Jump to content

फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार

শ্রেষ্ঠ নারী নেপথ্য কণ্ঠশিল্পী বিভাগে ফিল্মফেয়ার পুরস্কার (bn); Filmfare Award de la meilleure chanteuse de play-back (fr); Filmfare Award за лучший женский закадровый вокал (ru); फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार (mr); Filmfare Award/Beste Playbacksängerin (de); 印度電影觀眾最佳女代唱歌手獎 (zh); فلمفیئر سبھ توں ودھیا پلےبیک گلوکارہ (pnb); フィルムフェア賞 女性歌手賞 (ja); Penghargaan Filmfare untuk Penyanyi Playback Perempuan Terbaik (id); फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका पुरस्कार (mai); Anugerah Filmfare untuk Penyanyi Latar Wanita Terbaik (ms); फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका पुरस्कार (hi); ఫిల్మ్‌ఫేర్ ఉత్తమ నేపథ్య గాయని (te); ਫਿਲਮਫੇਅਰ ਸਭ ਤੋਂ ਵਧੀਆ ਪਿੱਠਵਰਤੀ ਗਾਇਕਾ (pa); Filmfare Award for Best Female Playback Singer (en); جائزة فيلم فير لأفضل مغنية أفلام (ar); Premi Filmfare a la millor cantant en playback (ca); فلم فئیر اعزاز برائے بہترین پس پردہ گلوکارہ (ur) award category (en); award category (en) فلم فئیر اعزاز برائے پس پردہ گلوکارہ (ur); フィルムフェア賞 最優秀女性プレイバックシンガー賞, フィルムフェア賞 女性プレイバックシンガー賞 (ja)
फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार 
award category
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचित्रपट पुरस्कार श्रेणी,
फिल्मफेर पुरस्कार
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. १९५९
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार हा दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायिकेला दिला जाणारा पुरस्कार आहे. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. जरी पुरस्कार सोहळ्याची स्थापना १९५४ मध्ये झाली असली तरी, सर्वोत्तम पार्श्वगायकाची श्रेणी १९५९ मध्ये सुरू करण्यात आली होती. हा पुरस्कार सुरुवातीला १९६७ पर्यंत पुरुष आणि महिला गायकांसाठी समान दिला जात असे. पुढील वर्षी (१९६८ पासून) ही श्रेणी विभागली गेली आणि तेव्हापासून दोन पुरस्कार देणे सुरू झाले व पुरुष गायकांसाठी आणि महिला गायकांसाठी स्वतंत्रपणे दिले गेले.

१९५९ मध्ये लता मंगेशकरांना पहिला पुरस्कार मिळाला होता मधुमती चित्रपटातील "आजा रे परदेसी" या गाण्यासाठी. पुढे मंगेशकरांना अजून तीन वेळा पुरस्कार मिळाला. १९६७ पर्यंत वेगळ्या श्रेण्या होण्याआधी फक्त मंगेशकरांना पुरस्कार आणि नामांकन मिळाले आहे. पठाण या चित्रपटातील "बेशरम रंग" या गाण्यासाठी २०२४ मध्ये शिल्पा राव यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजवर आशा भोसलेअलका याज्ञिक ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ७ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे. याज्ञिक यांना सर्वाधिक वेळा (३७ वेळा) नामांकन मिळाले आहे.

१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. हा पुरस्कार अनेक वेळा एकाच गाण्यातील दोन गायिकेंना दिला गेला आहे तसाच अनेक वेळा भिन्न गाण्यांसाठी विभागून देखील दिला गेला आहे.

