड़ी". फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2020-08-05 रोजी पाहिले.