Jump to content

फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार

ফিল্মফেয়ার শ্রেষ্ঠ পার্শ্ব অভিনেত্রী পুরস্কার (bn); Filmfare Award de la meilleure actrice dans un second rôle (fr); ફિલ્મફેર સર્વશ્રેષ્ઠ સહાયક અભિનેત્રી પુરસ્કાર (gu); Filmfare Award за лучшую женскую роль второго плана (ru); फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार (mr); Filmfare Award/Beste Nebendarstellerin (de); فلمفير جايزه د ښه مرستندويي لوبګري لپاره (ps); 印度電影觀眾獎最佳女配角 (zh); Филмферова награда за најбољу споредну глумицу (sr); فلم فیئر اعزاز برائے بہترین معاون اداکارہ (pnb); فلم فیئر اعزاز برائے بہترین معاون اداکارہ (ur); フィルムフェア賞 助演女優賞 (ja); Penghargaan Filmfare untuk Aktris Pendukung Terbaik (id); Nagroda Filmfare dla Najlepszej Aktorki Drugoplanowej (pl); פרס פילמפייר לשחקנית המשנה הטובה ביותר (he); Filmfare for bedste kvindelige birolle (da); Filmfarepris för bästa kvinnliga biroll (sv); फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्री पुरस्कार (hi); Premi Filmfare a la millor actriu de repartiment (ca); Anugerah Filmfare untuk Pelakon Pembantu Wanita Terbaik (ms); Filmfare Award for Best Supporting Actress (en); جائزة فيلم فير لأفضل ممثلة في دور ثانوي (ar); Gwobr Filmfare am yr Actores Gefnogol Orau (cy); جایزه فیلم‌فیر بهترین بازیگر نقش مکمل زن (fa) award (en); শ্রেষ্ঠ পার্শ্ব অভিনেত্রী বিভাগে ফিল্মফেয়ার পুরস্কার (bn); award (en); પુરસ્કાર (gu) Filmfare за лучшую женскую роль второго плана (ru); フィルムフェア賞 最優秀助演女優賞 (ja); Filmfare Award du meilleur second rôle féminin (fr)
फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार 
award
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचित्रपट पुरस्कार श्रेणी,
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार,
फिल्मफेर पुरस्कार
स्थान भारत
विजेता
स्थापना
  • इ.स. १९५५
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. जरी फिल्मफेअर पुरस्कार १९५४ मध्ये सुरू झाले असले तरी, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीची श्रेणी पुढील वर्षी १९५५ मध्ये सुरू झाली.

अभिनेत्री उषाकिरण यांना फनी मजुमदार दिग्दर्शीत बादबान चित्रपटातील मच्छीमार मुलगी मोहनीयाच्या भुमिकेसाठी पहिला पुरस्कार देण्यात आला. ह्या वर्षी दुसरे कोणतेही नामांकन नव्हते.[] रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील भूमिकेसाठी २०२४ मध्ये शबाना आझमी यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. आझमींना या आधी २०१७ मध्ये देखील हा पुरस्कार मिळाला होता.[] देवदास कादंबरीतील चंद्रमुखीच्या भुमिकेसाठी तीन वेळा हा पुरस्कार देण्यात आला आहे: वैजयंतीमाला (१९५७), माधुरी दीक्षित (२००३) आणि कल्की केकला (२०१०).

१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. अजून २०२४ पर्यंत हा पुरस्कार कधीही विभागून दिला गेला नाही. ह्या पुरस्काराचे विजेते अनेक वेळा सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री आणि सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) साठी पण नामांकीत / विजेते झाले आहे.

