फिरकी गोलंदाज
फिरकी गोलंदाज क्रिकेटच्या खेळातील गोलंदाजांचा प्रकार आहे. हे गोलंदाज सहसा मंदगतीने (साधारणतः ७०-९० किमी/तास) चेंडू टाकतात व चेंडू टाकताना चेंडूला फिरकी देतात. यामुळे टप्पा पडल्यावर चेंडू आपल्या हवेतल्या दिशेपेक्षा वेगळ्या दिशेला वळतो.
फिरकी गोलंदाजांचे दोन मुख्य प्रकार आहेत --
- बोटे फिरकी गोलंदाज - हे गोलंदाज चेंडू टाकताना बोटांनी चेंडूला फिरकी देतात.
- मनगटे फिरकी गोलंदाज - हे गोलंदाज चेंडू टाकताना मनगटाला झटका देतात व त्याद्वारे चेंडूला फिरकी देतात.