फिरोजशाह तुघलक
तुघलक वंशाचा भारतीय सुलतान | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १३०९ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर २०, इ.स. १३८८, इ.स. १३८८ जौनपूर | ||
चिरविश्रांतीस्थान | |||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
पद |
| ||
कुटुंब | |||
भावंडे | |||
अपत्य |
| ||
| |||
फिरोजशाह तुघलक (पर्शियन:فیروز شاہ تغلق) (इ.स. १३०९ - सप्टेंबर २०, इ.स. १३८८) हा तुघलक वंशाचा भारतीय सुलतान होता. याने दिल्लीच्या सल्तनतीवर इ.स. १३५१पासून मृत्युपर्यंत राज्य केले. मोहम्मद बिन तुगलका नंतर फिरोजशहा तुघलक याने अत्यंत जबाबदार पणे राज्यकारभार केला राज्याची घडी बसवली सामाजिकदृष्ट्या ही अत्यंत महत्त्वाचे निर्णय त्यांनी आपल्या राज्य काळामध्ये घेतले गुलामांचा स्वतंत्र विभाग निर्माण करून त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरविण्याचे काम हे त्याच्या काळामध्ये झालं अनाथ मुलींच्या विवाह साठी त्याने शासनाकडून मदत देऊ केली अनेक अनाथ मुलींचे विवाह लावले दिल्ली सुलतानशाहीच्या काळात मोहम्मद बिन तुगलका नंतर फिरोजशहा तुघलक गाने राज्यकारभार केला या सुलतानाने आपल्या प्रशासकीय सुधारणा द्वारे कल्याणकारी राजवट निर्माण करण्यावर भर दिला राज्याचा विकास हेच उद्दिष्ट फिरोजशहा ने निश्चित केले आणि त्यासाठी त्यांनी प्रशासकीय महसूल विषयक लष्करी व न्यायदान इत्यादी क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यावर अधिक भर दिला प्रारंभीच्या काही लष्करी मोहिमा नंतर जरी अपयश येत असले तरी त्याची उणीव आपल्या सुधारणाद्वारे भरून काढण्यात फिरोजशहा तुघलक यशस्वी ठरला धार्मिक धोरणाच्या बाबतीत मात्र असहिष्णू धोरण होते हिंदूंवर जिझिया कर लादला तर मुस्लिम धर्मातील काही पंथांवर दमन नीतीचा वापर केला सुलतान फिरोजशहा तुघलक जरी मोहम्मद बिन तुगलकासारखा बुद्धीप्रामाण्यवादी नसला तरी उत्तम लेखन करणारा होता त्याने लिहिलेला फतुहाते फीरोजशाही हा ग्रंथ सुलतानशाहीच्या इतिहासाची माहिती देणारा अस्सल साधन ग्रन्थ आहे दिल्लीचे सुलतान पद धारण केल्यानंतर फिरोजशहा तुघलक आणि प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी योग्य राजनिष्ठ व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या फीरोजशहाने मलिक मकबूल यास खान ये जहा हा किताब देऊन वजीर या पदावर नियुक्त केले तो स्वामीनिष्ठ व कुशल प्रशासक होता [१] हा रजब तुघलक आणि दिपलपूरच्या राजकन्येचा मुलगा होता.[२][३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Tughlaq Shahi Kings of Delhi: Chart The Imperial Gazetteer of India, 1909, v. 2, p. 369..
- ^ सर जेम्स मॅकक्रोन डूई. The Panjab North-West Frontier Province and Kashmir. Cambridge, England. p. 171. Unknown parameter
|प्रकाशनवर्ष=
ignored (सहाय्य) - ^ Elliot, Henry Miers, सहलेखक=जॉन डाउसन (1871). "Chapter XVI, Táríkh-i Fíroz Sháhí of Shams-i Siráj 'Afíf". The history of India, as told by its own historians: The Muhammadan period. London. p. 273.