Jump to content

फिल्ड ऑफ प्रोटेस्ट: विमेन्स मूव्हमेंट इन इंडिया

फिल्ड ऑफ प्रोटेस्ट: विमेन्स मूव्हमेंट इन इंडिया हे समाजशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी अभ्यासक राका रे लिखित पुस्तक काली फॉर वुमेन यांनी २००० मध्ये प्रकाशित केले आहे.[] सदर पुस्तक हे स्त्री चळवळ आणि स्त्रीवादी राजकीय कृती समजून घेण्यासाठी स्त्री अभ्यास आणि स्त्रीवाद या अभ्यास विषयांसाठी उपयुक्त आहे. भारतातील स्त्री आंदोलनांचे असंख्य पदर समजून घेण्यासाठी सदर पुस्तकाचे योगदान आहे.

सारांश

रे यांनी सदर पुस्तकामधून मुंबई आणि कलकत्ता या दोन शहरांच्या केसेसच्या माध्यमातून स्त्री चळवळी आणि आंदोलनांचा उगम, संदर्भ, त्यांनी घेतलेले प्रश्न आणि धोरणे समजून घेण्यासाठी १९७० आणि १९९० च्या दशकातील स्त्री चळवळी आणि आंदोलनांच्या प्रारंभाचा मागोवा घेतलेला आहे. सदर पुस्तकामध्ये लेखिकेने चार संघटनेचा मागोवा घेतला आहे. त्यातील दोन राजकीय संलग्नित अशा दोन संघटना आहेत पश्चिमबंगा गंगात्रिक महिला समिती आणि जनवादी महिला संघटना तर दोन स्वायत्त संघटना आहेत सचेतना आणि कलकत्ता, मुंबई मधील फोरम.

महत्त्वाच्या संकल्पना

फिल्ड ऑफ प्रोटेस्ट या नावातून एकूणच राजकीय संदर्भात या चळवळींचे स्थान समजते. ज्या सामाजिक राजकीय क्षेत्रातून चळवळी येतात आणि त्याचबरोबर त्यात ही जी उपक्षेत्र निर्माण होतात त्याविषयी सदर पुस्तक भाष्य करते. बोर्दीयू यांच्या फिल्ड या संकल्पनेपासून रे राजकीय फिल्ड ही संरचित, असमान आणि सामाजिकरित्या घडवलेले वातावरण आहे या दृष्टीकोनातून बघतात की ज्याला स्त्रीया प्रतिसाद देतात. उदा. आंदोलनासाठी स्त्रिया जे प्रश्न पुढे आणतात त्याला क्षेत्र आकारही देते आणि त्यावर परिणामही करतात. [] सदर पुस्तकामध्ये लेखिकेने चार संघटनेचा मागोवा घेतला आहे. त्यातील दोन राजकीय संलग्नित अशा दोन संघटना आहेत पश्चिमबंगा गंगात्रिक महिला समिती आणि जनवादी महिला संघटना तर दोन स्वायत्त संघटना आहेत सचेतना आणि कलकत्ता, मुंबई मधील फोरम. सदर पुस्तक १९९० च्या आधीच्या दशकामध्ये केलेल्या संशोधनावर आधारित आहे. हिंसा, दारिद्र्य, भेदभाव, कामातील सहभाग यातून येणारे जिवंत अनुभव यातून राजकीय कृती पुढे जातात याचा आढावा सदर पुस्तकामध्ये घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कशाप्रकारे कलकत्तामधील राजकीय संदर्भ जसे डावे जहाल राजकारणाचा या योगदानावर परिणाम झाला आणि कार्यकर्त्यांनी त्या काळातील वर्चस्व असलेल्या राजकीय कृती कार्यक्रमांशी वाटाघाटी करण्यासाठी वापरलेली धोरणे याची नोंद घेतली आहे. कलकत्त्याची एकजिनसी राजकीय संस्कृती आणि मुंबईची बहुजिनसी राजकीय संस्कृती या दोन्हीतील फायदे आणि वाटाघाटीमध्ये येणारे अडथळे याचा आढावा सदर पुस्तकामध्ये घेतला आहे. रे दाखवून देतात की, कशाप्रकारे कलकत्ता मध्ये स्त्रियांचे साक्षरता किंवा रोजगार विषयक सार्वजनिक प्रश्न साम्यवादी विचारसरणी आणि पक्ष निर्देशित करतात तर मुंबई मध्ये लिंग निदान किंवा हिंसे सारखे प्रश्न स्त्रिया स्वतः स्वतंत्रपणे मांडतात. मुंबईतील पुरुषसत्तेने लिंगभावात्मक हिंसा समजून घेण्याकडे लक्ष केंद्रित केले होते तर कलकत्त्यामधील आंदोलनांनी पक्षाच्या कृतीकार्यक्रमांवर आणि स्त्री आणि पुरुषांमधील भेदभाव समोर न आणण्याकडे लक्ष केंद्रित केले होते. सदर पुस्तक स्त्रिया या नेहमी अत्याचाराच्या बळी ठरतात या चौकटीला छेद देते आणि स्त्रियांच्या जीवनातील बारकावे आणि गुंतागुंत याचे विवेचन करते तसेच स्त्रियांच्या साक्षरता, पाणी, सुरक्षित गर्भनिरोधक साधने आणि लैंगिक हिसाचाराविरोधी लढयांना पाठिंबा देते.