इतिहास

फिल्मफेअर पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये झाली. १९५६ मध्ये चोरी चोरी चित्रपटासाठी शंकर जयकिशन या जोडीला सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळणार होता. कार्यक्रमात जयकिशन यांनी लता मंगेशकरांना ह्या चित्रपटातील प्रसिद्ध गीत "रसीक बलमा" गाण्याची विनंती केली. पण मंगेशकरांना ते गाण्यास नकार दिला व सांगितले की हे गाणे गाण्यासाठी त्यांना कोणताही पुरस्कार मिळाला नाही आहे व त्यामुळे त्या गाणार नाही. द टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक जे.सी. जैन यांनीही मंगेशकरांना गाण्यासाठी पटवण्याचा प्रयत्न केला आणि उदाहरण दिले की ऑस्कर पुरस्कारांमध्येही गायकांसाठी अशी श्रेणी नसते. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये क्वचितच गाणी असतात, असे मत मंगेशकर यांनी मांडले; आणि समारंभात गाण्यास नकार दिला.[] सर्वोत्तम पार्श्वगायकाची श्रेणी १९५९ मध्ये सुरू करण्यात आली व मंगेशकरांना पहिला पुरस्कार मिळाला. १९६७ पर्यंत, वेगळ्या श्रेण्या होण्याआधी, फक्त मंगेशकरांना पुरस्कार आणि नामांकन मिळाले आहे ज्यात त्यांनी १९५९, १९६३ आणी १९६६ मध्ये पुरस्कार जिंकले. १९६८ पासून वेगवेगळ्या श्रेण्या झाल्यावर पहिला पुरस्कार आशा भोसलेयांनी पटकावला तो दस लाख चित्रपटातील "गरीबों की सुनो" या गाण्यासाठी.

१८ एप्रिल १९७१ रोजी, मंगेशकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला पत्र लिहून त्यांना सर्वोत्तम महिला गायक श्रेणीसाठी कोणतेही पुरस्कार न देण्याची विनंती केली. तिने नमूद केले की "हा पुरस्कार अश्या काही महिला गायकांना देण्यात यावा ज्यांना माझ्या पेक्षा जास्त प्रोत्साहनाची गरज आहे." त्या वर्षी (१९७१ मध्ये) जरी त्यांना नामांकन मिळाले असले तरी पुरस्कार शारदा अय्यंगार यांना मिळाला.[]

विजेते आणि नामांकन

१९५९ ते १९६७ पर्यंत

वर्षविजेत्यांचे चित्रविजेतागाणेचित्रपट
१९५९लता मंगेशकर"आजा रे परदेसी"मधुमती
अन्य नामांकन नाही
१९६०- पुरुष विजेता
लता मंगेशकर"भैया मेरे राखी के बंधन"छोटी बहन
१९६१- पुरुष विजेता
लता मंगेशकर"दिल अपना और प्रीत पराई"दिल अपना और प्रीत पराई
लता मंगेशकर"प्यार किया तो डरना क्या"मुघल-ए-आझम
१९६२- पुरुष विजेता
महिला नामांकन नाही
१९६३लता मंगेशकर"कहीं दीप जले कहीं दिल"बीस साल बाद
लता मंगेशकर"आप की नजरों ने समझा"अनपढ
१९६४- पुरुष विजेता
लता मंगेशकर"जो वदा किया"ताजमहाल
१९६५- पुरुष विजेता
लता मंगेशकर"ज्योत से ज्योत"संत ज्ञानेश्वर
१९६६लता मंगेशकर"तुम्ही मेरे मंदिर"खानदान
लता मंगेशकर"एक तू ना मिला"हिमालय की गोद में
१९६७- पुरुष विजेता
लता मंगेशकर"लो आगई उनकी याद"दो बदन
लता मंगेशकर"आज फिर जीने की तमन्ना है"गाइड