विजेते आणि नामांकन

निरूपा रॉय, फरीदा जलाल, जया बच्चन, सुप्रिया पाठक व राणी मुखर्जी ह्यांनी प्रत्येकी ३ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
अरुणा इराणीला सर्वात जास्त वेळा (१०) नामांकन मिळाले आहे.
वर्षविजेत्याचे चित्रअभिनेत्रीभूमिकाचित्रपट
१९५५उषाकिरणमोहनीयाबादबान
अन्य नामांकन नाही
१९५६निरूपा रॉयमालतीबिरज बहू
गीता बालीबसंतीकवी
सूर्यकुमारीराज रानीउडन खटोला
१९५७वैजयंतीमालाचंद्रमुखीदेवदास
अन्य नामांकन नाही
१९५८श्यामाचंचलशारदा
नंदालताभाभी
१९५९नलिनी जयवंतकिशोरीकाला पानी
ललिता पवाररुक्मीणी सिंहपर्वरीश
लीला चिटणीसमोहनची आईसाधना
१९६०ललिता पवारसौ. लि'देसाअनाडी
अनिता गुहारामकलीगुंज उठी शहनाई
शशिकलारमा चौधरीसुजाता
१९६१नंदाचंदाआंचल
दुर्गा खोटेमहाराणी जोधाबाईमुघल-ए-आझम
कुमकुमराजलक्ष्मी मरियम उझ-झमानीकोहिनूर
ललिता पवाररामूची आईआंचल
१९६२निरूपा रॉयमनोरमाछाया
शुभा खोटेरागिणीघराना
शुभा खोटेसीताससुराल
१९६३शशिकलाजसवंतीआरती
ललिता पवारसीतादेवी वर्माप्रोफेसर
वहिदा रेहमानजबासाहिब बीबी और गुलाम
१९६४ शशिकलालिलागुमराह
अमीतानसीममेरे मेहबूब
निम्मीनजमा
१९६५निरूपा रॉयशोभाशहनाई
ललिता पवारदाई माँकोहरा
शशिकलारूपाआई मिलन की बेला
१९६६पद्मिनीभानूकाजल
हेलनमिस किट्टीगुमनाम
शशिकलाडॉ. नीता वर्माहिमालय की गोद में
१९६७सिमी गरेवालडॉ. अंजलीदो बदन
शशिकलाअनिता बक्षी (ॲनी)अनुपमा
रिताफुल और पत्थर
१९६८जमुनागौरीमिलन
मुमताजशांताराम और श्याम
तनुजाअंजली (अंजू) नाथज्वेलथीफ
१९६९सिमी गरेवालरजनीसाथी
हेलनवीराशिकार
शशिकलाचंचलनील कमल
१९७०तनुजाधन्नोपैसा या प्यार
बिंदूरेणूइत्तेफाक
फरीदा जलालरेणूआराधना
१९७१चांद उस्मानीचंपापेहचान
बिंदूनीला आलोपी प्रसाददो रास्ते
मुमताजरिटाआदमी और इंसान
१९७२फरीदा जलालबेला सिंहपारस
अरुणा इराणीनिशाकारवां
हेलनलिलीएलान
१९७३झीनत अमानजस्बीर जैस्वाल / जैनीसहरे रामा हरे कृष्णा
बिंदूमालादास्तान
नाझिमामीनाबे-इमान
१९७४राखीचांदनीदाग
अरुणा इराणीनीमाबॉबी
बिंदूचित्रअभिमान
नूतनअनु रायअनुराग
महजुभीसौदागर
१९७५दुर्गा खोटेपार्वतीबिदाई
बिंदूकामिनी सिंहहवस
रिटाइम्तिहान
जयश्री तळपदेडान्सररेशम की डोरी
मौसमी चॅटर्जीतुलसीरोटी कपडा और मकान
१९७६नादिरामार्गरेटजुली
अरुणा इराणीरेखादो झूट
फरीदा जलालरेणू खन्नामजबूर
निरुपा रॉयसुमित्रा देवीदीवार
प्रेमा नारायणधनोअमानुष
१९७७- कजरीचंद्राबालिका बधू
आशा पारेखशांताउधर का सिंदूर
बिंदूसरला शुक्लअर्जुन पंडित
दीना पाठकगंगू रानीमौसम
वहिदा रेहमानअंजली मल्होत्राकभी कभी
१९७८आशा सचदेवरेणूप्रियतमा
अरुणा इराणीशांतिमोहन शर्मा / शांती "शन्नो" देवीखून पसीना
फरीदा जलालश्रीमती सुब्रह्मण्यमशॅक
नाझनीनपार्वतीदिलदार
राखी गुलजारनिशादूसरा आदमी
१९७९रीना रॉयकामिनी अग्रवालअपनापन
आशा पारेखतुलसी चौहानमैं तुलसी तेरे आंगन की
नूतनसंजुक्ता चौहान
रणजीतानिर्मला देशपांडेपती पत्नी और वो
रेखाजोहरा बेगममुकद्दर का सिकंदर
१९८०हेलनसूझीलहू के दो रंग