प्रकरणानुसार विभाजन

प्रकरण पहिले स्त्री चळवळीचे संदर्भ तसेच राजकीय कृती आणि संकल्पना, स्थान आणि सिद्धांत याचा वापर निर्देशित करते. दुसऱ्या प्रकरणामध्ये कलकत्ता आणि मुंबई मधील स्त्री चळवळीच्या संघटना दोन्ही स्वायत्त आणि राजकीय संलग्नित गट आहेत हे दर्शविले आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये राजकीय क्षेत्राचे स्वरूप हे चळवळ कशाला म्हणायचे याची परिभाषा देते आणि प्रत्येक शहरात चळवळ ही विभिन्न पद्धतीने विकसित होते हा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. हा मुद्दा उदाहरणासहीत स्पष्ट केला आहे की कशाप्रकारे कलकत्त्यामध्ये रोजगाराच्या प्रश्नासाठी संघटन झाले, तर मुंबई मध्ये स्त्रियांविरुद्ध हिंसाचार हा महत्त्वाचा मुद्दा बनतो.

तिसऱ्या प्रकरणामध्ये कलकत्ता मधील राजकीय क्षेत्र डाव्या एकसंध राजकीय संस्कृतीतून घडवले आहे की ज्यावर कलकत्त्यातील भद्रलोकी संस्कृतीचा परिणाम असलेला दिसतो या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित केलेले आहे.

चौथ्या प्रकरणात स्पष्ट केले आहे की, कशाप्रकारे पक्ष हा पश्चिम बंगा गणतांत्रिक महिला समितीशी संलग्नित आहे आणि सचेतना स्त्रियांचा स्वायत्त गट विचारप्रणाली आणि राजकीय संस्कृती वेगळ्या पद्धतीने परिभाषित करतो. त्याचबरोबर कशाप्रकारे कलकत्तामधील राजकीय संदर्भ जसे डावे जहाल राजकारणाचा या योगदानावर परिणाम झाला आणि कार्यकर्त्यांनी त्या काळातील वर्चस्व असलेल्या राजकीय कृती कार्यक्रमांशी वाटाघाटी करण्यासाठी वापरलेली धोरणे याची नोंद घेतली आहे. उदा. PBGMSच्या मते आर्थिक पर्याय हा कौटुंबिक हिंसाचारावरचा तोडगा असू शकतो तर सचेतना ही संघटना कौटुंबिक हिंसाचार होण्यामागच्या समजुतींवर टिका करते.

