फिदाउल्ला सेहराई
फिदाउल्ला सेहराई (इ.स. १९२८:बगीचा धेरी, पेशावर, ब्रिटिश भारत - १९ जून २०१६:पेशावर, पाकिस्तान)[१] हे एक पुरातत्त्व-अभ्यासक होते.
माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर फिदाउल्ला पेशावरच्या इस्लामिया कॉलेज (आता इस्लामिया विद्यापीठ) येथे, आणि तेथून संग्रहालयशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी ब्रिटनमधील लीस्टरच्या महाविद्यालयात गेले.
पेशावरचा इतिहास
पेशावर आणि या शहराचा इतिहास यांचा फिदाउल्लांनी अभ्यास केला. या हे शहर गांधारकालीन असून तत्कालीन बौद्ध धर्माची छाप हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. युआन श्वांग हा चिनी प्रवासी पेशावरला इ.स. ६३०मध्ये आला, तेव्हा या शहरात आता जेथे गूंज गेट आहे, तेथे ४०० फुटी उंच स्तूप होता. हा स्तूप मुळात त्याही आधी दोनशे वर्षांपूर्वीचा, म्हणजे कनिष्क राजाच्या काळातला होता असे सहराई यांचे प्रतिपादन आहे.
पेशावरचा बौद्ध इतिहास
पेशावरच्या भागाच्या बौद्ध इतिहासाकडे आणि सहाव्या शतकापासूनच गांधार राजांचा पाडाव होऊ लागल्यानंतरच्या इतिहासाचाही फिदाउल्ला यांनी अभ्यास केला.
हुंड शहर
हुंड शहर म्हणजे पूर्वीचे उदभांडपुरा असून हे गांधार राजांची राजधानी होते. ते व्यापारउदीमाचे केंद्रही होते. कनिष्काने बोधगयेचा प्रवास करून तेथून आपल्या राज्यात आणलेला बोधीवृक्ष पुष्पपुरात (पेशावरात) लावला होता. हे पिंपळाचे झाड पेशावरच्या पीपल मंडीत आहे.
पुस्तके (इंग्लिश)
- पेशावर संग्रहालयाची ‘मार्गदर्शिका
- पेशावरचा बौद्ध इतिहास
- हुंड शहर आणि त्याचा बौद्धकाळ