दीना पाठकश्रीमती कमला श्रीवास्तवगोल माल
फरीदा जलाललैलाजुर्माना
जेनिफर केंडलश्रीमती मरियम लबादूरजुनून
नीतू सिंगचन्नोकाला पत्थर
१९८१पद्मिनी कोल्हापुरेनीतू सक्सेनाइन्साफ का तराजू
आशालता वाबगांवकरसिद्धेश्वरीआपने पराये
दीना पाठकनिर्मला गुप्ताखुबसूरत
सिमी गरेवालकामिनी वर्माकर्ज
तल्लुरी रामेश्वरीमालाआशा
१९८२सुप्रिया पाठकसुभद्राकलयुग
अरुणा इराणीकॅथी डिसूझारॉकी
माधवीसपनाएक दुजे के लिए
नंदासंगीताआहिस्ता आहिस्ता
सारिकाअनिता कोहलीशारदा
१९८३ सुप्रिया पाठकशबनमबझार
किरण वैराळेचिंकीनमकीन
वहिदा रेहमानज्योती
नंदाछोटी माँप्रेम रोग
रंजिता कौरशांतीतेरी कसम
१९८४रोहिणी हट्टंगडीबाईअर्थ
पद्मिनी कोल्हापुरेराधासौतन
रेखाशकुंतलामुझे इंसाफ चाहिये
स्मिता पाटीलकविता सन्यालअर्थ
झीनतमंडी
१९८५अरुणा इराणीजानकीपेट प्यार और पाप
शर्मिला टागोरसितारासनी
रोहिणी हट्टंगडीशोभाभावना
रेहाना सुलतानकल्याणी शर्माहम रहे ना हम
सोनी राजदानसुजाता सुमनसरांश
१९८६नूतनआरतीमेरी जंग
अनिता कंवरनलिनीजनम
मधुर जाफरीकमला देवीसागर
राखी गुलजारसुजाता शर्मासाहेब
सुषमा सेठअमिना बाईतवायफ
तन्वी आझमीसीताप्यारी बहना
१९८७ पुरस्कार नाही
१९८८ पुरस्कार नाही
१९८९सोनू वालियानंदिनीखून भरी मांग
अनुराधा पटेलमायाइजाजत
पल्लवी जोशीसरोजअंधा युद्ध
१९९०राखीशारदा प्रताप सिंहराम लखन
अनिता कंवररेखा गोलूबसलाम बॉम्बे
रीमा लागूकौशल्या चौधरीमैने प्यार किया
सुजाता मेहताचंचल यादवयतीम
वहिदा रेहमानलता खन्नाचांदनी
१९९१रोहिणी हट्टंगडीसुहासिनी चौहानअग्नीपथ
राधिकालक्ष्मीआज का अर्जुन
रीमा लागूश्रीमती विक्रम रॉयआशिकी
संगीता बिजलानीगीता साराभाईजुर्म
१९९२फरीदा जलालबिबी गूलहीना
दीपा साहीआरती मल्होत्राहम
रमा विजअधीक्षक प्रभावतीप्रेम कैदी
वहिदा रेहमानदाईजानलम्हे
१९९३अरुणा इराणीलक्ष्मी चौटालाबेटा
पूजा बेदीदेविकाजो जीता वही सिकंदर
शिल्पा शिरोडकरइन्स्पे. मेंदी रणवीर सेठीखुदा गवाह
१९९४अमृता सिंगरोमा माथूरआईना
अनु अग्रवालकिरण/अनुराधा आर. बक्षीखलनायका
डिंपल कपाडियाशांतीगर्दीश
राखी गुलजारसावित्रीअनाडी
शिल्पा शेट्टीसीमा चोप्राबाजीगर
१९९५डिंपल कापडियामेघा दिक्षीतक्रांतिवीर
अरुणा इराणीआशा शर्मासुहाग
रवीना टंडनकाजल बन्सललाडला
रीमा लागूमधुकला चौधरीहम आपके हैं कौन..!
रेणुका शहाणेपूजा चौधरी
१९९६फरीदा जलाललाजवंती सिंहदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
अरुणा इराणीगायत्रीदेवी सिंहकार्तव्य
राखी गुलजारदुर्गा सिंहकरण अर्जुन
रिता भादुरीसुमित्रा गरेवालराजा
तन्वी आझमीफरीदाअकेले हम अकेले तुम
१९९७रेखामॅडम मायाखिलाडियों का खिलाडी
अर्चना पूरण सिंगशालिनी 'शालू' सहगलराजा हिंदुस्तानी
हेलनमारिया ब्रागांझाखामोशी: द म्युझिकल
सीमा बिस्वासफ्लेव्ही ब्रागांझा
तब्बूतुळशीबाईजीत
१९९८करिश्मा कपूरनिशादिल तो पागल है
अरुणा इराणीभाग्यलक्ष्मी दीक्षितगुलाम-ए-मुस्तफा
पूजा बत्राअनिताविरासत
राखी गुलजारसौ.सुजाता सिंगसीमा