पाचवे प्रकरण PBGMS, CPI (M) स्त्रियांची शाखा, सचेतना या स्वायत्त संघटनेतील कार्यकर्त्यांची संघटनात्मक आणि खाजगी धोरणे सुचित करते. तसेच हे प्रकरण या संघटनांच्या अडचणी आणि सामर्थ्य आणि त्याचबरोबर कार्यकर्ते त्यांच्या कार्यक्षेत्रावर कशाप्रकारे निर्णय घेतात यावर प्रकाश टाकते. मुंबई मध्ये जे विखुरलेले आणि संघर्षात्मक राजकीय क्षेत्र आहे आणि ज्याच्या परिणामातून बहुविध राजकीय संस्कृती निर्माण झाली आहे या विषयक सहाव्या प्रकरणामध्ये मांडणी केलेली आहे.

सातवे प्रकरण Forum Against Oppression of Women या संघटनेचे बहुजिनसीत्व, प्रवाहीपणा, सामाजिक दर्जा आणि धोरणे तसेच जनवादी महिला संघटनेने कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, काम या अशा अनेक प्रश्नांविषयक जाणीव निर्माण करण्यामध्ये निर्माण केलेले उपाय यावर प्रकाश टाकते.

प्रकरण आठवे शहरातील अनेक वेगवेगळ्या प्रश्नांवर मोर्चे आणि युती निर्माण करण्यामध्ये फोरम आणि जनवादी महिला संघटना यांनी अनेक वेगवेगळे पर्याय वापरले याकडे लक्ष वेधते. मुंबई मधील स्त्री चळवळीमध्ये फोरम हा स्वायत्त, सांस्कृतिक दबाव गट आहे आणि जनवादी महिला संघटना PBGMSची शाखा आहे.

नवव्या प्रकरणामध्ये सारांश स्वरूपात मांडणी केली आहे की, कलकत्ता आणि मुंबई येथील स्त्री चळवळीच्या अनुभवातून असे लक्षात येते की, स्त्री चळवळ ही विशिष्ठ इतिहास आणि स्थानामध्ये रुतलेली असते. सदर पुस्तकात स्त्रियांच्या संघर्षासाठीच्या कारणांना संदर्भ हे कशाप्रकारे परिभाषित करतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या धोरणांमधील फरकांना आकार देतात हे दर्शविले आहे. स्त्री चळवळीच्या आकलनासाठीचे क्षेत्र खुले करण्यासाठी स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील आंदोलनांमध्ये संवादाचे समर्थन करते.

योगदान

भारतातील स्त्री चळवळ आणि आंदोलनांवरील अत्यंत परिणामकारक कामामध्ये या सदर पुस्तकाचे योगदान आहे. [] १९९० च्या दशकातील स्त्री चळवळी समजून घेणाऱ्यांसाठी आणि या संदर्भातील समकालीन परिस्थितीमधील विरोध स्थानांकित करणाऱ्यांसाठी सदर पुस्तक महत्त्वाचे आहे. चळवळींचे दस्ताऐवजीकरण करण्यासाठी ऐतिहासिक संशोधन आणि चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मुलाखती एकत्र आणल्यास पद्धतीशास्त्रीयदृष्टया अद्भूत काम होऊ शकते याविषयक सदर पुस्तक प्रभावीपणे मांडणी करते. सदर पुस्तक हे स्त्रियांच्या संघर्षासाठीच्या कारणांना संदर्भ हे कशाप्रकारे परिभाषित करतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या धोरणांमधील फरकांना आकार देतात हे दर्शविले आहे.स्त्री चळवळीच्या आकलनासाठीचे क्षेत्र खुले करण्यासाठी स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील आंदोलनांमध्ये संवादाचे समर्थन करते.

संदर्भ सूची

  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-30 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.cetri.be/Indian-Women-and-Protest-An?lang=fr
  3. ^ http://www.jstor.org/stable/190383?seq=1#page_scan_tab_contents