फुलकरी
पंजाबी भरतकामाचा परंपरागत प्रकार. फुलकरीप्रमाणेच ‘बाग’ हा त्याचा आणखी एक प्रकार. सण-समारंभात पंजाबी स्त्रिया बाग नामक नक्षीयुक्त शाल वा चादर परिधान करतात तर नववधूसाठी फुलकरीचा वापर करण्याची,फुलकारी ओढण्या भेट म्हणून देण्याची परंपरा फार जुनी आहे. ज्या शालीवर वा चादरीवर बगिच्याच्या नमुन्याचे भरतकाम केलेले असते, तो बाग आणि ज्यावर भौमितिक पद्धतीने वेलबुटीचे आकृतिबंध भरलेले असतात, ती फुलकरी होय. बाग हा प्रकार पंजाबात गुजर ह्या भटक्या लोकांमार्फत मध्य आशियातून आला असावा किंवा इराणमधील ‘गुलकरी’ म्हणजेच पंजाबातील ‘फुलकरी’ होय अशी मते आढळतात. तीरंजन पंजाबमधील खेड्यापाड्यांमध्ये आजही मुलीचा जन्म झाला, की तिची आई आणि आजी तिच्यासाठी फुलकारी वस्त्र भरायला घेतात आणि तिच्या लग्नापर्यंत ‘फुलकारी’चं भरतकाम केलेली अनेक वस्त्रं तसेच खास करून लाल रंगाची ओढची/साडी/दुपट्टा तयार करतात आणि तिला तिच्यासोबत तिच्या सासरी पाठवतात.शिवाय सणावारांना तिथल्या सवाष्ण स्त्रीची ओटी पारंपरिक फुलकारीच्या वस्त्रांनी भरली जाते. वर्षानुवर्षं पंजाबमधील या स्त्रिया घरातलं काम संपवून दुपारी एकत्र येऊन सामूहिकरित्या आपापलं फुलकारी काम मोठ्या कौशल्यानं करत असतात. हे काम करता-करता त्या सामूहिक लोकगीतंही म्हणतात आणि मधूनमधून विरंगुळा म्हणून लोकनृत्यही करतात. या सोहळ्यालाच ‘तीरंजन’असं म्हटलं जातं.पंजाबमधील ‘हिर-रांझा’च्या रोमँटिक कथांमधून ‘फुलकारी दुपट्ट्या’चा उल्लेख आपण कदाचित कधीतरी ऐकला असेल! फुलकारी हा भरतकामाचा हाताने केला जाणारा पंजाबमधील एक पारंपरिक प्रकार असून, सतराव्या शतकातील साहित्यात या कलेचा उल्लेख सापडतो आणि कदाचित त्याही आधीपासून ही कला अस्तित्त्वात असल्याचं मानलं जातं. पंजाबमधील स्थानिक स्त्रियांचा, साडी या पारंपरिक पेहराव नसला, तरी शाली आणि दुपट्ट्यांवर केलं जाणारं फुलकारी-वर्क खूप लोकप्रिय आहे. पंजाबी लग्नांमधील नवरीच्या पेहरावात पारंपरिक फुलकारी दुपट्ट्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. . सूर्यफूल, कमळ, झेंडू, चमेली, इत्यादी फुलांबरोबर मोहरी, कारलं, फ्लॉवर, कोथिंबीर, मिरची इत्यादी झाडावरच्या फुलांचाही नक्षीकामात वापर केला जातो. फुलांबरोबरच काही भौमितिक आकार, नक्षीची लकेर, मोर आणि इतर प्राणी-पक्षी सुद्धा यात भरले जातात. सुरुवातीच्या काळात हातानं सूत कातून त्यापासून हातमागावर विणलेल्या जाड