उर्मिला मातोंडकरजान्हवी साहनीजुदाई
१९९९राणी मुखर्जीटिना मल्होत्राकुछ कुछ होता है
प्रीती झिंटाप्रीती नायरदिल से..
राखी गुलजारगीता मल्होत्रासैनिक
शेफाली शहाप्यारी म्हात्रेसत्या
तन्वी आझमीसौ. पौर्णिमा सहगलदुश्मन
२०००सुश्मिता सेनरुपाली वालियाबिवी नं. १
सुष्मिता सेननेहासिर्फ तुम
महिमा चौधरीकविता किशोरदिल क्या करे
रीमा लागूशांता शिवलखरवास्तव
सुहासिनी मुळेमालती बर्वेहु तू तू
२००१जया बच्चननिशातबी इकरामुल्लाफिझा
ऐश्वर्या रायमेघा शंकरमोहब्बतें
महिमा चौधरीशीतल वर्माधडकन
राणी मुखर्जीपूजा ओबेरॉयहर दिल जो प्यार करेगा
सोनाली कुलकर्णीनीलिमा खानमिशन कश्मीर
२००२ जया बच्चननंदिनी रायचंदकभी खुशी कभी गम
करीना कपूरपूजा 'पू' शर्माकभी खुशी कभी गम
माधुरी दीक्षितजानकीलज्जा
प्रीती झिंटामधुबालाचोरी चोरी चुपके चुपके
रेखारामदुलारीलज्जा
२००३माधुरी दीक्षितचंद्रमुखीदेवदास
अंतरा माळीकन्नूकंपनी
किरण खेरसुमित्रा चक्रवर्तीदेवदास
शिल्पा शेट्टीवैजंतीरिश्ते
सुष्मिता सेनसिया शेठफिलहाल...
२००४जया बच्चनजेनीफर कपूरकल होना हो
प्रियांका चोप्राजिया सिंघानियाअंदाज
रेखासोनिया मेहराकोई... मिल गया
शबाना आझमीरुखसाना जमालतहजीब
शेनाझ ट्रेझरीवालाअलीशा सहायइश्क विश्क
२००५राणी मुखर्जीशशी सिंहयुवा
अमृता रावसंजना बक्षीमैं हूँ ना
दिव्या दत्ताशबाना 'शब्बो' इब्राहिमवीर-झारा
राणी मुखर्जीसामिया सिद्दीकी
प्रियांका चोप्रासोनिया रॉयऐतराज
२००६आयेशा कपूरमिशेल मॅकनॅलीब्लॅक
बिपाशा बासूबॉबीनो एन्ट्री
संध्या मृदुलपर्ल सिक्वेरापेज ३
शेफाली शाहसुमित्रा ठाकूरवक्त: द रेस अगेन्स्ट टाइम
श्वेता प्रसादखदिजाइक्बाल
२००७कोंकणा सेन शर्माइंदू त्यागीओंकारा
किरण खेरमित्रोरंग दे बसंती
कमलजीत "कमल" सरनकभी अलविदा ना कहना
प्रिती झिंटारिया सरन
रेखासोनिया मेहराक्रिश
सोहा अली खानसोनिया/दुर्गावती देवी वोहरारंग दे बसंती
२००८ कोंकणा सेन शर्माश्रुती घोषलाइफ इन अ... मेट्रो
कोंकणा सेन शर्माशुभवरी 'चुटकी' सहायलागा चुनरी में दाग
राणी मुखर्जीगुलाबजीसावरिया
शिल्पा शुक्लाबिंद्या नाईकचक दे! इंडिया
टिस्का चोप्रामाया अवस्थीतारे जमीन पर
२००९कंगना राणावतशोनाली गुजरालफॅशन
बिपाशा बसूराधिका/श्रेया राठोडबचना ए हसीनो
जिया खानसुनीता कलंत्रीगजनी
किरण खेरसौ. आचार्यदोस्ताना
रत्ना पाठक शाहसावित्री राठौरजाने तू... या जाने ना
शहाना गोस्वामीडेबी मस्करेन्हासरॉक ऑन!!
२०१०कल्की केकलाचंदादेव.डी
अरुंधती नागभूमी भारद्वाजपा
डिंपल कपाडियानीना वालियालक बाय चान्स
दिव्या दत्ताजलेबीदिल्ली-६
शहाना गोस्वामीमुनीराफिराक
सुप्रिया पाठकसरिता मेहरावेक अप सिड
२०११करीना कपूरश्रेया अरोरावी आर फॅमिली
अमृता पुरीशेफाली ठाकूरऐशा
प्राची देसाईमुमताजवन्स अपॉन अ टाइम इन मुंबई
रत्ना पाठक शाहगीता 'गुड्डी' पटनायकगोलमाल ३
सुप्रिया पाठकहंसा प्रफुल पारेखखिचडी: चित्रपट
२०१२राणी मुखर्जीमीरा गायटीनो वन किल्ड जेसिका
जुही चावलामेघाआय ॲम
कल्की केकलानताशा अरोराजिंदगी ना मिलेगी दोबारा