१९६८ पासून

वर्षविजेत्यांचे चित्रविजेतागाणेचित्रपट
१९६८आशा भोसले"गरीबों की सुनो"दस लाख
लता मंगेशकर"बहारो मेरा जीवन भी सावरो"आखरी खत
लता मंगेशकर"सावन का महीना"मिलन
१९६९आशा भोसले"परदे में रहने दो"शिकार
लता मंगेशकर"मिलती है जिंदगी में"आँखें
शारदा अय्यंगार"तुम्हारी भी जय जय"दिवाना
१९७०लता मंगेशकर"आप मुझे अच्छे लगने लगे"जीने की राह
लता मंगेशकर"कैसे राहूं चूप"इंतकाम
शारदा अय्यंगार"तेरे अंग का रंग है अंगूरी"चंदा और बिजली
१९७१शारदा अय्यंगार"बात जरा है अपस की"जहाँ प्यार मिले
लता मंगेशकर"बिंदिया चमकेगी"दो रास्ते
लता मंगेशकर"बाबुल प्यारे"जॉनी मेरा नाम
१९७२आशा भोसले"पिया तू अब तो आजा"कारवा
आशा भोसले"जिंदगी एक सफर है"अंदाज
शारदा अय्यंगार"आपले पिछे"एक नारी एक ब्रह्मचारी
१९७३आशा भोसले"दम मारो दम"हरे रामा हरे कृष्ण
आशा भोसले"सूनी सूनी सांस के सितार पर"लाल पत्थर
आशा भोसले"मैने कहा ना ना"ललकार
१९७४आशा भोसले"होने लगी है रात"नैना
आशा भोसले"हंगामा हो गया"अनहोनी
आशा भोसले"जब अंधेरा होता है"राजा राणी
सुषमा श्रेष्ठ"तेरा मुझे से"आ गले लग जा
मिनु पुरुषोत्तम"रात पिया के संग जगी रे सखी"प्रेम परबत
१९७५आशा भोसले"चैन से हम को कभी"प्राण जाये पर वचन ना जाये
आशा भोसले"मैं जा रही थी"बिदाई
आशा भोसले"ये हवास क्या है"हवस
आशा भोसले"चोरी चोरी सोलाह शृंगार करूंगी"मनोरंजन
सुमन कल्याणपूर"बेहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है"रेशम की डोरी
१९७६सुलक्षणा पंडित"तू ही सागर तू ही किनारा"संकल्प
आशा भोसले"कल के अपने"अमानुष
आशा भोसले"सपना मेरा टूट गया"खेल खेल में
प्रीति सागर"माय हार्ट इज बीटिंग"ज्युली
उषा मंगेशकर"मैं तो आरती उतरून"जय संतोषी माँ
१९७७हेमलता"तू जो मेरे सूर में"चितचोर
आशा भोसले"आय लव्ह यू, यू लव्ह मी"बारूद
हेमलता"सुन के तेरी पुकार"फकिरा
सुलक्षणा पंडित"बंधी रे काहे प्रीत"संकोच
१९७८प्रीति सागर"मेरो गाम काठा पारे"मंथन
आशा भोसले"लय कहाँ है जिंदगी"टॅक्सी-टॅक्सी
उषा मंगेशकर"ओ मुंगडा, मुंगडा मैं गुड की डाली"इंकार
सुषमा श्रेष्ठ"क्या हुआ तेरा वादा"हम किसीसे कम नहीं
१९७९आशा भोसले"ये मेरा दिल यार का दिवाना"डॉन
आशा भोसले"ओ साथी रे"मुकद्दर का सिकंदर
हेमलता"अखियों के झरोखों से"अखियों के झरोखों से
शोभा गुर्टू"सैयां रुठ गये"मैं तुलसी तेरे आंगन की
उषा उथुप"वन टू चा चा चा"शालिमार
१९८०वाणी जयराम"मेरे तो गिरीधर गोपाल"मीरा
