Jump to content

फास्टॅग

फास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली एक 'इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली' आहे. हिचे संचलन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारे करण्यात येते.[] याची सुरुवात एक पथदर्शी प्रकल्प म्हणून सन २०१४ मध्ये सुवर्ण चतुष्कोणाच्या अहमदाबाद-मुंबई महामार्गाच्या एका भागात झाली. दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या एका तुकड्यावर अशा प्रकारचा टोल गोळा करणे प्रथम ४ नोव्हेंबर २०१४ला सुरू करण्यात आले.[] जुलै २०१५पासून चेन्नै-बंगलोर या सुवर्ण चतुष्कोनाच्या आणखी एका तुकड्यावर या पद्धतीने टोल गोळा करणे सुरू झाले. एप्रिल २०१६ पर्यंत भारतभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या सुमारे २४७ टोल प्लाझांवर ही योजना राबविण्यात आली. हा आकडा एकूण टोल प्लाझांच्या सुमारे ७०% इतका येतो.[]

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील एका टोल प्लाझाचे दृश्य

भारतात डिसेंबर २०१७ पासून पुढे विकल्या जाणाऱ्या सर्व नव्या गाड्यांना फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले असून मार्च २०१८ पर्यंत सर्व गाड्यांना फास्टॅग लावण्यात येईल असे उद्दिष्ट आहे. याद्वारे, विना-रोख(कॅशलेस) पद्धतीने लवकर टोल जमा होईल व टोल प्लाझांवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. याने वाहनांच्या वाहतुकीचा वेळ कमी होतो व त्याचा फायदा होतो.[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (इंग्रजी मजकूर) "FASTag Roll-out and Facilitation" Check |दुवा= value (सहाय्य). Press Information Bureau. New Delhi. ९ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ Gupta, Siddhartha. "(इंग्रजी मजकूर)Soon, drive non-stop and pay tolls speeding through 'FASTag' lane". Indian Express. New Delhi. ९ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "FASTag Is Now Active In Over 70% Toll Plazas On National Highways फास्टॅग सध्या सुमारे ७०% टोल प्लाझांवर सक्रिय (इंग्रजी मजकूर)". The Logical Indian. ९ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.