परिणीती चोप्राडिंपल चड्ढालेडीज व्हर्सेस रिकी बहल
स्वरा भास्करपायलतनु वेड्स मनु
२०१३अनुष्का शर्माअकीरा रायजब तक है जान
हुमा कुरेशीमोहसिना हमीदगँग्स ऑफ वासेपूर
इलिआना डिक्रुझश्रुती घोष सेनगुप्ताबर्फी!
राणी मुखर्जीरोशनी शेखावततलाश
रिचा चड्ढानगमा खातूनगँग्स ऑफ वासेपूर
२०१४सुप्रिया पाठकधनकोर 'बा' सनेरागोलियों की रासलीला राम-लीला
दिव्या दत्ताइश्री कौरभाग मिल्खा भाग
कल्की केकलाआदिती मेहराये जवानी है दिवानी
कंगना राणावतकायाक्रिश ३
कोंकणा सेन शर्माडायनाएक थी डायन
स्वरा भास्करबिंदिया त्रिपाठीरांजणा
२०१५तबूगझला मीरहैदर
अमृता सिंगकविता मल्होत्रा२ स्टेट्स
डिंपल कपाडियारोझालिना 'रोझी' युकेरिस्टिकफाइंडिंग फॅनी
जुही चावलासुमित्रा देवीगुलाब गँग
लिसा हेडनविजयालक्ष्मीक्वीन
२०१६प्रियांका चोप्राकाशीबाईबाजीराव मस्तानी
अनुष्का शर्माफराह अलीदिल धडकने दो
शेफाली शाहनीलम मेहरा
हुमा कुरेशीजानकी 'झिमली' डगावकरबदलापूर
तब्बूमहानिरीक्षक मीरा देशमुखदृश्यम
तन्वी आझमीराधाबाईबाजीराव मस्तानी
२०१७शबाना आझमीरमा भानोतनीरजा
करीना कपूरडॉ. प्रीत साहनीउडता पंजाब
कीर्ती कुल्हारीफलक अलीपिंक
रत्ना पाठक शाहसुनीता कपूरकपूर अँड सन्स
रिचा चड्ढासुखप्रीत कौरसरबजीत
२०१८मेहेर विजनज्मा मलीकसिक्रेट सुपरस्टार
रत्ना पाठक शाहउषा 'रोजी' बुवाजीलिपस्टिक अंडर माय बुरखा
सीमा पहवासुशीला मिश्राबरेली की बर्फी
सौ.जोशीशुभ मंगल सावधान
तिलोतमा शोमबोनी बक्षीअ डेथ इन द गुंज
२०१९सुरेखा सिक्रीदुर्गा कौशीकबधाई हो
गीतांजली रावप्रा.विद्या अय्यरऑक्टोबर
कतरिना कैफबबिता कुमारीझीरो
शिखा तलसानियामीरा कौर स्टिन्सनवीरे दी वेडिंग
स्वरा भास्करसाक्षी सोनी
यामिनी दासनिम्मो शर्मासुई धागा
२०२०अमृता सुभाषरझिया अहमदगल्ली बॉय
अमृता सिंगराणी कौरबदला
कामिनी कौशलसाधना कौर (दादी)कबीर सिंग
माधुरी दीक्षितबहार बेगमकलंक
सीमा पहवाआनरा (मौसी)बाला
झायरा वसीमआयशा चौधरीद स्काय इज पिंक
२०२१फारुख जाफरफातिमा बेगमगुलाबो सीताबो
मानवी गाग्रूरजनी "गोगल" त्रिपाठीशुभ मंगल ज्यादा सावधान
नीना गुप्तासुनैना त्रिपाठी
रिचा चड्ढामीनल "मीनू" सिंगपंगा
तन्वी आझमीसुलक्षणा सभरवालथप्पड
२०२२सई ताम्हणकरशमामिमी
कीर्ती कुल्हारीइन्स्पेक्टर दलबीर कौर बग्गाद गर्ल ऑन द ट्रेन
कोंकणा सेन शर्मासीमारामप्रसाद की तेहरवी
मेघना मलिकउषा राणी नेहवालसायना
नीना गुप्ताआंटी "मीनू" सिंगसंदीप और पिंकी फरार
२०२३शीबा चड्ढासौ. ठाकूरबधाई दो
मौनी रॉयजुनूनब्रह्मास्त्र: भाग एक – शिवा
नीतू कपूरगीता सैनीजुगजुग जीयो
शीबा चड्ढाशोभा गुप्ताडॉक्टर जी
शेफाली शहाडॉ.नंदिनी श्रीवास्तव
सिमरनमीना नारायणनरॉकेट्री: द नंबी इफेक्ट
२०२४शबाना आझमीजैमिनी चॅटर्जीरॉकी और रानी की प्रेम कहानी
जया बच्चनधनलक्ष्मी रंधावारॉकी और रानी की प्रेम कहानी
रत्ना पाठक शाहमनप्रीत कौर सेठी "माही"धक धक
शबाना आझमीअनिनाची आजीघूमर
तृप्ती डिमरीझोयाॲनिमल
यामी गौतमकामिनी माहेश्वरीओएमजी २