छाया गांगुली"आप की याद आती रही रात भर"गमन
हेमलता"मेघा, ओ रे मेघा"सुनयना
उषा मंगेशकर"हम से नजर तो मिलाओ"इकरार
वाणी जयराम"एरी में तो प्रेम दिवानी"मीरा
१९८१नाझिया हसन"आप जैसा कोई"कुर्बानी
चंद्राणी मुखर्जी"पहचान तो थी"गृह प्रवेश
हेमलता"तू इस तरह से"आप तो ऐसे ना थे
कांचन"लैला ओ लैला"कुर्बानी
उषा उथुप"हरी ओम हरी"प्यारा दुश्मन
१९८२परवीन सुलताना"हम तुमसे प्यार कितना"कुदरत
अलका याज्ञिक"मेरे अंगने में"लावारिस
चंद्राणी मुखर्जी"मोहब्बत रंग लायेगी"पूनम
शेरॉन प्रभाकर"मेरे जैसी हसीना"अरमान
उषा उथुप"रांबा हो-हो-हो"अरमान
१९८३सलमा आगा"दिल के अरमान अनसुओं में बह गये"निकाह
अनुराधा पौडवाल"मैंने एक गीत लिखा है"ये नाजदीकियां
नाझिया हसन"बूम बूम"स्टार
सलमा आगा"दिल की ये आरजू थी"निकाह
सलमा आगा"फजा भी है जवान"निकाह
१९८४आरती मुखर्जी"दो नैना और एक कहानी"मासूम
अनुराधा पौडवाल"तू मेरा हीरो है"हिरो
चंद्राणी मुखर्जी"आ जा के तेरी राह में पलके बिछा"लाल चुनरिया
१९८५अनुपमा देशपांडे"सोहनी चिनाब दे किनारे"सोहनी महिवाल
सलमा आगा"डान्स डान्स"कसम पैडा करने वाले की
१९८६अनुराधा पौडवाल"मेरे मन बाजा मृदंग"उत्सव
कविता कृष्णमूर्ती"तुमसे मिलकर ना जाने"प्यार झुकता नहीं
एस. जानकी"यार बिना चेन कहाँ रे"साहेब
१९८७ पुरस्कार नाही
१९८८ पुरस्कार नाही
१९८९अलका याज्ञिक"एक दो तीन चार"तेजाब
अनुराधा पौडवाल"जीना नहीं"तेजाब
साधना सरगम"मैं तेरी हूँ जनम"खून भारी मांग
१९९०सपना मुखर्जी"तिरछी टोपीवाले"त्रिदेव
आलिशा चिनाई"रात भर"त्रिदेव
अनुराधा पौडवाल"बेखबर बेवफा"राम लखन
अनुराधा पौडवाल"तेरा नाम लिया"राम लखन
कविता कृष्णमूर्ती"ना जाने कहां से आयी हैं"चालबाज
१९९१अनुराधा पौडवाल"नजर के सामने"आशिकी
अनुराधा पौडवाल"मुझे नींद ना आये"दिल
कविता कृष्णमूर्ती"चांदनी रात हैं"बागी
१९९२अनुराधा पौडवाल"दिल है के मानता नहीं"दिल है के मानता नहीं
अलका याज्ञिक"देखा है पहली बार"साजन
अनुराधा पौडवाल"बहुत प्यार करते हैं"साजन
कविता कृष्णमूर्ती"सौदागर सौदा कर"सौदागर
१९९३अनुराधा पौडवाल"धक धक करना लगा"बेटा
अलका याज्ञिक"ऐसी दिवांगी"दिवाना
कविता कृष्णमूर्ती"मैं तुझे कबूल"खुदा गवाह
१९९४
अलका याज्ञिक आणि इला अरुण"चोली के पीछे"खलनायक
अलका याज्ञिक"बाजीगर ओ बाजीगर"बाजीगर
अलका याज्ञिक"हम हैं राही प्यार के"हम हैं राही प्यार के
अलका याज्ञिक"पालकी पे होके सवार"खलनायक
१९९५कविता कृष्णमूर्ती"प्यार हुआ चुपके से"१९४२: अ लव्ह स्टोरी