अनेक पुरस्कार आणि नामांकन

पाच अभिनेत्रींना हा पुरस्कार तीन वेळा मिळाला आहे: निरूपा रॉय (१९५६, १९६२, १९६५), फरीदा जलाल (१९७२, १९९२, १९९६), जया बच्चन (२००१, २००२, २००४), सुप्रिया पाठक (१९८२, १९८३, २०१४) व राणी मुखर्जी (१९९९, २००५, २०१२). तसेच नऊ अभिनेत्रींनी दोन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे: शशिकला (१९६३, १९६४), सिमी गरेवाल (१९६७, १९६९), राखी गुलजार (१९७४, १९९०), रोहिणी हट्टंगडी (१९८४, १९९१), अरुणा इराणी (१९८५, १९९३), कोंकणा सेन शर्मा (२००७, २००८) आणि शबाना आझमी (२०१७, २०२४).

अरुणा इराणीला सर्वात जास्त वेळा (१०) नामांकन मिळाले आहे पण फक्त दोन वेळा (१९८५, १९९३) पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या खालोखाल शशिकला आणि राखी गुलजार यांना ८ नामांकन आहे; बिंदू, फरीदा जलाल व राणी मुखर्जी यांना ७ नामांकन आहेत. १९७० च्या दशकात बिंदू यांना ७ वेळा नामांकन मिळाले असले तरी एकही वेळा हा पुरस्कार प्रदान केला गेला नाही.

शशिकला यांच्या नावावर १९६३ ते १९६७ दरम्यान सर्वाधिक लागोपाठ असे ६ नामांकनांचा विक्रम आहे; ज्यात १९६७ मध्ये त्या दोनदा नामांकित झाल्या होत्या. एकाच वर्षात सर्वाधिक नामांकन मिळवण्याचा विक्रम अकरा अभिनेत्रींच्या नावावर आहे. कालक्रमानुसार, शुभा खोटे (१९६२), शशिकला (१९६७), नूतन (१९७४), बिंदू (१९७५), स्मिता पाटील (१९८४), सुश्मिता सेन (२०००), राणी मुखर्जी (२००५), कोंकणा सेन शर्मा (२००८), सीमा भार्गव पाहवा (२०१८), शिबा चड्ढा (२०२३) आणि शबाना आझमी (२०२४).