अलिशा चिनॉय"रुक रुक रुक"विजयपथ
अलका याज्ञिक"चुरा के दिल मेरा"मैं खिलाडी तू अनारी
अलका याज्ञिक"राह में उनसे मुलकत होगी"विजयपथ
कविता कृष्णमूर्ती"तू चीज बडी मस्त मस्त"मोहरा
१९९६कविता कृष्णमूर्ती"मेरा पिया घर आया"याराना
अलका याज्ञिक"राजा को रानी से प्यार"अकेले हम अकेले तुम
अलका याज्ञिक"आंखियां मिलाओ"राजा
कविता कृष्णमूर्ती"प्यार ये जाने"रंगीला
श्वेता शेट्टी"मंगता है क्या"रंगीला
१९९७कविता कृष्णमूर्ती"आज मैं उपर"खामोशी: द म्युझिकल
अलका याज्ञिक"बाहों के दरमियाँ"खामोशी: द म्युझिकल
अलका याज्ञिक"परदेसी परदेसी"राजा हिंदुस्थानी
कविता कृष्णमूर्ती"ओ यारा दिल लगाना"अग्नि साक्षी
१९९८अलका याज्ञिक"मेरी मेहबूबा"परदेस
अलका याज्ञिक"मेरे ख्वाबों में तू"गुप्त
के.एस. चित्रा"पायले छु मुन"विरासत
कविता कृष्णमूर्ती"ढोल बजने लगा"विरासत
कविता कृष्णमूर्ती"आय लव्ह माय इंडिया"परदेस
१९९९जसपिंदर नरुला"प्यार तो होना ही था"प्यार तो होना ही था
अलका याज्ञिक"छम्मा छम्मा"चायना गेट
अलका याज्ञिक"कुछ कुछ होता है"कुछ कुछ होता है
अलका याज्ञिक"लडकी बडी अंजनी है"कुछ कुछ होता है
संजीवनी"चोरी चोरी जब नजरें मिली"करिब
सपना अवस्थी"छैय्या छैय्या"दिल से..
२०००अलका याज्ञिक"ताल से ताल मिला"ताल
अलका याज्ञिक"चांद छुपा बदल में"हम दिल दे चुके सनम
कविता कृष्णमूर्ती"हम दिल दे चुके सनम"हम दिल दे चुके सनम
कविता कृष्णमूर्ती"निंबूडा"हम दिल दे चुके सनम
सुनिधी चौहान"रुकी रुकी"मस्त
२००१अलका याग्निक"दिल ने ये कहा है दिल से"धडकन
अलका याज्ञिक"हाये मेरा दिल"जोश
अलका याज्ञिक"पंछी नदीयां"रेफ्युजी
प्रीती आणि पिंकी"पिया पिया"हर दिल जो प्यार करेगा
सुनिधी चौहान"मेहबूब मेरे"फिजा
२००२अलका याज्ञिक"ओ रे छोरी"लगान
अलका याज्ञिक"सान सनाना"अशोका
अलका याज्ञिक"जाने क्यों"दिल चाहता है
कविता कृष्णमूर्ती"धीमे धीमे गाव"झुबेदा
वसुंधरा दास"रब्बा मेरे रब्बा"अक्स
२००३
श्रेया घोषाल आणि कविता कृष्णमूर्ती"डोला रे डोला"देवदास
अलका याज्ञिक"सनम मेरे हमराज"हमराज
अलका याज्ञिक"आपके प्यार में"राझ
कविता कृष्णमूर्ती"मार डाला"देवदास
श्रेया घोषाल"बैरी पिया"देवदास
२००४श्रेया घोषाल"जादू है नशा है"जिस्म
अलीशा चिनाई"छोटे दिल पे लगी"इश्क विश्क
अलका याज्ञिक"तौबा तुम्हारे"चलते चलते
अलका याज्ञिक"ओढनी ओढ के"तेरे नाम
के.एस. चित्रा"कोई मिल गया"कोई... मिल गया
२००५अलका याज्ञिक"हम तुम"हम तुम
अलका याज्ञिक"लाल दुपट्टा"मुझे शादी करोगी
अलका याज्ञिक"संवरिया"स्वदेस
साधना सरगम"आओ ना"क्यूं! हो गया ना...
सुनिधी चौहान"धूम मचा ले"धूम
२००६अलिशा चिनॉय"कजरा रे"बंटी और बबली
श्रेया घोषाल"पियू बोले"परिणीता
श्रेया घोषाल"अगर तुम मिल जाओ"झेहर
सुनिधी चौहान"दीदार दे"दस
सुनिधी चौहान"कैसी पहली जिंदगानी"परिणीता
२००७सुनिधी चौहान"बीडी जलईले"ओंकारा
अलका याज्ञिक"कभी अलविदा ना कहना"कभी अलविदा ना कहना
श्रेया घोषाल"पल पल हर पल"लगे रहो मुन्ना भाई
सुनिधी चौहान"आशिकी में"३६ चायना टाउन
सुनिधी चौहान"सोनिये"अक्सर
२००८श्रेया घोषाल"बरसो रे मेघा"गुरु
अलिशा चिनॉय"इट्स रॉकिंग"क्या लव्ह स्टोरी है
श्रेया घोषाल"ये इश्क हाए"जब वी मेट
सुनिधी चौहान"आजा नचले"आजा नचले
सुनिधी चौहान"साजनाजी वारी वारी"हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.
२००९श्रेया घोषाल"तेरी ओरे"सिंग इज किंग
अलका याज्ञिक"तू मुस्कुरा जहां भी है"युवराज
नेहा भसीन"कुछ खास है"फॅशन
शिल्पा राव"खुदा जाने"बचना ए हसीनो
श्रुती पाठक"मर जावा"फॅशन
सुनिधी चौहान"डान्स पे चान्स"रब ने बना दी जोडी
२०१०
कविता सेठ आणि रेखा भारद्वाज"इकतारा" आणि "गेंडा फूल"वेक अप सिड आणि दिल्ली ६
अलिशा चिनॉय"तेरा होने लगा हूँ"अजब प्रेम की गजब कहानी
शिल्पा राव"मुडी मुडी"पा
श्रेया घोषाल"झुबी डूबी"३ इडियट्स
सुनिधी चौहान"चोर बाजारी"लव्ह आज कल
२०११
ममता शर्मा आणि सुनिधी चौहान"मुन्नी बदनाम हुई" आणि "शीला की जवानी"दबंग आणि तीस मार खान
श्रेया घोषाल"बहारा"आय हेट लव स्टोरीज
श्रेया घोषाल"नूर-ए-खुदा"माय नेम इज खान
सुनिधी चौहान"उडी"गुजारिश
२०१२
उषा उथुप आणि रेखा भारद्वाज"डार्लिंग"७ खून माफ
एलिसा मेंडोन्सा"ख्वाबों के परिंडे"जिंदगी ना मिलेगी दोबारा
हर्षदीप कौर"कटिया करुण"रॉकस्टार
श्रेया घोषाल"तेरी मेरी"बॉडीगार्ड
श्रेया घोषाल"सायबो"शोर इन द सिटी
२०१३शाल्मली खोलगडे"परेशान"इशाकजादे
कविता सेठ"तुम्ही हो बंधू"कॉकटेल
नीती मोहन"जिया रे"जब तक है जान
श्रेया घोषाल"सांस"जब तक है जान
श्रेया घोषाल"चिकनी चमेली"अग्निपथ
२०१४मोनाली ठाकूर"सवार लून"लुटेरा
चिन्मयी श्रीपाद"तितली"चेन्नई एक्सप्रेस
शाल्मली खोलगडे"बलम पिचकारी"ये जवानी है दिवानी
श्रेया घोषाल"सुन रहा है"आशिकी २
श्रेया घोषाल"नागडा संग ढोल"गोलियों की रासलीला राम-लीला
२०१५कनिका कपूर"बेबी डॉल"रागिनी एमएमएस २
ज्योती नूरन आणि सुलताना नूरन"पथका गुड्डी"हायवे
रेखा भारद्वाज"हमरी अटारिया पे"देढ इश्किया