एकाच चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी दोन वेगवेगळ्या अभिनेत्रींना नामांकन मिळाल्याचे अनेकदा घडले आहे. १९६१ मध्ये नंदा आणि ललिता पवार या दोघींना आंचल मधील आपल्या भूमिकांसाठी नामांकन मिळाले होते. १९६४ मध्ये अमीता आणि निम्मी यांच्या मेरे मेहबूब साठी; तसेच १९७९ मध्ये आशा पारेख आणि नूतन यांना मैं तुलसी तेरे आंगन की साठी नामांकन मिळाले. नंतर १९८३ मध्ये किरण वैराळे आणि वहिदा रेहमान यांना नमकीन साठी नामांकन मिळाले. त्याचप्रमाणे १९९५ मध्ये हम आपके हैं कौन..! साठी रीमा लागू आणि रेणुका शहाणे यांना नामांकन देण्यात आली. १९९७ मध्ये हेलन आणि सीमा बिस्वास यांच्या खामोशी: द म्युझिकल साठी; २००२ मध्ये करीना कपूर आणि जया बच्चन यांच्या कभी खुशी कभी गम साठी; २००५ मध्ये राणी मुखर्जी आणि दिव्या दत्ता यांच्या वीर-झारा साठी; २००७ मध्ये किरण खेर आणि प्रीती झिंटा यांच्या कभी अलविदा ना कहना साठी; २०१६ मध्ये अनुष्का शर्माशेफाली शाह यांच्या दिल धडकने दो साठी आणि सोबत प्रियांका चोप्रा व तन्वी आझमी यांच्या बाजीराव मस्तानी साठी पण; २०१९ मध्ये शिखा तलसानिया आणि स्वरा भास्कर यांच्या वीरे दी वेडिंग साठी; २०२१ मध्ये मानवी गाग्रू आणि नीना गुप्ता यांच्या शुभ मंगल ज्यादा सावधान साठी; २०२३ मध्ये शीबा चड्ढा आणि शेफाली शाह यांना डॉक्टर जी साठी; आणि २०२४ मध्ये शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्यासाठी रॉकी और रानी की प्रेम कहानी साठी नामांकन देण्यात आली.

इतर माहिती

या श्रेणीसाठी विविध नातेवाईकांना विजय आणि नामांकन प्राप्त झाले आहे. करिश्मा आणि करीना कपूर या दोन बहिणी आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. रत्‍ना पाठक आणि सुप्रिया पाठक या आणखी बहिणी आहेत ज्यांना पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे; पण रत्ना पाठक यांनी कधी हा पुरस्कार जिंकला नाही. या प्रकारात उषाकिरण यांनी पहिला पुरस्कार पटकावला; पण त्यांची मुलगी तन्वी आझमी ५ वेळा नामांकित झाली आहे कधीही पुरस्कार न मिळवता. शर्मिला टागोर आणि सोहा अली खान हे आणखी एक आई-मुलगी जोडी आहे ज्यांना या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

वैजयंतीमाला अश्या पहिल्या अभिनेत्री होती ज्यांना सर्वोत्तम अभिनेत्री आणि सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री हे दोन्ही पुरस्कार मिळाले. १९५७ मध्ये देवदास मधील चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार नाकारणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती होत्या. त्यांच्या नंतर १९७९ मध्ये रीना रॉय यांनी देखील त्यांच्या अपनापन चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार नाकारला. दोघांनीही त्यांच्या भूमिका प्रमुख होत्या व सहाय्यक नसल्याचा कारण देत पुरस्कार नाकारले.[]

संदर्भ

  1. ^ Encyclopedia of Bollywood–Film Actresses. Diamond Pocket Books Pvt Ltd. 2014. ISBN 9789350836910.
  2. ^ "Winners of the 69th Filmfare Awards 2024". Filmfare. 28 January 2024. 29 January 2024 रोजी पाहिले.
  3. ^ Miglani, Surendra (2005-02-13). "Hits and misses". The Tribune. 2011-08-08 रोजी पाहिले.