श्रेया घोषाल"मनवा लागे"हॅपी न्यू यीअर
सोना मोहपात्रा"नैना"खूबसुरत
२०१६श्रेया घोषाल"दिवानी मस्तानी"बाजीराव मस्तानी
अलका याज्ञिक"अगर तुम साथ हो"तमाशा
अनुषा मणी"गुलाबो"शानदार
मोनाली ठाकूर"मोह मोह के धागे"दम लगा के हैशा
पलक मुच्छाल"प्रेम रतन धन पायो"प्रेम रतन धन पायो
प्रिया सरैया"सन साथिया"एबीसीडी २
२०१७नेहा भसीन"जग घूम्या"सुलतान
जोनिता गांधी"द ब्रेकअप गाणे"ए दिल है मुश्किल
कनिका कपूर"दा दा दससे"उडता पंजाब
नीती मोहन"सौ आसमान"बार बार देखो
पलक मुच्छाल"कौन तुझे"एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी
कुरात-उल-ऐन बलूच"कारी कारी"पिंक
२०१८मेघना मिश्रा"नचदी फिरा"सिक्रेट सुपरस्टार
मोनाली ठाकूर"खोल दे बहें"मेरी प्यारी बिंदू
निखिता गांधी"घर"जब हॅरी मेट सेजल
रॉनकिनी गुप्ता"रफू"तुम्हारी सुलू
शाशा तिरुपती"कान्हा"शुभ मंगल सावधान
श्रेया घोषाल"थोडी डर"हाफ गर्लफ्रेंड
२०१९श्रेया घोषाल"घूमर"पद्मावत
हर्षदीप कौर आणि विभा सराफ"दिलबरो"राझी
जोनिता गांधी"आहिस्ता"लैला मजनू
रॉनकिनी गुप्ता"चाव लगा"सुई धागा
सुनिधी चौहान"ए वतन"राझी
सुनिधी चौहान"मनवा"ऑक्टोबर
२०२०शिल्पा राव"घुंगरू टूटगए"वॉर
नेहा भसीन"चाशनी"भारत
परंपरा ठाकूर"मेरे सोहनेया"कबीर सिंग
श्रेया घोषाल"ये आईना"कबीर सिंग
श्रेया घोषाल आणि वैशाली म्हाडे"घर मोरे परदेसिया"कलंक
सोना मोहपात्रा आणि ज्योतिका टांगरी"बेबी गोल्ड"सांड की आँख
२०२१असीस कौर"हुई मलंग"मलंग
अंतरा मित्रा"मेहराम"लव आज कल
पलक मुच्छाल"मन की डोरी (महिला)"गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल
श्रद्धा मिश्रा"मर जायें हम"शिकारा
सुनिधी चौहान"पास नहीं तो असफल"शकुंतला देवी
२०२२असीस कौर"रातन लांबियां"शेरशाह
असीस कौर"लेकीरन"हसीन दिलरुबा
नेहा कक्कर"मतलबी यारियां"द गर्ल ऑन द ट्रेन
प्रिया सरैया"कले कले"चंदीगड करे आशिकी
श्रेया घोषाल"चका चक"अतरंगी रे
श्रेया घोषल"परम सुंदरी"मिमी
२०२३कविता सेठ"रंगीसारी"जुगजुग जीयो
जान्हवी श्रीमानकर"ढोलिडा"गंगुबाई काठियावाडी
श्रेया घोषाल"जब सैयां"गंगुबाई काठियावाडी
जोनिता गांधी"देवा देवा"ब्रह्मास्त्र: भाग एक – शिवा
शिल्पा राव"तेरे हवाले"लाल सिंग चड्ढा
२०२४शिल्पा राव"बेशरम रंग"पठाण
शिल्पा राव"चल्या"जवान
दीप्ती सुरेश"अरारारी रारो"जवान
जोनिता गांधी"अरे फिकार"८ एम मेट्रो
श्रेया घोषाल"तुम क्या मिले"रॉकी और रानी की प्रेम कहानी
श्रेया घोषाल"वे कमल्या"रॉकी और रानी की प्रेम कहानी

अनेक पुरस्कार आणि नामांकन

दोन गायिकांना आजवर हा पुरस्कार सर्वाधिक असा सात वेळा मिळाला आहे: आशा भोसले (१९६८, १९६९, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७९) व अलका याज्ञिक (१९८९, १९९४, १९९८, २०००, २००१, २००२, २००५) ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ७ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे. त्यांच्या खालोखाल श्रेया घोषालने हा पुरस्कार सहा वेळा जिंकला आहे (२००३, २००४, २००८, २००९, २०१६, २०१९). लागोपाठ असे चार वेळा पुरस्कार मिळवण्यास आशा भोसलेयांना यश मिळाले आहे (१९७२ ते १९७५).

याज्ञिक यांना सर्वाधिक वेळा (३७ वेळा) नामांकन मिळाले आहे पण फक्त सात वेळा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या खालोखाल घोषाल यांना २९ वेळा नामांकन मिळून सहा पुरस्कार मिळाले आहे. भोसले (१९७५) आणि याज्ञिक (१९९४) ह्या दोघींना एकाच वर्षी असे चार नामांकन मिळून विक्रम नोंदवला आहे. भोसलेंना प्राण जाये पर वचन ना जाये चित्रपटातील "चैन से हम को कभी" या गाण्यासाठी[][] तर याज्ञिकांना खलनायक चित्रपटातील "चोली के पीछे" या गाण्यासाठी इला अरुण यांच्यासोबत हा पुरस्कार मिळाला.

इतर माहिती

१९९४ मध्ये अलका याज्ञिकइला अरुण यांनी खलनायक चित्रपटातील "चोली के पीछे" या गाण्यासाठी पुरस्कार सामायिक केला.[][] २००३ मध्ये असेच देवदास चित्रपटातील "डोला रे डोला" या गाण्यासाठी श्रेया घोषाल आणि कविता कृष्णमूर्ती यांनी पुरस्कार सामायिक केला. २०१२ मध्ये देखिल ७ खून माफ चित्रपटातील "डार्लिंग" या गाण्यासाठी उषा उथुप आणि रेखा भारद्वाज यांनी पुरस्कार सामायिक केला.

पुढे २०१० व २०११ मध्ये वेगवेगळ्या गाण्यांसाठी गायिकेंनी पुरस्कार सामायिक केला आहे: २०१० मध्ये कविता सेठ यांनी वेक अप सिड चित्रपटातील "इकतारा" गाण्यासाठी आणि रेखा भारद्वाज यांनी दिल्ली ६ चित्रपटातील "गेंडा फूल" गाण्यासाठी; आणि २०११ मध्ये ममता शर्मा यांनी दबंग चित्रपटातील "मुन्नी बदनाम हुई" गाण्यासाठी आणि सुनिधी चौहान यांनी तीस मार खान चित्रपटातील "शीला की जवानी" गाण्यासाठी.

संदर्भ

  1. ^ Yatindra Mishra, Ira Pande (२०२३). Lata: A Life in Music. Penguin Random House. p. २२७. ISBN 9789354928895.
  2. ^ Raju Bharatan (२०१६). Asha Bhosle: A Musical Biography. Hay House. p. ११७. ISBN 9789385827167.
  3. ^ "The Filmfare Awards Nominations – 1974". The Times Group. 29 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ "The Filmfare Awards Winners – 1974". The Times Group. 28 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  5. ^ "The Filmfare Awards Nominations – 1993". The Times Group. 28 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "The Filmfare Awards Winners – 1993". The Times Group. 28 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.